व्हीएस न्यूज - अजामिनपात्र गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांवरही दाखल असून हे कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराला दोघेही जबाबदार असतानाही त्यांना सरकार अटक करत नाही. या दोघांपुढे सरकार झुकले आहे, अशी जहरी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
पोलिसांनी महाराष्ट्र बंद आंदोलनानंतर कोबिंग ऑपरेशन राबवून कार्यकर्त्यांची धरपकड केली. कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचा अधिकार पोलिसांना नाही, आम्ही याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दोन प्रकारच्या हिंदू संघटना भारतात आहे, त्यातली एक संघटना लोकांमध्ये जाते, तर दुसरी आपले मत लोकांवर लादत असते. ही दुसरी संघटना आता हिंसाचारावर उतरली आहे आणि हिंदूंनाच मारण्यास सुरुवात केली आहे. भारतात प्रत्येक राज्यात अशाप्रकारचे हाफिज सईद आहेत, असा घणाघात आंबेडकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणानंतर चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली होती. पण ही समिती अद्याप नेमण्यात आली नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002