व्हीएस न्यूज - चिखली रोडवरील इंद्रायणी वजन कट्याजवळ कचरा व भंगाराच्या सामानाला गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पिंपरी, भोसरी, निगडी प्राधिकरण, तळवडे येथील अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि स्थानिक रहिवासी दिनेश जाधव यांच्या 2 टॅंकर पाण्याने ही आग विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप कळू शकते नाही. सुका कचरा व भंगरामधील प्लॅस्टिकच्या सामानामुळे आग जास्त भडकली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर रात्री एकच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. आग पूर्णपणे विझली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.