व्हीएस न्युज - काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाण्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ आणि विजयराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं. चिं. शहर, विजयराज नागरी सहकारी पतसंस्था पिंपळे गुरव आणि लेवा भ्रातृ मंडळ, पिंपळे सौदागर यांच्या संयुक्तपणे मलकापूर (जि. बुलढाणा) येथील जनता कला-वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड यांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंबातील सदस्य, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, मारुती बाणेवार, लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष क्रुष्णाजी खडसे, अमित नाफडे, मलकापूरचे नगराध्यक्ष ऍड. हरीष रावल, दिलीप बढे, बळीराम माळी, डॉ. दिनेश गाडेकर, विजय वडमारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड नितीन राठोड हे ज्या शाळा व महाविद्यालयात शिकले, त्या अनुक्रमे जनता कला व वाणिज्य महाविद्यालय आणि नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना 'सैनिकी शिक्षण आणि त्याद्वारे उपलब्ध करिअरच्या संधी' याबाबत कृष्णाजी खडसे यांनी, तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरच्या संधीबाबत दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शहीद संजयसिंह राजपूत यांचे सुपुत्र जय राजपूत यांनी 'माझ्या भारतमातेचे रक्षण करण्यासाठी मी देखील सैन्यातच भरती होणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पवार यांनी, सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.
व्हिएस न्युज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी आणि सचिन सौदाई यांच्या गटात सोमवारी मध्यरात्री पिंपरीतील रात्रभर चालु असणार्या सलोनी हॉटेल मध्ये हाणामारी झाली. या बाबत पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
सचिन राकेश सौदाई (३३, रा. पिंपरी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक डब्बू आसवानी, लखु भोजवनी, जीजू, आशिष आसवानी, डब्बू आसवानी यांचा दुसरा मुलगा, सनी सुखेचा, लखन सुखेचा, भरत आसवानी यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, जातीयवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, पण जाणीवपूर्वक एकाचे नाव गुन्ह्यातुन वगळून त्याला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचे सुत्रांमार्फत कळते.
नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी फिर्याद दिल्यानुसार हा प्रकार सलोनी हॉटेल येथे झाला. सनी सौदाई याचा वाढदिवस असल्याने आसवानी यांच्या सलोनी हॉटेलमध्ये सनी सौदाई व इतर आले होते. या ठिकाणी हे जबरदस्तिने दारू आणि बियरचे बॉक्स मागवत होते. यास मनाई केल्याने त्यांनी गोंधळ घातला. याची माहिती मिळाल्यानंतर डब्बू आसवानी हॉटेलवर गेले असता पैसे देऊन घेऊन जा असे म्हटल्याने चिडून टोळक्याने राडा केला. सचिन राकेश सौदाई , सनी राकेश सौदाई , सुनील मुकेश शर्मा (रा. सर्व पिंपरी), अजय टाक, तुषार दुलेकर, गोलू व इतर ५ ते ७ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे, मारहाण, दरोडा टाकणे, खुनी हल्ला करणे, धमकी देणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
व्हीएस न्युज - गया फाउंडेशन व मराठवाडा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना 'आदर्श माता' आणि 'समाजभूषण' पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात 'आदर्श माता पुरस्कार' देवून विमलबाई धुरगुडे (तुळजापूर, मंगरूळ), शकुंतला पवार (धारूर, मोर्डा तुळजापूर), धन्वंतरी गोजमगुंडे (लातूर), शालिनी चौधरी (अंबाजोगई), द्रोपदी काळे (चारे, बार्शी) यांना गौरविण्यात आले.
यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, परिमंडळ १ पुणेचे उपायुक्त सुहास बावाचे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, उदयपूरचे सरपंच माधवराव पाटील, पूजाताई महेश लांडगे, शुभांगीताई लांडे पाटील, विद्याताई जाधव, आयोजक प्रकाश इंगोले व डी. एस. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. समाजभूषण पुरस्कारार्थी : डॉ. अंबिका पतंगे (स्त्री रोग तज्ज्ञ), स्मार्तना पाटील (पो.उप- आयुक्त परिमंडळ-१ पिं.चिं), प्रतिभाताई कव्हेकर पाटील (लातूर), डॉ. दीपाताई मोरे (उमरगा), अंजली तापडिया (सुवर्ण पदक विजेत्या), प्रीतीताई काळे (समाजसेविका), पूजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी), आशाताई सूर्यवंशी-मुठे, सुरेखा शेडे (समाजसेविका), स्नेहल शहाणे (लोकसेवा फाउंडेशन), ऍड. प्रीती वैद्य (संचालिका किनारा वृद्धाश्रम ), अर्चनाताई अंबुरे –उस्मानाबाद, पोपटबाई जाधव (लघुउद्योजिका), रिंका जाधव- काळे, अदिती साखरे, अनिता खांदवे – कराळे, निताताई मोघे, प्रतीक्षा इंगोले. रवींद्र गायकवाड म्हणाले, पुरस्कारामुळे महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. मराठवाडा ही संताची भूमी आहे व आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या महिला या आपल्या मराठवाड्याच्या मातीतील आहेत. पिंपरी-चिंचवड ही त्यांची कर्मभूमी असली, तरी आपल्या जन्मभूमीवर तेवढीच माया व प्रेम करतात.
पुरस्कारार्थींचेच्या मनोगतातून सद्यस्थितीत समाजामधील एकमेकांसाठीचा ओलावा आणि संवेदना हरवत चालल्याच्या भावना व्यक्त झाल्या. दरम्यान, “स्वराज्य शांतीदूत परिवार” या संस्थेचे उद्घाटन व स्वराज्य महिला विशेषाकांचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेक राजेंद्र कोरे यांनी, तर आभार डी.एस.राठोड यांनी मानले.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरातील आज ५० जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला यावेळी सचिन चिखले, नगरसेवक पिं.चिं,सचिन पवार, हेमंत डांगे, शहर अध्यक्ष वि.सेना.पिंपरी .चिंचवड उपस्थित होते.
विक्रम आडे,तेजस देशपाडे ,बिपीन पाल,शुभम महाडिक,ओमकार पाचारणे,श्रीकृष्ण गंगातीर,यश काटे,आकाश आवसरे,अनिकेत वाघमारे, यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.
व्हीएस न्युज - कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका आयटी अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१५) मध्यरात्री पिंपरीतील डीलक्स चौकात घडली. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. मंजित प्रसाद असे खून केलेल्या आयटी अभियंत्याचे नांव आहे.
मंजित पुण्यातील डब्लूएनएस कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजित प्रसाद हे विमाननगर येथील आयटीपार्क मध्ये संगणक अभियंता म्हणून काम करतात.
ते कॅब (बस) ने काळवाडीच्या दिशेने जात होते. बस मध्ये अनेक ऍम्प्लॉईज होते. पिंपरीच्या डीलक्स चौकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवला त्यांनी बस थांबविण्यास बस चालकाला सांगितले. बस चालका शेजारी मंजित बसले होते. त्यांनी काय झाले असे गुंडांना विचारले असता त्यातील एका आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली. याचाच जाब विचारण्यासाठी मंजित बसच्या खाली उतरले. तेव्हा मंजित यांना पाच जणांनी लथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्यातील काहींनी धारदार शस्त्रांनी पोटावर आणि छातीवर वार केले यात मंजित गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला.
मातंग समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेण्याऱ्या ताकतोडे यांच्या शोकसभेप्रसंगी सरकारचा जाहीर निषेध
व्हिएस न्युज - मातंग समाजाला लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील तरुण कै संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन प्राणत्याग केला या निषेधार्थ शहरातील मातंग समाजाच्या वतीने पिंपरी येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर संतप्त आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस व आंदोलकात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्यात असे म्हणले आहे की, अनेक वर्षापासुन मातंग समाजावर अन्याय होत असुन शासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही मातंग समाजाचे लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार आरक्षण मिळत नसल्यामुळे संजय ताकतोडे या युवकाने आत्महत्या केली आहे, याची राज्यभर आक्रमक निदर्शने व आंदोलने होत आहेत, सरकारने आरक्षणाबाबत सकारात्मक पावले उचलावीत व टाकतोडेंच्या कुटूंबियांना ५० लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यात केली आहे.
