पैसा व सत्तेनं सर्वकाही खरेदी करता येत नाही - राहुल गांधी..
नवी दिल्ली
2018-05-22
व्हीएस न्यूज - बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेबाहेर काँग्रेस व जेडीएसनं आनंद साजरा केला. ''आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे'', असं म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले आहेत.
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर हल्लाबोल चढवला.