Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
मुख्यमंत्री न भेटल्याने आमदारांचा मंत्रालयाच्या दारात ठिय्या

व्हीएस न्यूज - औरंगाबाद दंगलीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्याने मुस्लिम आमदारांनी मंत्रालयाच्या दारात ठिय्या मांडला. मुख्यमंत्र्यांना पालघर निवडणुक प्रचारासाठी वेळ मिळतो मात्र औरंगाबाद दंगलीसंदर्भात भेट घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप आमदारांनी केला. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याने वारिस पठाण, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, अबू आझमी यांनी मंत्रालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले.

औरंगाबाद शहरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून दोन गट तुफान हणामारी झाली होती आणि त्यातून हिंसाचार झाला होता. शहरातील मोतीकारंजा परिसरात दोन गटात तलवारी, चाकूसह शुक्रवारी रात्री भिडले. जमावाने शहागंजमध्ये केलेल्या जाळपोळीत एकाचा तर पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलिस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी झाले आहेत.

...Read More

V. S. News
कुमारस्वामींच्या शपथविधिला शरद पवार उपस्थित राहणार

 व्हीएस न्यूज - अनेक राजकीय घडामोडीनंतर जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी (दि. २३ मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्‍हणजे या शपथविधी सोहळ्याला राष्‍ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार उपस्‍थित राहणार आहेत. कुमास्‍वामी यांनी शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार यांना निमंत्रण दिले आहे.

कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यादिवशी विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशभरातील प्रमुख १७ विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुमारस्‍वामी यांनी शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. या निमंत्रणात शरद पवार यांचाही समावेश आहे. कुमारस्‍वामी यांचे निमंत्रण स्‍वीकारून ते शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार असल्‍याचे वृत्‍त आहे.

कुमारस्वामी यांनी मायावती यांनाही निमंत्रण दिले आहे. त्‍यामुळे मायावतीही बुधवारी या शपथविधीला येणार आहेत. कुमारस्वामी यांनी मार्क्सवादी तसेच भाकपा नेत्यांनाही निमंत्रण दिले आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तामिळ अभिनेते रजनीकांत, सीताराम येचुरी हेही नेते शपथविधीला हजर राहणार असल्‍याची चर्चा आहे. दरम्‍यान, हिंदू महासभेने कुमारस्वामी यांच्या शपथविधीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट तयार झाले आहे. हिंदू महासभेने कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा संविधानाला धरून नाही, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

...Read More

V. S. News
बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकार - अशोक चव्हाण

व्हीएस न्यूज - महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय्य कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. केंद्र आणि राज्य सरकार इंधनावर अवाजवी कर आकारणी करून जनतेची लूट करत आहेत. इंधनावरील हे अन्यायी कर आणि अधिभार तात्काळ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, मोदी आणि फडणवीसांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन लोकांची मते घेतली व सत्ता मिळवली. पण सत्तेवर बसल्यावर इतर आश्वासनांप्रमाणेच महागाई कमी करण्याच्या आश्वासनाचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे. महागाई कमी करणे तर दूरच; उलटपक्षी इंधनावर अन्याय्य कर व अधिभार लादून सर्वासमान्यांची लूटमार करत आहे. सध्या देशपातळीवर महाराष्ट्र राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर १६ मे २०१४ रोजी जागतिक पातळीवर १०८ डॉलर प्रति बॅरल असलेले कच्च्या तेलाचे दर आज ७५ डॉलर प्रति बॅरल इतके कमी झाले आहे.

परंतु, पेट्रोल-डिझेलचे दर मात्र आज २०१४ च्या दरापेक्षा अधिक तर आहेतच, शिवाय या दरांनी आता उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबईत आजचा पेट्रोलचा दर ८४.४० रूपये प्रति लिटर इतका आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल मुंबईत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र व राज्य सरकारने मिळून टाकलेला कराचा प्रचंड बोझा आहे. पेट्रोलच्या किंमतीचा विचार केल्यास त्यातील ५० टक्क्यांहून अधिक रक्कम राज्य आणि केंद्र सरकारने लावलेल्या विविध करांमुळे द्यावी लागते. डिझेल बाबत हे प्रमाण ४० टक्क्यांहून जास्त आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील अन्यायी कर व अधिभार रद्द करून इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी केंद्र सरकारने जाणीवपूर्वक सुमारे तीन आठवडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थीर ठेवल्या. परंतु, निवडणूक संपताच दररोजच दरवाढ सुरू असून, यातून केंद्र सरकारची देशाची दिशाभूल व फसवणूक करण्याची मानसिकता अधोरेखीत होते, अशीही टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