निषेध सभा झाल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भुमिका घेत मानवी साखळीद्वारे रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पिंपरी पोलीस व आंदोलकात बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले, आंदोलकांची आक्रमकता पाहुन पोलिसांनी नमती बाजु घेतली व ताब्यात घेतलेल्यांना सोडून दिले त्यामुळे वातावरण शांत झाले.
यावेळी जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड, संजय धुतडमल, शिवसेनेचे युवराज दाखले, धनंजय भिसे, दत्तु चव्हाण, नितीन घोलप, शिवाजी साळवे, भिमा वाघमारे, संजय ससाणे, विशाल कसबे, आशा शहाणे, महेश खिलारे, अनिल सौंदडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्युज - मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात अ, ब, क, ड, वर्गीकरण व प्रलंबीत मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करू नये. अन्यथा महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने मतदानावर बहिष्कार टकला जाईल, असा इशारा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा लहुजी शक्तीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी सरकारला दिला आहे.
दाखले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या मजकुरात म्हटले आहे की, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीडमधील केज तालुक्यातील एका तरुणाने पाली धरणात उडी मारून जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिसांना काठावर एक बॅग सापडली असून त्यात मोबाईलमध्ये त्याने आत्महत्येचे कारण रेकॉर्ड केले आहे. संजय ज्ञानोबा ताकतोडे असे त्या तरुणाचे नाव आहे.
मागील अनेक वर्षांपासून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे मातंग समाजाकडून काढण्यात आली. परंतु, गेंड्याची कातडी आसलेल्या पूर्वीच्या सरकारप्रमाणे हे राज्यसरकार कामकाज करत आसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसरकारने गांभीर्याने दखल न घेतल्याने मातंग समाजाच्या युवकाला आरक्षणासाठी आपले प्राण गमवावे लागले.
राज्यसरकारने संजय ताकसांडेच्या कुटूंबाची जबाबदारी स्विकारून आरक्षणासाठी तात्काळ सकारात्मक भुमीका घ्यावी, अन्यथा मातंग समाज मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशारा दाखले यांनी दिला आहे.
व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यपद मिळावे यासाठी कोअर कमिटी मध्ये ठरल्याप्रमाणे स्थायी समिती सदस्य पद एक वर्षासाठी देण्याचे ठरले. त्यामुळे मागील वर्षी मी व आताचे महापौर राहूल जाधव यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. राहूल जाधव यांना महापौर पद देण्यात आले. यावर्षी मला स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे म्हणून मला सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि कोअर कमिटीने ‘हिरवा कंदील’ दिला होता. परंतू शेवटच्या क्षणी काय झाले या बाबत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी (दि. 7 मार्च) आहे. तो पर्यंत माझेच नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेते व कोअर कमिटी निश्चित करेल असा आशावाद भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शितल शिंदे यांनी सोमवारी (दि. 4 मार्च) पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.
स्थायी समिती सदस्य पद फक्त एकच वर्षासाठी द्यायचे असे ठरले असतानाही मागील वर्षी स्थायी समितीत असणारे नगरसेवक विलास मडेगिरी यांचे नाव पुन्हा कसे काय आले? कदाचित कोअर कमिटी कडून हि चूक झाली असेल, हि चूक ते गुरुवार पर्यंत दुरुस्त करतील व माझेच नाव अध्यक्षपदासाठी घेतील असाही विश्वास शितल शिंदे यांनी व्यक्त केला. जर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नवीन सदस्याचे नाव घेतले असते तरी मी मान्य केले असते. परंतू मडेगिरी यांच्यासाठी ठरलेले धोरण का बदलण्यात आले? याबाबत मी वरिष्ठ नेत्यांकडे माझी कैफियत मांडली आहे. भाजपा हा पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे माझ्यावरील अन्याय निश्चित होईल. असेही शितल शिंदे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून कर्जदाराला चौघांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आळंदी येथे घडली असून याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मारुती धुराजी ढगे (वय 49, रा. चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अवधूत जालिंदर गाढवे (वय-27 रा. मोशी) व बाबू (पूर्णनाव माहिती नाही) व याचे दोन साथीदार अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील अवधूतला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती यांनी मुलीच्या बाळंतपणासाठी अवधूतकडून 50 हजार रुपये हे 20 टक्के व्याजाने घेतले होते.
