व्हीएस न्यूज - बजाज एज्युकेशन इनिशिएटीव्ह अंतर्गत जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने व पुणे डस्ट्रीक्ट योगा फिटनेस इन्स्टिट्यूट ज्ञान प्रबोधिनी यांच्या तांत्रिक सहकार्याने आंतरशालेय क्रीडा योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 10 शाळेतील 80 योगा स्पर्धकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद नोंदविला. आकुर्डी येथील बजाज कल्चर सेंटरमध्ये झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन जानकीदेवी बजाज संस्थेचे मुखर्जी, बजाजचे असिस्टंट मॅनेजर चंद्रकांत पांगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुलींच्या गटात प्राधिकरणातील मुकबधीर विद्यालयाची समृध्दी मोलपोटे प्रथम, सुहाना अन्सारी व्दितीय, आकुर्डीतील वसंतदादा पाटील विद्यालयाची लक्ष्मी बाजेनोर तृतीय तर संजना साळवे चतुर्थ तर प्राधिकरण मुकबधीर विद्यालयाच्या प्रिया यादव हिने पाचवा क्रमांक पटकाविला. मुलांच्या गटामध्ये निगडीतील मॉडर्न हायस्कूलचा शंतनू सकट प्रथम, आदित्य खंडाळे द्वितीय, अर्थव गुरव तृतीय, चिंचवडच्या मातृसेवा विद्यालयाचा अमित शिंदे चतुर्थ तर मॉडर्नचा अजिंक्य साठेने पाचवा क्रमांक पटकाविला आहे.