व्हीएस न्यूज : भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासह शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी सुरू झालेल्या ‘इंडो- फ्रेंच नॉलेज समिट’च्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. पुढील वर्षी(२०२१) ४ आणि ५ मार्चला ही परिषद होणार असून, फ्रान्स आणि भारत सरकारचे उच्चस्तरीय अधिकारी, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा परिषदेत सहभाग असेल.
फ्रान्सच्या मुंबईतील महावाणिज्य दूत सोनिया बार्बरी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या नवसंकल्पना केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, फ्रेंच दूतावासातील अधिकारी ऑलिव्हर फुडूम, फिलिप गुलियन आदी या वेळी उपस्थित होते. अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थापन अशी नऊ प्रमुख क्षेत्रे आणि संबंधित विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाईल, विद्यापीठांशी सामंजस्य करार केले जातील, विविध विषयांवरील एकत्रित संशोधन प्रकल्प राबवण्यासंदर्भातील ठराव केले जातील.
बार्बरी म्हणाल्या, ‘भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ आहेत. अवकाश विज्ञान, संरक्षण अशा क्षेत्रांत एकमेकांचे सहकार्य घेत आहेत. दोन्ही देशांसाठी विद्यापीठे आणि संशोधन हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करणे शक्य आहे. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचे ठरले. या पूर्वीच्या दोन परिषदांमध्ये सुरू झालेले प्रकल्प पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या परिषदेत सादर केले जातील. ही परिषद फलदायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळणे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठ अन्य संस्थांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करेल. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, नव्या विषयांसंदर्भातील अभ्यासक्रम, काही महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेता येतील. या पूर्वीच्या दोन परिषदांमुळे एव्हिएशन, इलेक्ट्रिक मोबिलिटी संदर्भातील दोन अॅडव्हान्स्ड सेंटर निर्माण झाली. त्यामुळे या परिषदेतूनही शिक्षण, संशोधन, विज्ञानासंदर्भातील महत्त्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.
पहिल्यांदाच विद्यापीठात परिषद
फ्रान्सच्या अध्यक्षांनी २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. त्या वेळी फ्रान्स दूतावासातर्फे ही परिषद आयोजित केली होती. पहिली परिषद २०१८ मध्ये दिल्लीत आणि २०१९ मध्ये फ्रान्समधील लिऑन येथे झाली. आता २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारी परिषद पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठात होणार आहे.
व्हीएस न्यूज - कानशिलात लगावल्याच्या कारणावरून चाकण एमआयडीसी मध्ये वर्कशॉप मालकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हरीशचंद्र किसन देटे (वय-४५) असे खून झालेल्या वर्कशॉप मालकाचे नाव आहे. तर जीवन दत्ता डोंगरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह ऐकून पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद वशिष्ट कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हरीशचंद्र किसन देटे यांचे चाकण एमआयडीसीमध्ये व्ही.एच.डी नावाचे वर्कशॉप आहे. त्याठिकाणी आरोपी जीवन डोंगरेची पत्नी काम करते. सोमवारी सकाळी आरोपी पत्नीला वर्कशॉपमध्ये सोडवण्यासाठी आला होता. तेव्हा, काही कारणामुळे मयत हरिशचंद्र देटे आणि आरोपी जीवन डोंगरे यांच्यात भांडण झाले. हरिशचंद्र यांनी आरोपीच्या दोन कानशिलात लागवल्या. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. परंतु, कानशिलात लगावल्याचा राग मनात असल्याने जीवन डोंगरे हा स्वस्त बसला नाही. त्याने आपल्या पाच ते सहा साथीदारांसह हरीशचंद्र यांचे पुन्हा वर्कशॉप गाठत धिंगाना घातला. वर्कशॉपचे मालक हरीशचंद्र हे बाहेर आले. त्यावेळी थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण करत मुख्य आरोपी जीवन डोंगरे याने त्यांच्या डोक्यात दगड घातला. जखमी देठे यांना तत्काळ चाकणच्या एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढला.
या घटनेमुळे चाकण एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार करत आहेत. आरोपी हा भाड्याने रिक्षा घेऊन चालवत असे असंही पोलिसांनी सांगितले आहे
व्हीएस न्यूज -तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे १०० जण बजावले हिंजवडी येथील माणमध्ये हेड लाईट आणि टेल लाईट तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे शंभर कामगार वेळीच बाहेर पडल्याने बचावले आहेत. ही आग पहाटे चार वाजताच्या सुमारास हिंजवडी माणमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनीला लागली होती. घ
टनेची माहिती मिळताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल घटनास्थळी दाखलं झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनी ला आज पहाटे चार च्या सुमारास भीषण आग लागली होती. यात प्लास्टिक आणि थिनर या रसायनाचा जास्त वापर होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. जेव्हा आग लागली तेव्हा तिसऱ्या शिफ्टमध्ये काम करणारे शंभर कामगार कंपनीत काम करत होते. ते सर्व वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रत्येक्ष दर्शी कामगाराने ही आग शॉर्टसर्किटमुळे स्टोअरमध्ये लागली त्यानंतर अवघ्या कंपनीत आग पसरली असे अधिकारी म्हणाले. पिंपरी-चिंचवड (राहटणी), हिंजवडी एमआयडीसी, पुणे (पीएमआरडीए) आणि खासगी टँकर च्या साहाय्याने तब्बल चार तास अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले. या घटनेत जीविहितहानी झालेली नाही. घटनास्थळी हिंजवडी पोलीस देखील उपस्थित होते.