हा व्याजदर जास्त असल्यामुळे मारुती यांनी नातेवाईकांकडून पैसे गोळा केले व मुद्दल व एक महिना व्याजाचे 10 हजार असे एकूण 60 हजार रुपये अवधुत याला परत केले. ही रक्कम घेऊनही अवधुत याने मारुती यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना जबरदस्ती दुचाकीवर बसवून आळंदी येथे नेऊन त्यांच्या खिशातील 25 हजार रुपये काढून घेतले व त्यांना मोहिनी लॉज येथे डांबून ठेवले. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.
दिघी पोलीस तपास करीत आहेत.
व्हीएस न्यूज – ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनलला मतदान का केले नाही, असे विचारत आणि त्याचा राग मनात ठेवून चौघांनी एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खेड येथे घडला.
मीरा बाळासाहेब रौंधळ, बाळासाहेब रौंधळ, स्वप्नील रौंधळ, महेंद्र रौंधळ (सर्व रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपाली सोमनाथ रौंधळ (वय 30 रा. रौंधळवाडी पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी 28 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला मतदान का केले नाही ? त्यामुळे आमचा उमेदवार पडला असे म्हणत, त्याचा राग मनात धरुन मीरा यांनी दीपाली यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर, तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.
व्हिएस न्युज - पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनीच पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी बारणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे मुख्यालयात येणारी वाहने रस्त्यावरच अडकली. त्याचा फटका महापौर राहुल जाधव यांनाही बसला. महापौर गाडी सोडून चालत मुख्यालयात दाखल झाले.
पत्रकारांशी बोलताना बारणे म्हणाल्या,की शहरात बांधकाम व्यावसायिक बेकायदा बांधकामे करत आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयुक्त तसेच पक्षनेत्यांचे पालिकेच्या कारभारावर कसलेही नियंत्रण राहिले नाही. काही ठिकाणी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांचे संगनमत आहे. पूर्णत्वाचा दाखला घेतलाच जात नाही.
थेरगावात १२ मीटर रस्त्याचे काम नियमबाह्य़ पद्धतीने केले जात आहे. सामान्यांना नियम सांगितले जातात. धनदांडग्यांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात आहे, असा आरोप बारणे यांनी केला.
व्हीएस न्युज - पश्चिम महाराष्ट्र भव्य राज्यस्तरिय शरीरसौष्ठव ‘खासदार श्री २०१९’ चा मानकरी पिंपरी चिंचवडचा रूपेश चव्हाण ठरला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे हजारो क्रीडा प्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धी पार पडली. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाण याने खासदार श्री-२०१९ हा किताब पटकावला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बेस्ट पोजर अतुल साळुंखे (पुणे), मोस्ट इंप्रूड राजेंद्र जाधव (कोल्हापूर), अपकमिंग बॉडी बिल्डर तुषार चोरगे (पिंपरी चिंचवड) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी स्पर्धेचे आयोजन केले.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे राजेश सावंत, प्रणव मुजुमदार, विजय मोरे, संजय महाडिक यांनी पंच म्हणून काम पहिले. विभागप्रमुख राजेश वाबळे, भोलाराम पाटील, रवींद्र ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्क नेते बाळाभाई कदम, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, पुणे जिल्हा संघटिका उर्मिलाताई काळभोर, उपशहरप्रमुख रोमी संधू,तुषार नवले, माजी नगरसेवक किरण मोटे, संतोष सौंदणकर, उद्योजक संतोष बारणे, निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002