Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
…आता विवाह नोटीस मिळणार ऑनलाइन

व्हीएस न्यूज - मध्यस्थांचा वावर कमी व्हावा, तसेच विवाहाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विवाहासाठी द्यावयाची नोटीस आता ऑनलाइन पध्दतीने देता येणार आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या विवाह नोंदणी, ई पेमेंट, अर्जदारांना ई मेलवर 30 दिवस मुदतीची नोटीस देणे आदी सुविधा 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.

नोंदणी पद्धतीने विवाहामध्ये पारदर्शी व विनामध्यस्थ सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालयातील गर्दी कमी होऊन मध्यस्थांकडून होणारी आर्थिक लूट पूर्णतः बंद होणार आहे. ऑनलाइन नोंदणीनंतर दोन्ही अर्जदारांच्या नोंदणी संदर्भात ऑनलाइन नोटीस जाहीर केली जाईल, त्यावर हरकती व सूचना ऑनलाइन नोंदवू शकणार आहेत. त्यानंतर 60 दिवसांच्या आत वर-वधू आणि 3 साक्षीदारांसमक्ष विवाह नोंदणी अधिकाऱ्यांसमोर विवाह संपन्न करून प्रमाणपत्र दिले जाईल,’ असेही महानिरीक्षक कवडे यांनी सांगितले.

“विशेष विवाह कायदा,1954′, प्रमाणे वधू-वर यांनी आवश्‍यक त्या अटींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. नोटिशीच्या दिवशी विवाहेच्छुक वधूचे वय 18 वर्षे आणि वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महा ई सेवा केंद्रांवर शुल्क भरून देखील नोंदणी करू शकता येणार आहे. त्यामुळे नोटीस देण्यासाठी विवाह अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. प्रत्येक टप्प्यावर मोबाइल मेसेज येणार आहे. नोटीस बोर्ड संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

...Read More

V. S. News
दुचाकीच्या धडकेत पेरु विक्रेत्याचा मृत्यू

व्हीएस न्यूज - भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पेरु विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास काळेवाडीतील अमरदीप कॉलनीसमोर घडली.केशवराम किसन गनगे (वय 50, रा. अदिनाथ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे.

या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवराम हे त्यांच्या हातगाडीवर पेरूची विक्री करत होते. भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात केशवराम यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाकड ठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार जाहीर

व्हीएस न्यूज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण -2015-16 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यातील 51कामगरांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील 10 कामगारांना देखील पुरस्कार मिळणार आहेत.

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना गुणवंत पुरस्कार देऊन गौरविले जाते. डिसेंबर 2015 मध्ये पुरस्कारासाठी राज्यातील कामगारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. काही तांत्रिक कारणास्तव निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला होता. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 30 ऑक्‍टोबरला सहसचिवांच्या उपस्थितीत कामगारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत कामगारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

गुणवंत कामगारांची नावे पुढीलप्रमाणे महेश मेस्त्री, हनुमंत माळी (टाटा मोटर्स), संजय साळुंखे (लोकमान्य हॉस्पिटल, निगडी), सुनील कुटे (महिंद्रा सी आय ई ऑटो लि.), किशोरकुमार शिंदे, श्रीकांत मुते (एसकेएफ लि.),दत्तात्रय येळवंडे (स्पॅको टेक्‍नॉलॉजी इं. प्रा. लि.), विकास कोरे (किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.), रविंद्र कुलकर्णी (जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि.), कृष्णा ढोकले (हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ).

...Read More

V. S. News
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कष्टकरी महिलांची पिळवणूक

व्हीएस न्यूज महाराष्ट्राबाहेरील मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गेल्या दहा वर्षांपासून कष्टकरी सर्वसामान्य महिलांना कर्जवाटप करून वेठीस धरले आहे. राष्ट्रीयकृत बॅंका गरजूंना कर्ज देत नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हजारो कोटी रूपये मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांच्या घरी जावून वाटले आहेत. याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी केली.

जुनी सांगवी, नवी सांगवी, औंध कॅंम्प, पिंपळे गुरव परिसरातील खासगी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतलेल्या महिलांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण कर्जमुक्ती महिला मेळावा सांगवी येथील सुमनश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोझर बोलत होते. मनसेचे पिंपरी चिंचवड पालिकेचे गटनेते सचिन चिखले, माजी नगरसेविका जयश्री मारणे, शहर सचिव राजू सावळे, रविदास काळे, स्नेहल बांगर, शाम जगताप, हेमंत डांगे, संजय यादव आदी उपस्थित होते.