...Read More

V. S. News
संरक्षण दलाच्या ताब्यातील जमीन नोंदणीसाठी टास्क फोर्स - मुख्यमंत्री

व्हीएस न्यूज - राज्यातील संरक्षण दलाच्या जमिनीसंदर्भातील समस्या तसेच इतर प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील राहिल. लष्कर,हवाई दल व नौदलाच्या ताब्यात असलेल्या जमिनींची नोंदणी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा टास्कफोर्स तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संरक्षण दलाच्या जमिनींवरील अतिक्रमण व इतर समस्या संदर्भात शुक्रवारी संरक्षण मंत्री सीतारामन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी संरक्षण खात्याच्या जमिनींवर झालेली अतिक्रमणे, पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविणे, कटक मंडळातील (कँन्टोन्मेंट) नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे,राज्य शासनाच्या प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी यासंदर्भात चर्चा झाली.

संरक्षण मंत्रालयाचे राज्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य शासन नेहमची प्राधान्य देईल. राज्यातील कटक मंडळांच्या क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना राज्य व केंद्राच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने राज्य शासन करेल. तसेच लष्कर,हवाई दल व नौदलाच्या जमिनींवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ते सोडविण्यासाठी राज्य शासन सहकार्य करत असल्याचा आनंद आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालय सर्वतोपरी सहकार्य करेल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. केंद्रीय संरक्षण सचिव संजय मित्रा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान यांच्यासह केंद्रीय संरक्षण मंत्रालय व तीनही दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
जे.जे. हॉस्पीटलच्या दोन ज्युनियर डॉक्टरांना मारहाण

व्हीएस न्यूज - डॉक्टरांवर वाढणारे हल्ले थांबता थांबत नाहीत. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. ताजी घटना मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात घडली.

सर जे. जे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ११ या सर्जरी वॉर्डमध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून ज्युनियर मारहाण करण्यात आली तर रुग्णालयाची तोडफोडही करण्यात आली.

मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर म्हणाले, “शनिवारी सकाळी सात वाचण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन ज्युनियर निवासी डॉक्टरांना नातेवाईकांनी मारहाण केली आणि रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना दु:खद असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
हंगामी विधानसभा अध्यक्ष भाजपचाच – सुप्रिम कोर्ट

व्हीएस न्यूज - बोपय्या विधानसभेचे अध्यक्ष असण्यावर कोणताच आक्षेप नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपला दिलासा मिळाला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजप आमदार के. जी. बोपय्‍या यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. परंतु, या निवडीलाही काँग्रेसने सर्वोच्‍च न्यायालयात आव्‍हान दिले. यावर दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाल्यानंतर सर्वात ज्येष्‍ठ आमदाराला विधानसभा अध्यक्ष म्‍हणून नियुक्‍तीचे आदेश देऊ शकत नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.

कर्नाटकात बोपय्या यांच्या हंगामी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्तीवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यावर सुनावणीवेळी आर. व्‍ही. देशपांडे यांची ज्येष्ठता भाजपकडून डावलण्यात आली असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. मात्र, हा युक्तिवाद फेटाळून लावत जेष्ठता वयानुसार नाही तर कार्यकाळानुसार ठरवली जाते असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. आता हंगामी अध्यक्ष भाजपचाच राहणार असल्याने बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पा यांना फायदा होऊ शकतो.

बोपय्या विधानसभेचे माजी सभापती -

62 वर्षीय बोपय्या कर्नाटक विधानसभेचे माजी सभापतीदेखील आहेत. बोपय्या हे येडियुरप्पा यांच्या नजीकचे मानले जातात. बोपय्या पाच वेळा आमदार झाले आहेत. भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी बोपय्या यांची नियुक्‍ती नियमानुसारच असल्याचे स्पष्ट केले आहे. 2008 सालीही त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती करण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांचे वय आजच्यापेक्षा 10 वर्षांनी कमी होते, याकडेदेखील जावडेकर यांनी लक्ष वेधले आहे. 2010 साली येडियुरप्पा यांच्यावर खाण घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यावेळी बंडखोरी केलेल्या 11 आमदारांना बोपय्या यांनी अपात्र ठरवले. त्यांच्या या निर्णयामुळे येडियुरप्पा सरकार अविश्‍वासदर्शक ठरावातून बचावले होते. मात्र, बोपय्या यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता.

हंगामी अध्यक्ष म्हणजे काय? -

विधानसभेच्या स्थायी सभापतींची नियुक्‍ती होत नाही, तोपर्यंत हंगामी अध्यक्षांच्या नियुक्‍ती राज्यपालांकडून केली जाते, त्यालाच प्रोटेम स्पीकर असे म्हणतात. प्रोटेम स्पीकर निवडून आलेल्या आमदारांना शपथ देतात. त्यानंतर बहुमताच्या चाचणीस प्रारंभ होतो.

...Read More

V. S. News
भारतीय असल्याचा पुरावा द्या ; आमदाराला नोटीस

व्हीएस न्यूज - आसाममधील एका भाजप आमदाराला आणि त्याच्या कुटुंबाला न्यायालयात भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करा, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. संशयित नागरिक असल्याच्या कारणावरुन नोटीस पाठवल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बरखोला मतदारसंघाचे आमदार किशोर नाथ, त्यांची पत्नी आणि चार भाऊ यांच्यासह एका नातेवाईकाला नोटीस पाठवली आहे.

न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसीनुसार, किशोर नाथ आणि त्यांचे कुटुंबातील सदस्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच न्यायालयात भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करा असेही म्हटले आहे. यावर आमदार किशोर नाथ यांनी आपण भारतीय असून नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती आमदार नाथ यांनी आसामच्या विधानसभा अध्यक्षांना दिली आहे.

माझ्या कुटुंबातीत सर्व भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे न्यायालयात सादर करु असे आमदार नाथ यांनी म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या सांगण्यावरुन त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोपही नाथ यांनी केला आहे.

नागरिकत्व संशोधन अधिनियम २०१६ नुसार आसाममधील संशयित नागरिकांची चौकशी केली जाते. या अधिनियमाला आसामच्या नागरिकांचा विरोध आहे. १९७१ ला बांगलादेशातून भारतात आलेल्या नागरिकांना परत पाठवण्याचा नियम यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे हा नियम आसामच्या सामंजस्य कराराच्या विरोधात असल्याची भावना लोकांमध्ये आहे.

...Read More

V. S. News
बी.एस.येडीयुरप्पा ठरले तीन दिवसाचे मुख्यमंत्री !

व्हीएस न्यूज - विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकल्याने भाजपच्या बी.एस.येडीयुरप्पा यांनी तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. येडीयुरप्पा यांनी विधानभवनात आमदारांसमोर भाषण केले. यावेळी बोलताना ते भावूक झाले होते.

कर्नाटक कोणाचे यावरून सुरू असलेली रस्सीखेच येडीयुरप्पांच्या राजीनाम्यानंतर थांबली आहे. राज्यात आता काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेडीएसचेड कुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होतील.

या आधी सात दिवसांचे मुख्यमंत्री आणि आता ते ३ दिवसांचे मुख्यमंत्री ठरले आहेत. याआधी २००७ मध्ये त्यांनी सातव्या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली नाही. नोव्हेंबर 2007मध्ये भाजपने जेडीएस सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण ऐनवेळी कुमारस्वामी यांनी भूमिका बदलल्यामुळे येडियुरप्पा यांना सात दिवसात राजीनामा द्यावा लागला होता