व्हीएस न्यूज -इंदुरीकर महाराजांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक स्थरातुन इंदुरीकर महाजरांवर टीका सुरू असताना त्यांच्या समर्थनार्थ काही लोक पुढे येत आहेत. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे इंदुरीकर महाराजांची बैलगाडीतुन मिरवणूक काढत पाठिंबा दर्शवला आहे. यावेळे वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणाव हजर होते.पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंती निमित्त ह.भ.प महाराज इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करत, उपस्थित नागरिक, वारकरी यांनी बैलगाडी मधून इंदुरीकर महाराज यांची मिरवूनक काढत कीर्तनस्थळी नेहले. शेकडो नागरिकांची गर्दी पाहून महाराजही सर्वांना नमस्कार करत होते.प्रत्येक पिंपरी-चिंचवडकर तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन नागरिकांनी इंदुरीकर महाराजांना दिले.
व्हीएस न्यूज -महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राची देखील जडणघडण होत असते. तसेच अभियंता होण्यासाठी सतत चार वर्ष केलेले कष्ट आणि गुरुजनांचे मार्गदर्शन याचे फळ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मिळणारे पदवी प्रमाणपत्र होय. या कार्यकालात आलेल्या अनुभवानेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो. योग्य दृष्टीकोन ठेवून सर्व सामान्यांना भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी या अनुभवाचा उपयोग करावा, असे मार्गदर्शन माजी कुलगूरु डॉ. आर.एस.माळी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील माजी कुलगुरु डॉ. आर.एस. माळी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. एन. बी. चोपडे, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट डिन डॉ. शितलकुमार रवंदळे, डॉ. संजय लकडे, डॉ. शितल भंडारी, प्रा. प्रशांत पाटील, समन्वयक प्रा. गफ्फार मोमीन, महाविद्यालयीन परिक्षा अधिकारी प्रा. सुनिल ताडे, प्रा. केतन देसले आणि यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
डॉ आर. एस. माळी म्हणाले की, पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाने केलेल्या मार्गदर्शनामुळे मागील वीस वर्षात पीसीसीओईची ही शैक्षणिक घोडदौड अभिनंदनीय आहे. पीसीसीओईने मागील वर्षात टेडेक्स, केपीआयटी स्पार्कल आणि आयईईई सारखे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होतो त्यामुळे यावर्षी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत वीस पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले हे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातून पदवी घेऊन गेलेले अभियंते देश परदेशातून नामांकित आस्थापनांमध्ये उच्च वेतन श्रेणी व उच्च पदांवर आहेत आणि संस्थेच्या नावलौकिकात भर घालत आहेत हे आणखी कौतुकास्पद आहे.
विश्वस्त भाईजान काझी म्हणाले की, माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी पुढील शंभर वर्षांचा विचार करुन ही संस्था स्थापन केली. येथून पदवी घेऊन गेलेले हजारो अभियंते जबाबदार नागरिक म्हणून कार्यरत आहेत. येथे विद्यार्थ्यांना फक्त अभियंता नाही, तर प्रतिभाशाली, गुणवत्तापुर्ण व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडविले जाते. या वर्षी संस्थेत विविध शाखांतून चार हजारांहून जास्त विद्यार्था शिक्षण घेत आहेत. त्यांना उच्च मार्गदर्शन व सेवा सुविधा देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ नेहमी प्रयत्नशील असते.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वागत प्राचार्य डॉ. नीलकंठ चोपडे , सुत्रसंचालन प्रा. अंजली मिश्रा, प्रा. अश्विनी वझे आणि आभार प्रा. सुनिल ताडे यांनी मानले.
व्हीएस न्यूज -घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं दाम्पत्याला प्राण गमवावे लागले. बुधवारी (13 फेब्रुवारी) पुण्यातील बिबेवाडी परिसरात ही घटना घडली. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंदच ठेवल्यानं विषारी वायूनं मृत्यू झाला.
