व्हीएस न्यूज -पर्यटनाचे आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ओसांडून वाहू लागले.यामुळे धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंदपर्यटक घेऊ लागले आहेत.
दोन आठवड्यापासून पर्यटकांना भुशी धरण भरण्याचे वेध लागले होते. धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखिल पर्यटन धरणावर गर्दी करत होते. शुक्रवारपासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसाने मंगळवारीअखेर पर्यटकांची व स्थानिक व्यावसायकांची प्रतिक्षा संपवली व पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओसांडून वाहू लागले.धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर पाणी वाहू लागले आहे.
मागील आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यु झाला आहे. धरणावर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या जिवाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.