व्हीएस न्यूज – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण -2015-16 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यातील 51कामगरांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील 10 कामगारांना देखील पुरस्कार मिळणार आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना गुणवंत पुरस्कार देऊन गौरविले जाते. डिसेंबर 2015 मध्ये पुरस्कारासाठी राज्यातील कामगारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. काही तांत्रिक कारणास्तव निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला होता. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 30 ऑक्टोबरला सहसचिवांच्या उपस्थितीत कामगारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या गुणवंत कामगारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
गुणवंत कामगारांची नावे पुढीलप्रमाणे महेश मेस्त्री, हनुमंत माळी (टाटा मोटर्स), संजय साळुंखे (लोकमान्य हॉस्पिटल, निगडी), सुनील कुटे (महिंद्रा सी आय ई ऑटो लि.), किशोरकुमार शिंदे, श्रीकांत मुते (एसकेएफ लि.),दत्तात्रय येळवंडे (स्पॅको टेक्नॉलॉजी इं. प्रा. लि.), विकास कोरे (किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.), रविंद्र कुलकर्णी (जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि.), कृष्णा ढोकले (हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ).
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002