पेस्ट कंट्रोलमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. घरातील डास, कीटक घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल केले. पण त्यात दाम्पत्याचाच जिव गेला. पुण्यातील बिबेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही घटना घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मयतांची नावे आहेत. घरात पेस्ट केल्यानंतर त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. घराची दारे आणि खिडक्या बंदच ठेवल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
यापू्र्वीही झाला होता दोन तरुणांचा मृत्यू –
ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. दोन्ही तरुण एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. कॅन्टीन मालकाने त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. ढेकणांचा त्रास होत असल्याने खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. पेस्ट कंट्रोल केलं असल्याने ते दोघे तीन दिवस मित्राच्या घरी राहिले. नंतर पुन्हा ते आपल्या खोलीवर आले होते.
व्हीएस न्यूज-पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला होता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवारी मुंबईत महामोर्चा निघणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मनसेकडून हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महामोर्चा यशस्वी व्हावा यासाठी राज्यभरातील मनसे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत. पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांना ‘राजगर्जना बाईक रॅली’ काढण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे.
पुणे पोलिसांना वाहतुकीवर परिणाम होईल सांगत बाईक रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. तसंच या रॅलीमुळे नागरिकांना त्रास होईल असंही सांगण्यात आलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून या रॅलीला सुरुवात होणार होती. मनसे कार्यकर्त्यांनी मात्र मुस्लिमबहुल भागातून रॅली जात असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांना परवानगी नाकारल्यानंतरही मनसे कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पोलिसांनी कारवाई करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. नारायण पेठ पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ही रॅली पार पडणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान रविवारी दुपारी १२ वाजता मनसेच्या महामोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता मोर्चा सुरु होईल. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने ,भक्ती -शक्ती निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षास्टॅंड चे उदघाटन गुरुवारी (दि. ६) रोजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला रिक्षाचालकांनी फेटे परिधान करून या रिक्षास्टॅंड चे स्वागत केले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे ,महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे ,नगरसेवक सचिन चिखले ,उत्तम केंदळे ,पंकज भालेराव ,कमल घोलप, शर्मिला बाबर ,पौर्णिमा सोनवणे ,माजी नगरसेवक सुलभा उबाळे ,तानाजी खाडे ,ऊर्मिला काळभोर ,घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे ,संजय बोराडे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात महिला रिक्षा चालवत आहेत आणि त्यांनी स्वतःचे रिक्षास्टॅंड निर्माण केले आहे. हे शहराच्या दुष्टीने अभिमानाची बाब आहे. रिक्षाचालक महिलांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. महिलांच्या रिक्षास्टॅंडवर वाचनालय ,पाणपोई आणि रिक्षाचालक महिलांना बसण्यासाठी सुविधा केल्या जातील ,असे आश्वासन महापौरांनी दिले. बाबा कांबळे म्हणाले कि ,महाराष्ट्र रिक्षा पंचायती आणि घरकाम महिला सभेच्या प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स बॅच ,परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या .यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षा चालक झाले असून ,आता महिलाही रिक्षा चालवणार आहे. महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे त्यांनाही हक्काचे रिक्षास्टॅंड मिळावे यासाठी महिलांचे देशातील पहिले रिक्षास्टॅंड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वसंध्येला या रिक्षास्टँडचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्षा सरस्वती गुजलोर ,यमुना काटकर ,विजयालक्ष्मी हडपद ,जयश्री मोरे,जयश्री साळुंखे,संगीता कांबळे,आयेशा सोळाशे अक्षता गावडे ,सविता ओव्हाळ ,रेखा ठेळके, कविता मैदाड ,रुपाली तिकोने ,दीपाली तिकोने ,मीना रंधवे यांनी परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज -अलीकडेच, चिखलीत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापण्यात आले, त्यानंतर तेथील पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला.
पिंपरी : पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसात अनेकविध क्लुप्त्या वापरून एटीएम फोडून बँकांचे लाखो रुपये पळवण्याचा सपाटा सराईत चोरटय़ांनी लावला आहे. अशा आरोपींचा छडा लागत नसल्याने अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. तरीही एटीएम फोडण्याचे गुन्हे सुरूच असल्याने पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येते. एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नसल्याने चोरटय़ांचे चांगलेच फावते, हेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
पिंपरी आयुक्तालयाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम केंद्रातील पैसे ठेवले जाणारे यंत्र फोडून त्यातील पैसे पळवण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांत वाढताना दिसत आहेत. अलीकडेच, चिखलीत गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापण्यात आले, त्यानंतर तेथील पैसे घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. याच परिसरात अशाच पद्धतीने एटीएम फोडण्याचा दुसरा अयशस्वी प्रयत्न झाला. वाकडला पोलीस ठाण्याच्या जवळच असलेले एटीएम केंद्र गॅसकटरच्या साहाय्याने फोडण्यात आले,मात्र त्यात चोरटय़ांना यश आले नाही. या प्रयत्नात त्यातील आठ लाख रुपये जळून खाक झाले. चाकणला एटीएम फोडण्याच्या दोन घटना घडल्या. त्यातील एका घटनेत, एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने, यंत्राला दोरखंड बांधून ते खेचून बाहेर नेण्यात आले. नंतर ते मोटारीत टाकून इतरत्र नेऊन त्यातील रक्कम पळवण्यात आली.
