व्हीएस न्यूज - भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पेरु विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास काळेवाडीतील अमरदीप कॉलनीसमोर घडली.केशवराम किसन गनगे (वय 50, रा. अदिनाथ कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे मृत्यू झालेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे.
या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवराम हे त्यांच्या हातगाडीवर पेरूची विक्री करत होते. भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात केशवराम यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाकड ठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव तपास करत आहेत.