व्हीएस न्यूज – उभ्या केलेल्या कारची काच फोडून सुमारे सात लाखांचा ऐवज चोरला. ही घटना सोमवार दि. 6 ला खराळवाडी येथील बीएसएनएल ऑफीसजवळ दुपारी दीड वाजता घडली.
याप्रकरणी परेश चव्हाण (वय 32, रा. अजमेरा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गाडीतील चार्जर, मॅकबुक, फिट बिट कंपनीचे ब्लेझ घड्याळ, इतर साहित्य असलेली सॅक, तसेच 5 लाख 33 हजार रोख रक्कम असा 6 लाख83 हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळवला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजमधून चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे. पिंपरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे तपास करत आहे