महाराष्ट्र मिलीटरी फोर्स तर्फे महेश विद्यालय कोथरूड ते गांधी भवन पायी रॅलीचे आयोजन.
पुणे
2017-12-16
विजय दिवस उत्साहात साजरा ..
व्हीएस न्युज - दि .१६. १२. १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यात झालेल्या निर्णायक युद्धात पाकिस्तानने भारताची बिनशर्त शरणागती पत्करली होती.हि इतिहासातील सर्वात मोठी शरणागती म्हणून ओळखली जाते.दि.१६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
ह्या दिवसाचा सन्मान व नागरिकांना आपल्या सैन्यदलाच्या शौर्यगाथाची माहिती व्हावी म्हणून महाराष्ट्र मिलीटरी फोर्सने दि. १६.१२. २०१७ रोजी महेश विद्यालय कोथरूड ते गांधी भवन पायी रॅलीचे आयोजन केले. ह्या रॅलीत महाराष्ट्र मिलिटरी फोर्स आणि विवीध शाळा व कॉलेजेसचे सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी झाले.'हा कार्यक्रम नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण करणारा आहे.आजच्या असुरक्षितेच्या आयुष्यात प्रत्यक नागरिकाने सैनिकी शिक्षण घेतलेच पाहिजे' असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रितेश गुप्ते ह्यांनी व्यक्त केले.
सदर रॅलीमध्ये समाजासाठी,सैनिकीकरणासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ह्यामध्ये कर्नल सुरेश पाटील(ग्रीन थंब संस्था),सौ .शर्मिष्ठा गुप्ते - शिंदे(गृहविषयक),डॉ. बहार कुलकर्णी(शाश्वत हॉस्पिटल),श्री.वा.ना.अभ्यंकर(ज्ञान प्रबोधिनी)इत्यादींना विशेष सेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.