व्हीएस न्यूज - अनेक राजकीय घडामोडीनंतर जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी (दि. २३ मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. कुमास्वामी यांनी शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार यांना निमंत्रण दिले आहे.
कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यादिवशी विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशभरातील प्रमुख १७ विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुमारस्वामी यांनी शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. या निमंत्रणात शरद पवार यांचाही समावेश आहे. कुमारस्वामी यांचे निमंत्रण स्वीकारून ते शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.
कुमारस्वामी यांनी मायावती यांनाही निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मायावतीही बुधवारी या शपथविधीला येणार आहेत. कुमारस्वामी यांनी मार्क्सवादी तसेच भाकपा नेत्यांनाही निमंत्रण दिले आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तामिळ अभिनेते रजनीकांत, सीताराम येचुरी हेही नेते शपथविधीला हजर राहणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, हिंदू महासभेने कुमारस्वामी यांच्या शपथविधीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट तयार झाले आहे. हिंदू महासभेने कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा संविधानाला धरून नाही, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002