मोझर पुढे म्हणाले, गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सुरू झालेली महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची आर्थिक चळवळ या खाजगी कंपन्यांमुळे मोडकळीस आली आहे. कष्टकरी सर्वसामान्य महिलांना एकत्रित करून या कंपन्यां घरपोच कर्ज वाटतात. कर्ज परतफेड दर आठवड्याला करावी लागते. महिलांच्या समूहाला कर्ज दिले जाते. मात्र, घरातील पुरूषांना या ग्रुप बैठकीस थांबण्याची परवानगी नसते. समुहाद्वारे दिलेले कर्ज परतफेड करण्यासाठी ग्रुपमधील प्रत्येक महिलेला शेवटच्या कर्जदार महिलेचा कर्जहप्ता भरेपर्यंत थांबावे लागते. मायक्रो फायनान्स ही संकल्पना महाराष्ट्रात आणून त्यांना लायसन्स देण्यात आली आहेत.

आज ही विषावळ कष्टक-यांची आर्थिक पिळवणूक करत मोठी होत आहे. कर्ज परत फेडीसाठी कंपन्यातील ही मंडळी कर्जदार महिलांना, त्यांच्या कुटुंबांना धमकावतात, तुम्हाला दुसरे कुठलेच कर्ज मिळणार नाही,घरातील मुलांना सरकारी नोकरीसाठी अडथळा येईल, अशा धमक्‍या देऊन कर्ज परतफेड करून घेतात. अशा प्रकारचा मानसिक दबाव अनेक कुटुंबे सहन करत आहेत. या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही, तर मनसेसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लवकरच मंत्रालयावर याबाबत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मोझर यांनी सांगितले. आमचा उद्रेक होतो, ते अशा घटनांमुळेच, असेही ते यावेळी म्हणाले.

...Read More

V. S. News
नोटाबंदी विरोधात कॉंग्रेसचे जनआक्रोश आंदोलन

व्हीएस न्यूज - एक वर्षांपुर्वी केलेल्या नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा बाहेर आला नाही. देशभर शेकडो गरीब नागरिकांना प्राण गमवावे लागले. नोटाबंदीचा फायदा फक्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला झाला. शेतक-यांना कर्ज माफी दिल्याच्या कोट्यावधी रुपयांच्या फसव्या जाहीराती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात आली. सोळा महिन्यात एकोणिस वेळा गॅस सिलेंडरची भाववाढ करण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन दारुची विक्री वाढविण्यासाठी दारुच्या बाटलीला महिलांचे नाव द्या असे वक्तव्य करुन महिला भगिनींचा अपमान करतात. या महाजनांना मंत्री म्हणण्याची आम्हाला लाज वाटते. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र सरकारने एक वर्षांपुर्वी केलेल्या नोटाबंदी विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस बिंदू तिवारी, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शाहबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, राजन नायर, नंदा तुळसे, मयुर जैयस्वाल, लक्ष्मण रुपनर, आबा खराडे, मनोज बिशप, सतिश भोसले, मकरध्वज यादव आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
‘फसणवीस’ सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली - रत्नाकर महाजन

व्हीएस न्यूज - एक वर्षांपूर्वी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीवरुन काळापैसा बाहेर काढू, दहशतवादाला पायबंद घालू आणि भ्रष्ट्राचार मुक्त सरकार चालवू असे आश्वासन देणा-या ‘प्रधान सेवकांनी’देशभरातील जनतेची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात मात्र युपीए सरकारने उपलब्ध कायद्याच्या आधारे सर्वाधिक काळा पैसा बाहेर काढला अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार (दि. 7 नोव्हेंबर 2017) रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाजन बोलत होते. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, मागासवर्गिय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जयस्वाल आदी उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, स्वत:ला प्रधान सेवक म्हणून घेणा-यांनी अर्थमंत्री व आरबीआयच्या अधिकारात हस्तक्षेप करुन केंद्रिय मंत्रीमंडळाला कोंडून ठेवून स्वत: दुरचित्रवाहिनी व्दारे 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्याचे समर्थन करताना त्यांनी भ्रष्ट्राचार, दहशतवाद व काळापैसा यातून बाहेर येईल असे सांगितले. प्रत्यक्षात हे सर्व दावे फोल ठरले आहेत. यानंतरच्या कालावधीत त्यांनी दिलेली सर्व आकडेवारी फसवी आहे. प्रत्यक्षात 2012 - 13 मध्ये 29 हजार 730 कोटी; सन 2013 - 14 मध्ये एक लाख एक हजार 183 कोटी; सन 2014 -15 मध्ये 23 हजार 108 कोटी; सन 2015 - 16 मध्ये 20 हजार 721 कोटी; सन 2017 - 18मध्ये 29 हजार 211 कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर काढण्यात आला. या आकडेवारी वरुन युपीएच्या काळात जास्त काळापैसा बाहेर काढल्याचे सिध्द होते. दोन लाख कंपन्यांना नोटाबंदी नंतर टाळे ठोकल्याचे प्रधान सेवक सांगतात मात्र अद्यापर्यंत याची यादी कोठेही उपलब्धं नाही. यामध्ये केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या 200 कंपन्या आहेत का? याची माहिती जनतेला कळायला पाहिजे. आम्ही सांगतो तेच खरे आमच्यावरच विश्वास ठेवा हि सरकारची अपेक्षा आहे. राज्य सरकारवर टिका करताना महाजन म्हणाले ‘फसणवीस’सरकारने राज्यातील शेतक-यांची, महिलांची, विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली आहे. 89 लाख शेतक-यांना इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचे ते सांगतात हि काय अभिमानाची बाब आहे का? अजूनही 34 हजार कोटी कोणत्या शेतक-यांना दिले यादी जाहीर केली नाही. प्रत्यक्षात 4 हजार कोटी दिले असतील असे वाटते. या पारदर्शक सरकारला उरलेल्या दोन वर्षांत लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी राज्यभर कॉंग्रेस रचनात्मक विरोध करेल. या सरकारी यंत्रणेमुळे शेतक-यांच्या आयुष्यातला महत्वाचा पिक - पाण्याचा वेळ वाया गेला. दिवाळीचा मुहूर्त देखिल आता संपला आता काय शिमग्याची वाट पहायची का? अशीही टिका रत्नाकर महाजन यांनी केली.