...Read More

V. S. News
विनापरवाना तलवारी बाळगणारा इसम सूपा पोलिसांकडून जेरबंद

व्हीएस न्यूज - बेकायदेशीर रित्या तलवारी बाळगणाऱ्या अनिल शिंदे नामक इसमाला सुपा पोलीसांनी अटक केली आहे.सूपा पोलिसांनी अनिल शिंदे कडून दोन तलवारी बारामद करून त्याच्यावर गुन्हे क्र - १२//२१०८ भारतीय हत्यार अधिनियम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

दिनांक १९/०५/२०१८ रोजी सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना विठ्ठल नगर सुपा येथे अनिल शिंदे हा विनापरवाना हत्यार बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता त्वरित सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या शिंदेला जागीच अटक करण्यात आली.आरोपीच्या घराची झडती घेताना घरातून २५ इंच आणि २२ इंच लांब व धार असलेल्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या .

सादर कारवाई रंजनकुमार शर्मा पोलीस अधिक्षक अहमदनगर , घनश्याम पाटील अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, अक्षय शिंदे सह. पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पो.हे.कॉ. बबन मखरे, पो.ना.खंडेराव शिंदे , पो.कॉ.यशवंत ठोंबरे , बाळू चाबुकस्वार, सुरेश मुसळे,म. पो.ना. शबाना तांबोळी यांनी केली.

...Read More

V. S. News
छगन भुजबळांना जामीन मंजूर

व्हीएस न्यूज - बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते तुरुंगातून बाहेर येतील, अशी माहिती सूत्रांनी आहे.

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्र

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचे नेते भुजबळ यांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले. सरकारनं त्यांना जामीन मिळू नये असा खूप प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळ यांना एका प्रकरणात जामीन मिळाला होता, व दुसऱ्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नव्हता. कालिना भूखंड घोटाळाप्रकरणी त्यांना जामीन मिळाला होता, मात्र आर्थिक अफरातफरीप्रकरणी जामीन मिळाला नव्हता, तो ही आता मिळाल्यामुळे त्यांचा कारागृहबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुजबळ हे बडे व्यक्तीमत्त्व असल्यामुळे त्यांना जामीन मिळाला तर ते पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतात असा दावा सरकारी वकिलांनी केला होता, मात्र तो मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य मानला नाही व त्यांना जामीन दिला आहे.

...Read More

V. S. News
विधानपरिषद निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी थेट लढत

व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या सहा जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत होणाऱ्या निवडणुकीत आता भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी थेट लढत होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार व राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचा अपवाद वगळता अन्य पाच आमदारांना घरी बसवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. सत्ताधारी भाजपसाठी तीच मोठी राजकीय अडचण आहे. त्यामुळे भाजपला आपले संख्याबळ वाढविण्यासाठी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव, अनिल तटकरे व बाबाजानी दुर्राणी यांची मुदत संपत आहे. जाधव, अनिल तटकरे यांच्या जागी राष्ट्रवादीने नवीन उमेदवार दिले आहेत.

परभणी मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्यामुळे त्या मतदारसंघातील आमदार दुर्राणी यांना निवडणूक रिंगणाच्या बाहेर राहावे लागले. काँग्रेसकडे लातूर-उस्मानाबाद-बीड हा एक मतदारसंघ होता. काँग्रेसचे आमदार दिलीप देशमुख यांची मुदत संपत आहे. मात्र लातूर मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आल्यामुळे आणि देशमुख यांनीही निवडणूक लढवायची नाही असे ठरविल्यामुळे राष्ट्रवादीने भाजपमधून पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांला मैदानात उतरवले आहे. भाजपचे प्रवीण पोटे व मितेश भांगडिया हे दोन आमदार निवृत्त होत आहेत. त्यापैकी राज्यमंत्री पोटे यांना अमरावतीमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीधून भांगडिया यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी रामदास आंबटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना यांच्यामध्ये अघोषित युती झाली आहे. त्यानुसार भाजप तीन व शिवसेना तीन जागा लढवीत आहे.

विधान परिषद निवडणुकीत युती नाही

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कोणत्याही पक्षाबरोबर युती केलेली नाही. शिवसेनेचा विजय होण्याची शक्यता असलेल्या जागा लढविण्यात येतील. गोंदियामधील शिवसैनिकांनी अलीकडेच भेट घेतली होती, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!