दलित स्वयंसेवक संघाचा ४० वा वर्धापनदिन मोठया उत्साहात साजरा.
चऱ्होली बु.
2017-12-09
व्हीएस न्यूज - दलित स्वयंसेवक संघाचा ४० वा वर्धापनदिन मोठया उत्साहात चऱ्होली बु. पुणेयेथे साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त समाज प्रबोधनावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. येशवंत गोसावी यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात ते म्हणाले की, महाभारतामध्ये ज्या श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या भगवान श्रीकृष्णाचे गुरु सांदिपनी हे होते व सांदिपनी महाराज हे मातंग समाजाचे होते,त्याच प्रमाणे क्रांतीकारी वासुदेव फडके व महात्मा फुले यांचे गुरु वीर लहुजी साळवे हे मातंग समाजाचे होते. तसेच रशियामध्ये श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे साहित्यिक आण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे होते. अशी सामाजिक परंपरा असताना आजचा समाज कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे म्हणून मा.मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे आपल्या भाषणात म्हणाले माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते दलित स्वयंसेवक संघाने घडविले. सामाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम या संघाने केले. आजच्या तरुणाने शिक्षणाची कास धरून वाचन करणे अतिशय महत्वाचे आहे. वाचनाने माणूस घडतो असे ते म्हणाले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघप्रमुख श्री. सोपानराव चव्हाण होते. प्रास्ताविक श्री. दादासाहेब सोनावणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.देविदास पारधे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री.बाळशीराम पाटोळे,श्री. बाळासाहेब पाटोळे, श्री. बापूसाहेब भोसले व अमोल पाटोळे यांनी केले.
श्री. राजाभाऊ धडे, सिद्धार्थ जाधव, प्रकाश जगताप, धनंजय भिसे, बबनराव पाटोळे, बाळसो लोंढे, ज्ञानदेव पवार, महादेव भडांगे तसेच सोलापूर येथून नानासाहेब मोरे, अक्कलकोट येथून सुनील खवले, प्रकाश मांढरे, विकास मोरे, दीपक देडे तसेच नकुसाताई लोखंडे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.