महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या राज्य परिषदेचे चिंचवडमध्ये शानदार उद्घाटन
व्हीएस न्यूज - - विद्वत्ता आणि विव्दानाची कधी तुलना होऊ शकत नाही. सर्वांनी नेहमी आपले कौशल्य एकमेकांशी संवाद साधत अद्ययावत ठेवावे. डॉक्टर आणि समाजातील सर्व घटकांचा संवाद असला पाहिजे. या संवादातून निर्माण होणारी ऊर्जा समाज हितासाठी खर्च झाली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. यातूनच निरामय, सुदृढ समाजनिर्मिती निर्माण होईल. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता हे खूप महत्वाचे आहे. वैद्यकीय व्यवसायात काम करणे म्हणजे समाजसेवेची चांगली संधी आहे. वैद्यकीय पेशा हे 'नोबेल प्रोफेशन' आहे, असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.
इंडियन डेन्टल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनच्या 56 व्या राज्य परिषदेचे उद्घाटन नांगरे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुजित विंचेकर, इंडियन डेन्टल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर माऊली फरांदे, वायसीएम रुग्णालायाचे दंतविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. मनिष फरांदे, डॉ. श्रीकांत गर्जे, डॉ. संदीप भिरूड, डॉ. निखिल दिवाण, डॉ. जुई तुपे, डॉ. दिपाली पटेकर, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. अमित पाटणकर, डॉ. सचिन कोचेकर आदी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना नांगरे पाटील म्हणाले की, वैज्ञानिक प्रगतीमुळे मोठ्याप्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरुण पिढी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करीत आहे. त्याचा प्रभाव वाढला आहे. मात्र या माध्यमांचा चुकीच्या पध्दतीने वापर होता कामा नये. तुम्ही स्विकारलेल्या वैद्यकीय पेशातून समाजाला काही तरी चांगले देऊ शकता. चांगल्या समाजनिर्मितीस तो एक हातभार लागेल.
दिवस-रात्र काम करावे लागत असल्याने पोलीसांवर कामाचा फार ताण आहे. पोलीस आणि डॉक्टर यांच्यावर हल्ला होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. परंतु, आपण संघटीतपणे काम केल्यास अशा घटनांना लगाम घालू शकतो. स्वतःच्या शक्तीबद्दल माहिती, विश्वास नसेल तर विजय आणि पराभव यांचा सामना करावा लागेल. परंतु, शांततेच्या काळातच अधिक घाम गाळला तर युध्दाच्या काळात कमी रक्त सांडते. कधी मोठे व्हावे, कधी छोटे व्हावे तसेच कधी मृदू तर कधी कठोर व्हावे हे आपल्याला कळले पाहिजे. आपल्या स्वभावात व्देष, तिरस्कार, असुया नसावी. गुण व अवगुणांसह एखाद्याला स्वीकारणे म्हणजेच प्रेम होय, असेही नांगरे पाटील म्हणाले.
दरम्यान उद्घाटनप्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नांगरे पाटील तसेच अन्य उपस्थितांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. राकेश प्रसाद यांनी तीन दिवसांच्या परिषदेमध्ये होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. देशभरातून 4300 दंत वैद्य आणि विद्यार्थी या परिषदेत सहभाग नोंदवला आहे. ॲटोक्लस्टर, सायन्स पार्क येथील सहा हॉलमध्ये एकुण 118 चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेकडो विद्यार्थी आपले पीएचडीचे प्रबंध सादर करणार आहेत. याबरोबरच दंत वैद्यकशास्त्रातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे देश-विदेशातील कंपन्यांचे स्टॉल कार्यक्रमस्थळी उभारण्यात आले आहेत.
डॉ. अशोक ढोबळे आपल्या भाषणात म्हणाले की आयडीएची प्रगती फार जोमाने होत आहे. 56 व्या राज्यस्तरीय परिषदेसाठी पिंपरी चिंचवड शाखेने खूप कष्ट घेतले असून त्याचे फलस्वरूप म्हणजेच डॉक्टर, विद्यार्थी यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात मौखिक कर्करोगामुळे मृत्यू पावणा-यांची संख्या अधिक आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी इंडियन डेन्टल असोसिएशनने मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहेत. तसेच फॉरेन्सिक ओरोलॉजीवर आयडीए काम करत आहे. यामध्ये पोलीस दलाची मदत घेण्यात येईल, असे डॉ. ढोबळे यांनी सांगितले.
डॉ. विश्वास पुराणिक यांनी पिंपरी चिंचवड शाखा ज्येष्ठ दंत वैद्य डॉ. माऊली फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करत असल्याबद्दल कौतुक केले. गेल्या काही काळापासून डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अशा वाईट प्रवृत्ती रोखण्यासाठी संघटन होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संघटन झाल्यास अशा घटनांना लगाम बसेल, असेही डॉ. पुराणिक म्हणाले.
