Skip to content

VS News

Pimpri-Chinchwad · Pune

Breaking
घरकुलात फुलला हरित संकल्प! ‘एक व्यक्ती, एक झाड’चा संदेश देत देशी वृक्षांचे वृक्षारोपणजय हिंद स्कूलविरोधातील तक्रारी प्रलंबित; चौकशी समिती दीड वर्षानंतरही निष्क्रिय असल्याचा आरोप!अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे पदाधिकारी मच्छिंद्र चिंचोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; महिला आरक्षणासह विविध ठराव मंजूरपाणी बचतीसाठी महापालिका ॲक्शन मोडवर! निष्काळजी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईरुग्णालयातच शिस्तीचे धिंडवडे! सुरक्षारक्षकाच्या वर्तनावर संतापजनक प्रश्नचिन्ह!अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालगीतांची मैफल रंगली; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाददापोडीच्या विषारी दारूप्रमाणेच सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गॅस चोरीही धोकादायक!PMPML कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी भाजपा कामगार मोर्चाचे निवेदनदोन पदांवर एकाच व्यक्तीची वर्णी; भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संतापपीसीयूमधील उच्च तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य सिद्ध करावे : हर्षवर्धन पाटीलकामगार नेते यशवंत भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छानिष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी निवडमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर?उन्नतीच्या ‘स्वर निनाद’ मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळा २००३ बॅचच्या रियुनियनमध्ये रंगला गुरु-शिष्य स्नेहसोहळाकंत्राटी व मानधन कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन पगार स्लिप द्या; हनुमंत लांडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणीसंघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल पवना धरण 100 टक्के भरले; 15 टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करा – जयेश चौधरीराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी;धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!'पाणीप्रश्न निकाली काढणार'; भामा आसखेड योजनेची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेशआषाढी वारीत ‘लालपरी’ची दमदार कामगिरी; ५,५०० बसेसमधून ९ लाखांहून अधिक भाविकांचा सुरक्षित प्रवासऔंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीमोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरूविद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाजंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारामोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणीमोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकारमोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देशबालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारामतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शनपर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिकापिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरीसागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती!जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली!पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक.काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत.

सांगावी

औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

· 360 reads

औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

व्हिएस न्युज - जिल्हा रुग्णालय, औंध येथील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या नियमानुसार पात्र कर्मचाऱ्यांना वेळेत पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना प्रक्रिया विनाकारण रखडवली जात आहे. पदोन्नतीचा प्रस्ताव जाणूनबुजून वरिष्ठांकडे पाठवला जात नसल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाहक्कांवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून, संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Om sai interior

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात शासनाने मंजूर केलेल्या पदांप्रमाणे अनेक कर्मचारी प्रत्यक्षात कार्यरत नसून, त्यांच्याकडून इतरच स्वरूपाची कामे करून घेतली जात असल्याची चर्चा आहे. योग्य पदावर योग्य कर्मचारी नसल्यामुळे प्रशासकीय समन्वयावर परिणाम होत असून त्याचा फटका रुग्णसेवेलाही बसत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात काही सकारात्मक बदल घडल्याचे कर्मचारी मान्य करतात. अनेक बाबींमध्ये शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जाते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला पदोन्नतीचा प्रस्ताव अद्याप वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेला नसल्याने नाराजी कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी तसेच शासनाने मंजूर केलेल्या पदांनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती व कामकाजाची पुनर्रचना करावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Om sai interior