...Read More

V. S. News
स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी, अन्यथा स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानीच्या समन्वयकांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची घरे नियमित करण्यासाठीचा जी आर ०७ ऑक्टोबर २०१७ रोजी पारित झाला. परंतु, एक महिना उलटूनही प्राधिकरणातील घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु झाली नाही. सहा महिन्याचा कालावधी हा खूप कमी आहे. त्यात आपण दिरंगाई करत वेळ वाया घालवून नागरिकांची फसवणूक करू नये, हा प्रश्न विविध कारणाने रेंगाळत आला आहे. अनधिकृत घरे नियमित करण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरु करावी अन्यथा या विरोधात स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ बोंबाबोंब आंदोलन उभारेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्राधिकरण अधिकारी डॉ. सतीशकुमार खडके यांना निवेदन देताना समितीचे समन्वयक धनाजी येळकर, राजेंद्र देवकर, दत्ता चिंचवडे, प्रशांत सपकाळ, अमोल पाटील, राजश्री शिरवळकर, शिवाजी पाटील, देवेंद्र भदाणे, विशाल पवार, ॲड. प्रतिभा कांबळे, भाग्यश्री सावंत, नयना नारखेडे,अर्चना मेंगडे, सुनिता फुले आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पीसीसीओईमध्ये शहरातील पहिल्या ‘फॉस’ सेंटरचे उद्‌घाटन

शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळणार मोफत सुविधा

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) माहिती तंत्रज्ञान विभागात शहरातील पहिल्या ‘फॉस’ सेंटरचे उद्‌घाटन सीडॅकचे तांत्रिक अधिकारी चंद्रकांत दुधटमल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुंबई आयआयटीच्या समन्वयक विद्या कदम, प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख प्रा.डॉ. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. या सेंटर विषयी माहिती देताना प्राचार्य डॉ. अ.म. फुलंबरकर यांनी सांगितले की, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीटी धोरणानुसार आणि मुंबई आयआयटीच्या सहयोगाने स्पोकन ट्युटोरीयल अंतर्गत पीसीसीओईच्या हे सेंटर उभारण्यात आले आहे. या ‘फॉस’ (FOSS - FREE OPEN SOURCE CENTER) सेंटरमध्ये पिंपरी चिंचवड शहरात शिकणा-या अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत सर्व सुविधा मिळणार आहेत. त्याचा लाभ घेणा-या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देखिल देण्यात येईल. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कॉम्प्युटरच्या सी, सी++, जावा, पायथॉन, पीचपी, लिनकम, लायब्ररी ऑफीस, स्कायलॅब यासारख्या अनेक सेल्फ लर्निंग प्रोग्रॅमींगचा अभ्यास करता येईल. अशी माहिती प्रा. फुलंबरकर यांनी दिली.

यावेळी प्रा. स्वाती शिंदे यांनी फॉस सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या माहिती तंत्रज्ञान साक्षरता अभियानाची माहिती दिली. हे सेंटर उभारण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष एस.डी.गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ.गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रा. वैशाली कुल्लोली, आभार प्रा. सचिन जाधव यांनी मानले.