डेन्टिस्टला आता सुवर्णकाळ आला आहे. पूर्वी दाताचे डॉक्टर असतात, अशी माहितीच लोकांना फारशी नव्हती. परंतु, आता काळ बदला असून चांगला डेन्टिस्ट कोण आहे, याचा शोध रुग्ण घेतात. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे. सकारात्मक दृष्टीने काम केल्यास त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळते. मला राजकारणाची आवड असल्यामुळेच मी दोन वेळा आमदार होऊ शकलो, असे आमदार डॉ. सुजित विंचेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्ही.व्ही.एस. वर्गीस, मनिषा यांनी केले. तर आभार डॉ. अभिजीत फरांदे यांनी मानले.
26/11 हल्ल्याची होती पूर्व कल्पना...
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची पूर्व कल्पना दीड-दोन महिने आधिच मिळाली होती. त्यावेळी मी आधिच हॉटेल ताजची रेकी केलेली असल्याने अतिरेक्यांच्या पाठोपाठ म्हणजे 11 मिनिटात घटनास्थळी पोचलो होतो. 23 व्या मिनिटाला अतिरेक्याला टिपले. अतिरेकी कोठे जाऊ शकतात, कोणत्या ठिकाणी आपण त्यांची कोंडी करू शकतो याची कल्पना मला असल्यानेच अतिरेक्यांच्या गोळीबाराला प्रतित्तोर देवून सुखरूप बचावलो. पुणेकर नागरिकांनी रेव्ह पार्टी कारवाईबाबत मला खूप सहकार्य केले. अमंली पदार्थांच्या व्यापारातून युवकांना टार्गेट केले जात आहे. सोशल मीडियाचे ॲडिक्शन आणि युवकांना पडलेला अमंली पदार्थांचा विळखा ही चिंतेची बाब असल्याचे विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
व्हीएस न्यूज - रिक्षा थांबा सुरू ठेवण्यास काही संघटनांनी विरोध केल्यामुळे रूपीनगर येथील रिक्षा चालक व संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद पोलीसांनी मध्यस्थी करून रिक्षा थांबा सुरू केला आहे. तसेच इतर संघटनांनी रिक्षा चालकांना त्रास न देण्याची तंबीही पोलीसांनी दिली आहे. रूपीनगर येथिल रिक्षा चालकांना रिक्षा थांब्यावर व्यवसाय करण्यास काही संघटनांनी विरोध केला होता. याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांच्या भेट घेत. रिक्षा चालकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. निगडी पोलीसांनी तात्काळ लक्ष घालत रूपीनगर येथील रिक्षा थांबा सुरू केला आहे. यावेळी धर्मराज जगताप, जॅकब मॅंथिव, नारायण लोखंडे, पंडित अँथनी, हाफिज मुल्ला, हुजूर शेख, ज्ञानेश्वर जगताप, इम्रान शेख, फिरोज शेख, आकाश काळभोर, सिकंदर शेख, विक्की जाधव, कलेश्वर सरवदे, सहरफुद्दीन सय्यद, सोहेल अत्तर आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पुर्ववैमन्यसातुन तरुणावर प्राणघातक हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी बुधवारी आणखी पाच जणांना अटक केली. यापुर्वी पोलिसांनी या घटनेसंदर्भात चार जणांना अटक केली होती.
मयुर कालिदास चव्हाण (वय25), आशिस संजय लोखंडे (वय20), गुड्ड्या उर्फ महेश दिलीप मोरे (वय19) निखिल दिपक एडलेल्लु (वय19) व विशाल प्रकाश वाघमारे (वय 18सर्व रा. बोपोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापुर्वी पोलिसांनी या घटनेसंदर्भात रविवारी आशिष उर्फ मट्टा मुकेश मायकल (वय23), अभिजित प्रकाश कांबळे (वय28), सनी संतोष ओव्हाळ (वय19) व प्रसाद प्रकाश डंबाळे(वय19)यांना अटक केली होती. आतापर्यत एकुण नऊ आरोपींना अटक केली आहे. चार आरोपींना खडकी न्यायालयाने गुरूवारपर्यत पोलिस कोठडी सुनावली होती. या चार आरोपीसह बुधवारी अटक केलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी गुरूवारी न्यायालयात हजर केले असता चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावित त्यांची येरवडा काराग्रुहात रवानगी करण्यात आली. तर पाच आरोपींना दि. 10 पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी मनोज शेळके व सर्व आरोपी हे बोपोडी सर्व्हे नंबर 25 व 26 येथे रहायला आहेत. शेळके व आरोपींमध्ये पुर्वीची भांडणे होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. रविवारी रात्री 9 वाजता शेळके सांगवी येथिल एका मित्राला भेटुन घरी जात असताना बोपोडी येथिल जय मात्रुभुमि चौकात अडवुन प्रथम शिवीगाळ केली. आरोपी चव्हाण व डंबाळे यांनी शेळके यांना सिंमेटच्या गटुटुने मारहाण केली. नंतर मायकलने जख्मी शेळकेस दुचाकीवर बसवुन पिंपरी येथिल स्मशानभुमित नेले तेथे चव्हाण याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. तर लोखंडे याने बिअरच्या बाटलीने मारहाण केली. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये शेळके गंभीर जख्मी झाला. शेळकेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस उपनिरिक्षक मदन कांबळे अधिक तपास करित आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. बुधवारी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित करणार असलेल्या पवनाथडी जत्रेत स्टॉल मिळण्यासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीस वाढ मिळावी अशी सूचना उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली आहे. शुक्रवारी उपमहापौरांनी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले असून त्यात ही सूचना केली आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे पवनाथडी जत्रा दरवर्षी आयोजित करण्यात येते. यावर्षी ही जत्रा 4 ते 8 जानेवारी 2018 या कालावधीत होणार आहे. त्यामध्ये स्टॉल मिळविण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार दि. 