व्हीएस न्यूज - चाकण एमआयडीसी परिसरात एका युवकाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसीतील मर्सिडीज बेंझ कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी हद्दीत सारा सिटी ते मर्सिडीज बेंझ कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला ३५ वर्षीय युवकाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही हत्या कोणी व कशासाठी केली हे अद्याप समजू शकलेले नाही. डोक्यात दगड घातल्याने मृतदेहाची ओळखही पटू शकलेली नाही. मृताकडे आढळून आलेल्या ऐवजावरून चाकण पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.