मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या धडकेत महिलेचा मृत्यू
आकुर्डी
2017-12-19
व्हीएस न्यूज - मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकात घडली. मृत्यू झालेल्या महिलेचे वय अंदाजे 40 असून अद्यापर्यंत ओळख पटली नाही. ही महिला आकुर्डी रेल्वे स्थानकातील रेल्वे फलटाच्या शेवटी थांबली होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-विशाखापट्टणम एक्सप्रेसची जोरात धडक तिला बसली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.
महिलेचे वय अंदाजे 40 आहे. अंगावर गुलाबी रंगाची साडी आणि काळा ब्लाऊज परिधान केला आहे. संबंधित महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.