तीन वर्षाच्या चिमुकलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; नराधम गजाआड
निगडी
2017-12-10
व्हीएस न्यूज - खेळायला म्हणून घेऊन गेलेल्या एका 18 वर्षाच्या तरुणाने तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. निगडी पोलीसांनी नराधमाला अटक केली आहे.
शिवप्रसाद यादव (वय-18 रा. चिखली, मुळ गाव उत्त्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी उत्तरप्रदेश मधील एका गावातील रहिवाशी आहेत. मुलीच्या वडिलांनीच आरोपीला पुण्यात कामासाठी आणले होते. आरोपी भंगार गोळा करायचे काम करत असून मुलीच्या घरा शेजारीच रहायला आहे. गुरुवारी सायंकाळी त्याने खेळायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पीडित चिमुकलीला घेऊन गेला. व तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यावर आपल्यासोबत घडलेला प्रकार चिमुकलीने आई वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चिमुकलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत