व्हीएस न्यूज - कर्नाटक बॅंकेचे एटीएम मशीन उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे गुरुवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी अनुपम कुलकर्णी (वय 36 रा. बालेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे कर्नाटक बॅंकेची शाखा आहे. शाखेच्या शेजारी असणाऱ्या बॅंकेच्या एटीएम मशीन रुममध्ये अज्ञाताने मशीन उचकटून चोरीचा प्रयत्न केला आहे. पोलीसांनी एटीएम रुम व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे.