व्हीएस न्यूज-'पश्चिम बंगालला जाण्यासाठी तुम्हाला फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो,' असे सांगून दोघांनी एका तरूणाची 25 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार प्राधिकरण येथे नुकताच उघडकीस आला.
अभिजीत कुलकर्णी (वय-36, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांनामोबाईलव्दारे संपर्क साधूनआरोपींनी फॅमिली ट्रिपचे पॅकेज देतो, असे सांगून खात्यावर 92 हजार रूपये भरण्यास भाग पाडले.आरोपींनी ट्रिपचे आयोजनकेले नाही. त्यामुळे कुलकर्णी यांनी आरोपींकडे दिलेले पैसे मागितले. आरोपींनी 67 हजार रूपये दिले. परंतू, उर्वरित 25 हजार रूपये न देता फसवणूक केली.पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे अधिक तपास करत आहेत.