व्हीएस न्यूज- शिक्षण ही एक साधना आहे, जेवढे तन्मय होऊन तुम्ही ही साधना कराल. तितके चांगले तुम्ही शिक्षण साधक बनाल, असे प्रतिपादन चारित्र्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राच्या आयोजित इयत्ता 10 वीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर, प्राचार्य प्रज्ञा पाटील, सुभाष गदादे, मधुरा लुंकड आदी उपस्थित होते. शाळेच्या 49 विद्यार्थ्यांनी 90 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळविले. 75 ते 89 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. मराठी माध्यमाचा 98.78 तर इंग्रजी माध्यमाचा 94.91 टक्के निकाल लागला.
अथर्व कुलकर्णी याला 99.80, साक्षी महाजन 97.40 तर श्रेया जगताप हिला 97.20 टक्के गुण मिळविले. श्रावणी कुलकर्णी, सोनिय जगदाळे, श्रृती पिंगळे यांनी गणितात तर अथर्व कुलकर्णी, साक्षी महाजन, प्रथमेश भोजने, ओम महाजन यांनी संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळविले. तंत्र शिक्षण विभागात अमृता साळुंखे प्रथम आली. सूत्रसंचालन कल्याणी पटवर्धन, वैशाली गायकवाड यांनी केले. अनिरूध्द पुरीगोसावी, नागेश जोशी, राजश्री मराठे आदींनी संयोजन केले.