व्हीएस न्यूज - रिक्षा चालक मालकांनसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करू, ओला उबेर या भांडवलदार कंपन्याना नियम तयार करू, त्यांना परिवहन कायदा लागू करू, रिक्षा पॅसिगसाठी अद्यावत ट्रॅक उपलब्ध करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नागपूर येथे महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांच्या र्मोर्चाला आश्वासन दिले.
ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी कृती समिती अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला.
नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्यातील रिक्षा संघटना आणि रिक्षा चालक मालक मोठया संख्येने उपस्थित होते. विधानभवना समोर पोलिसांनी मोर्चा अडवला. याठिकाणी रिक्षा चालकांनी ठिय्या मांडत जाहिरसभा घेतली.
परिवहन मंत्री यांनी स्वतः येऊन रिक्षा चालकांचे निवेदन स्विकारावे अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी भूमिका रिक्षा चालकांनी स्विकारल्यामुळे परिवहनमंत्री रावते स्वतः निवेदन घेण्यासाठी आंदोलनस्थळी आले. आमदार गौतम चाबुकस्वार, प्रतापराव पाटील चिखलीकर, कपिल पाटील, जयदेव गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी महाराष्ट्रातील रिक्षा चालकांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे. पुणे सह महाराष्ट्रातील सर्व जिल्यात रिक्षा पासिंग साठी ट्रॅक उपलब्ध करावे रिक्षा साठी 100 मिटर ट्रॅक ला मान्यता देण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी सरकारने मोबाईल ऍप तयार करावे आदी मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री रावते यांनी दिले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002