8 डिसेंबर पर्यंत होती. परंतु शहरातील बऱ्याच बचतगटांचे अर्ज भरणे राहून गेल्यामुळे ही मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावी अशी सूचना उपमहापौरांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - प्रतिनियुक्तीवर आलेले सहा. आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचा महापालिकेतील कार्यकाल उलटून गेल्यामुळे त्यांना शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात यावे अशी मागणी रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. वाघेरे यांनी गुरुवारी आयुक्तांना या बाबत निवेदन दिले आहे. वाघेरे हे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत.
निवेदनात वाघेरे यांनी असे म्हटले आहे की, सहा. आयुक्त डोईफोडे 5 ऑगस्ट 2014 रोजी महापालिकेमध्ये रुजू झाले होते. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाल 5 ऑगस्ट 2017 रोजीच संपला आहे. तरीही त्यांना अद्याप शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात आलेले नाही. ते आपल्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यामुळे त्यांचे आर्थिक हितसंबंध प्रस्थापित होऊ शकतात तरी त्यांना शासनाकडे परत पाठवावे. या निवेदनाच्या प्रती महापौर, सभागृह नेता, विरोधीपक्ष नेता यांना देण्यात आल्या आहेत.
व्हीएस न्यूज - रिक्षा, सहा सिटर, जीप अशा वाहनातून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलीसांनी जनजागृती मोहिम सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील मुख्य चौकात, महामार्गालगत फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे फलकच अवैध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या मार्गावर वाहतूक पोलीसांच्या वतीने अवैध फलक लावण्यात आल्याची तक्रार महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी पालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर शनिवारी केली आहे. याबाबत ऍड. चरण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिक्षा, सहा सिटर, जीप अशा वाहनातून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलीसांनी जनजागृती मोहिम सुरू केली आहे. या जनजागृतीचे फलक शहराच्या मुख्य चौकात दर्शनी भागात लावण्यात आले आहे. हे फलक अवैध आहे. त्यामुळे कायदा सांगणारेच जर कायदा मोडू लागल्यानंतर कायदा, नियम सर्वसामान्य नागरिक तरी कसे पाळतील? असा सवालही ऍड. चरण यांनी उपस्थित केला आहे. तसेच शहराच्या विविध भागात लावलेले अनधिकृत जाहिरात फलकांवरही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी ऍड. चरण यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - खेळायला म्हणून घेऊन गेलेल्या एका 18 वर्षाच्या तरुणाने तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. निगडी पोलीसांनी नराधमाला अटक केली आहे.
शिवप्रसाद यादव (वय-18 रा. चिखली, मुळ गाव उत्त्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी उत्तरप्रदेश मधील एका गावातील रहिवाशी आहेत. मुलीच्या वडिलांनीच आरोपीला पुण्यात कामासाठी आणले होते. आरोपी भंगार गोळा करायचे काम करत असून मुलीच्या घरा शेजारीच रहायला आहे. गुरुवारी सायंकाळी त्याने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पीडित चिमुकलीला घेऊन गेला. व तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यावर आपल्यासोबत घडलेला प्रकार चिमुकलीने आई वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिमुकलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत
व्हीएस न्यूज – भरधाव वेगात असणाऱ्या पीएमपीएल बसच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल येथे आज रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभव तुळशीराम खडसे असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी –रहाटणी पीएमपीएल गाडी क्रमांक एमएच १२ एचबी ०८७७ ही बस आपल्या दैनंदिन वेळेनुसार प्रवासी घेवून जात होती. या मार्गाने दुचाकीस्वार तरुण आपल्या एमएच १४.डीआर ७८७० या वाहनाने जात असताना पीएमपीएल बसची जोरदार धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे बघ्यांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. तसेच, मुख्य रस्ता असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. त्याठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी गर्दी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ होवू लागल्याने पोलिसांना खबर देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अपघातस्थळी दाखल होवून मृतदेह हलविण्यात आला. बस भरधाव वेगात असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आले. सध्या पीएमपीएल बसेच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून चालकांनी बसेस सावकाश चालवावी , अशी मागणी होत आहे.
