मला लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळेल कि नाही हे माहीत नाही
नवी दिल्ली
2018-02-01
व्हीएस न्यूज – भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासमोर कोणते राजकीय पर्याय उपलब्ध असतील हे येणारा काळच ठरवेल, असे सुचक वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आपला आगामी लोकसभा निवडणूकही लढवण्याचा निर्धार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. कारण आपल्याला भाजप तिकीट देईल का नाही याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी शत्रुघ्न सिन्हा यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचामध्ये सामील झाले होते. यामध्ये अभिनेते आणि दुखावलेले अनेक राजकारणातील व्यक्ती सामील झाल्या आहेत. मला मत व्यक्त करण्याचा अधिकार भाजपमध्ये नसल्यामुळे या राष्ट्रीय मंचामध्ये मी सामील झालो असल्याचे सिन्हा म्हणाले. राजकारणात एक स्वतंत्र विचार मांडण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ उभे केले असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना सिन्हा म्हणाले की, भाजप मला तिकिट देईल कि नाही हे मला माहीत नाही. परंतु, मला त्यांना हेच विचारावे लागेल की ते मला तिकीट का देऊ शकणार नाहीत. माझ्याजवळ मोठा मतदार वर्ग असल्यामुळे मला निवडणुकीची भीती नाही. त्यामळे मी काय निर्णय घ्यावा हा येणारा काळच ठरवेल असे सूचक वक्तव्य सिन्हा यांनी केले आहे.