सहाय्यक आयुक्त डोईफोडेंना परत शासनसेवेत पाठविण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड
2017-12-10
व्हीएस न्यूज - प्रतिनियुक्तीवर आलेले सहा. आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचा महापालिकेतील कार्यकाल उलटून गेल्यामुळे त्यांना शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात यावे अशी मागणी रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. वाघेरे यांनी गुरुवारी आयुक्तांना या बाबत निवेदन दिले आहे. वाघेरे हे माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत.
निवेदनात वाघेरे यांनी असे म्हटले आहे की, सहा. आयुक्त डोईफोडे 5 ऑगस्ट 2014 रोजी महापालिकेमध्ये रुजू झाले होते. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाल 5 ऑगस्ट 2017 रोजीच संपला आहे. तरीही त्यांना अद्याप शासनाच्या सेवेत परत पाठविण्यात आलेले नाही. ते आपल्या पदावर ठाण मांडून बसले असून त्यामुळे त्यांचे आर्थिक हितसंबंध प्रस्थापित होऊ शकतात तरी त्यांना शासनाकडे परत पाठवावे. या निवेदनाच्या प्रती महापौर, सभागृह नेता, विरोधीपक्ष नेता यांना देण्यात आल्या आहेत.