...Read More

V. S. News
सरकार बाबत देशभरातील जनतेचा भ्रमनिरास - नदीम मुजावर

व्हीएस न्यूज - राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील एनडीए सरकारबाबत देशभरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून आगामी काळात गुजरातसह देशभरातील सर्व निवडणूकांत मतदार राजा भाजपाला घरी बसवेल. त्यांच्या परतीचा प्रवास नांदेड महापालिका निवडणूकीच्या निकालापासून सुरु झाला आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी केले. कॉंग्रेस भवन पुणे येथे शुक्रवार (दि. 3 नोव्हेंबर) रोजी डेविस डेनी देवदास यांची कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली. यावेली आयोजित केलेल्या अल्पसंख्यांक समाज मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन नायर, पुणे शहर अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष पॉल जोसेफ, मेरी डिक्रुज, जॅकलिक फोरस्टर, रफीक मुल्ला, जावेद शेख,

अल्पसंख्यांक विभागाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष फय्याझ शेख, भाऊसाहेब मुगूटमल, मंदार भंगारी, जय सावंत, सिध्दार्थ वानखेडे, आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारने मागील तीन वर्षांत अल्पसंख्यांक, ओबीसी व मागासवर्गीय समाजावर अन्याय केला आहे. या समाजाच्या विकासासाठी केलेली आर्थिक तरतूद वेळोवेळी कमी करुन इतर ठिकाणी वापरली आहे. या समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महागाई निर्देशांकाबरोबर जोडून त्यात दरवर्षी वार्षिक वाढ द्यावी. अशी तरतूद युपीए सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय नियोजन समितीचे सदस्य खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली होती. याकडे दुर्लक्ष करुन एनडीए सरकारने व राज्य सरकारने शिष्यवृत्तीत वाढ न करता त्यासाठी केलेली तरतूद दुसरीकडे वापरली आहे हि अल्पसंख्यांक, ओबीसी व मागासवर्गीय समाजाची फसवणूक आहे. असाही आरोप नदीम मुजावर यांनी केला.

...Read More

V. S. News
लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पिंपरी येथे स्वच्छता अभियान

व्हीएस न्यूज - लोकजनशक्ती पार्टी आणि भीमपूत्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि परिसरात चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सोशल मीडियावर येथील अस्वच्छतेबाबत ‘पोस्ट’व्हायरल झाली होती. त्यामुळे शनिवारी (दि. 4) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे, भीमपूत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप, अरुण मैराळे, दत्ता गोडसे, ज्ञानेश्वर बोरकर, दिनकर ओव्हाळ, संजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर बोराटे, शरद कांबळे, अनिल काकडे, प्रकाश अरसुमुळ, राज साबळे, अंकुश सागर, सुनील घबाळे, मनोज टिगोटे आदी या वेळी भीमपूत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पावणेपाच कोटी वसूल

व्हीएस न्यूज रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 82 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून तब्बल 4 कोटी 82 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई गेल्या सात महिन्यांत करण्यात आली आहे.

एप्रिल ते ऑक्‍टोबर दरम्यान रेल्वेने केलेल्या विविध कारवाईची माहिती प्रशासनाने दिली. यामध्ये रेल्वेत गैरमार्गाने प्रवास करणाऱ्या 77 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 94लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय 12 हजार 500 प्रवासी हे क्षमतेपेक्षा जास्त साहित्य नेत असल्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 11 लाख 33 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिली.

गेल्या सात महिन्यांपैकी ऑक्‍टोबरमध्ये सर्वात जास्त कारवाई करुन दंड आकरण्यात आला आहे. ऑक्‍टोबरमध्ये 33 हजार 58 प्रकरणांमध्ये तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षी याच महिन्यात 31हजार 201 जणांवर कारवाई करुन 1 कोटी 75 लाख 65 हजार दंड जमा करण्यात आला होता. या कामगिरीबद्दल रेल्वेचे पुणे विभाग प्रमुख मिलिंद देऊस्कर यांनी रेल्वेच्या तिकीट तपासणीस विभागाचे कौतूक केले आहे.

म्हणून केली जाते कारवाई

रेल्वे प्रशासनाच्यावतीने अशाप्रकारची कारवाई सतत केली जात असते. काही वेळा विशेष मोहीम राबवून प्रत्येक प्रवाशांचे तिकिट तपासणी केली जाते. विशेषत: लोकल ट्रेन तसेच मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. यामध्ये मग विनातिकीट प्रवासी आढळतात. अनेक वेळा फ्लॅटफॉर्म तिकीट नसतानासुध्दा अनेकजण दिवसभर निरनिराळ्या फ्लॅटफार्मवर फिरत असतात. अशा फुकट्यांना जरब बसवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!