अशा घटनांमध्ये आरोपींनी लाखो रुपये लांबवले आहेत. बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे तपासात पुढे आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला असून बँकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
अशाप्रकारच्या गुन्ह्य़ांसाठी पोलिसांनी विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे. असे गुन्हे करणाऱ्या पाच गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातील दोन टोळ्या राज्याबाहेरील आहेत. एटीएमसंदर्भातील गुन्हे याच टोळ्यांनी केल्याचा संशय पोलिसांना आहे. आम्ही त्यांच्या मागावर आहोत. बॅँकेला सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. – रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी -चिंचवड पोलीस
व्हीएस न्यूज-दहावीसाठी १५ हजार रुपये तर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते.
महापालिकेची शिष्यवृत्ती योजना
पुणे : महापालिकेच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणारे अर्थसाहाय्य विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली. एकूण सात हजार ८७९ विद्यार्थ्यांना १४ कोटी रुपयांची रक्कम आरटीजीएस पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद अर्थसाहाय्य योजना आणि इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजना महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. शहरात राहणाऱ्या, इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत खुल्या गटातील ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी, महापालिका शाळेत किंवा रात्र प्रशालेत शिकणारे विद्यार्थी तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात. तसेच चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनी ६५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळविल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.
दहावीसाठी १५ हजार रुपये तर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली आहे.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये नऊ हजार ८६२ विद्यार्थ्यांचे अर्ज महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले. त्यापैकी सात हजार ८७९ अर्ज अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पात्र ठरले.
महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत अर्थसाहाय्य वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता धीरज घाटे यांच्यासह समाज विकास विभागाचे विभाग अधिकारी सुनील इंदलकर या वेळी उपस्थित होते. पुढील आठवडाभरात हा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यंदा शिष्यवृत्ती अर्थसाहाय्य वाटपाला काही कारणांमुळे विलंब झाला. मात्र पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शिष्यवृत्ती दिली जाईल आणि त्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
व्हीएस न्यूज- फ्लॅटच्या बाथरुममध्ये हा २९ वर्षीय इसम मृतावस्थेत सापडला.
गॅस गिझरमुळे पुण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पुण्यात कोथरुडमध्ये ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी फ्लॅटच्या बाथरुममध्ये हा २९ वर्षीय इसम मृतावस्थेत सापडला. रामराजे किशोर सकपाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.
ससून हॉस्पिटलमध्ये मंगळवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात गुदमरुन रामराजे याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी ही माहिती दिली. रामराजेंच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी तिथे पोहोचले. दरवाजा तोडून त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. बाथरुमचा दरवाजा तोडला, त्यावेळी रामराजे जमिनीवर पडलेले होते. रामराजेंच्या बाथरुममध्ये एलपीजीवर चालणारा गिझर आहे. तिथल्या खिडक्या बंद होत्या. गिझरमधून विषारी वायू गळती झाल्यामुळे रामराजे यांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा अशी शक्यता प्रतिभा जोशी यांनी बोलून दाखवली.
व्हीएस न्यूज -पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात दोन जणांना अटक केली आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातून ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
पुणे शहरातून गेल्या दीड वर्षात चाइल्ड पोर्नोग्राफीचे तब्बल १५० व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात माहिती दिली असून दोन जणांना अटकही केली आहे. या संदर्भात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातून ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राजकिरण पट्टीलाल (वय २४, रा. गुरुवार पेठ) आणि मनोजकुमार झल्लर सरोज (वय १९, रविवार पेठ) या दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे. हे दोघेही मोल-मजुरी करुन आपली उपजीविका भागवतात, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस महासंचालक कार्यालयाने अशा प्रकारच्या व्हिडिओंबाबतची माहिती पुणे पोलिसांनी कळवली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने हे व्हिडिओ कुठून आणि कसे अपलोड झाले याचा तपास केला. दरम्यान, पुण्यातून हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. तपासामध्ये लॅपटॉप आणि मोबाईलमधील इंटरनेटच्या माध्यमातून हे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांच्या हाती सोमवारी यासंदर्भातील लिंक आल्या होत्या. त्यानुसार कुठल्याही आयपी अॅड्रेसवरुन हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते याचा शोध पोलिसांनी घेतला. यामध्ये पुण्यातून १५० क्लिप्स अपलोड झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी ५ गुन्हे दाखल आहेत. तर पुण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002