व्हीएस न्यूज - आधार केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांमध्ये सुमारे ८० टक्के नागरिक हे आधारकार्डमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी येत आहेत. हे काम अवघ्या पाच मिनिटांत करणारी ‘अपडेट्स क्लाइंट लाइफ’ (यूसीएल) हे ५० कीट येत्या दोन ते तीन दिवसांत प्रशासनाकडे येणार आहेत. शहरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये असलेल्या केंद्रांमध्ये ही कीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे,’ असे‘आधार’ चे नोडल ऑफिसर तहसीलदार विकास भालेराव यांनी सांगितले.
‘जिल्ह्यात १९६ आधार केंद्र सुरू आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत ८४, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरात ४९ आणि ग्रामीण भागात ६३ केंद्र आहेत. नव्याने आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या कमी आहे. सुमारे ८० टक्के नागरिक हे आधारकार्डमध्ये दुरुस्ती किंवा माहिती अद्ययावत करण्यासाठी येतात. हे काम करताना एका नागरिकासाठी किमान दहा ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे एका मशिनवर दिवसभरात सुमारे २५ नागरिकांना सेवा देता येते. दुरुस्ती किंवा माहिती अद्ययावत वेगाने होण्यासाठी ‘यूसीएल’ हे कीट घेण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे पाच मिनिटांत माहिती अद्ययावत होते.’ असे भालेराव यांनी स्पष्ट केले.
‘येत्या दोन ते तीन दिवसांत ५० कीट उपलब्ध होणार आहेत. ही कीट प्रामुख्याने क्षेत्रीय कार्यालयांमध्ये असलेल्या केंद्रांमध्ये दिली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे काम कमी वेळेत होऊ शकणार आहे.’ असे भालेराव म्हणाले.‘काही ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅनिंग होत नसल्यास संबंधित ज्येष्ठ नागरिकांची नोंद करून त्याबाबतची पावती यूआयडीकडे पाठविली जाणार आहे. विशेष बाब म्हणून यूआयडीकडून संबंधित नागरिकांचे आधारकार्ड मिळू शकणार आहे.’ असे भालेराव यांनी नमूद केले.
‘बीएसएनएल’मधील आधार केंद्र
बाजीराव रोड, शुक्रवार पेठ.
चिंचवड पोस्ट ऑफिसजवळ, चिंचवड.
पंचमी हॉटेलजवळ, सातारा रोड.
मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर.
हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट.
धनकवडी पोस्ट ऑफिसजवळ, धनकवडी.
गोल्फ क्लब, एअरपोर्ट रस्ता, येरवडा.
सीटीओ कम्पाउंड, मुख्य पोस्ट कार्यालय, पुणे स्टेशन.
भोसरी टेलिफोन एक्स्चेंज, भोसरी.
पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्र.
सिटी पोस्ट, लक्ष्मी रस्ता.
मुख्य पोस्ट कार्यालय, पुणे स्टेशन.
जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर.
चिंचवड इस्ट, पुणे मुंबई रस्ता.
पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, पर्वती पायथा.
जुना पुणे- मुंबई रस्ता, पिंपरी.
व्हीएस न्यूज - ‘रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी केल्यानंतर देशातील व्यावसायिक बँकांनी आपले व्याजदर कमी करणे आवश्यक आहे,’ अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ आणि ‘इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने ‘वेगवान आर्थिक विकास’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘अर्थपुरवठा सुरळीत रहावा आणि महागाईही नियंत्रणात रहावी, ही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून पतधोरण निश्चित करण्यात येते. त्या दृष्टिने रेपो दरांमध्ये बदल झाल्यानंतर त्याचे परिणाम योग्य पद्धतीने जाणवण्यासाठी व्यावसायिक बँकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. रेपो दर कमी झाल्यानंतर व्यावसायिक बँकांनी त्याच प्रमाणात व्याजदर घटविणे आवश्यक आहे. त्यातूनच कर्जे कमी दरात उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल.’
‘बँकांनी व्याजदर कमी केल्यावर राष्ट्रीय उत्पन्नात सुधारण होईल; तसेच गुंतवणुकीस चालना मिळून रोजगारातही वाढ होईल. सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढून विकासाचा दर वाढेल,’ अशी मांडणी पटेल यांनी केली. महागाई नियंत्रण आणि अर्थव्यवस्थेतील स्थैर्य यांचा विचार करून रिझर्व्ह बँक काळजीपूर्वक निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002