Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

व्हीएस न्यूज - रायगड किल्ल्यावर बुधवारी ३४५वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील १० हजारांहून अधिक शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि कोल्हापुरचे युवराज शहाजी राजे भोसले उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरवात मंगळवारी दुपारी गडपुजनाने झाली. यावेळी २१ गावातील नागरीकांनी एकत्र येऊन गडपुजन केले. यानंतर किल्ल्यावर उत्खननात सापडलेल्या वस्तूच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोँधळ तर जगदिश्वर मंदिरात किर्तन सोहळा संपन्न झाला. राज्यभरातील विविध भागातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर करीत महाराजांना मानवंदना दिली. रात्री उशीरा राजसदरेसमोर ही रात्र शाहिरांची हा शाहीरीचा कार्यक्रम संपन्न झाला.

बुधवारी सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राजसदरेवर शाहिरांनी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी साडे नऊच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले. शिवआरतीचे पठण करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. या चैतन्यमय सोहळ्याला हजारो शिवभक्त, महिला आणि पुरूषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शंखनाद आणि तुतारीबरोबरच शिवप्रभूंच्या जयजयकाराने अवघा रायगडचा परिसर दुमदुमून गेला होता. राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी यावेळी मैदानी खेळांची, शस्त्र कवायतीचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समोरोप झाला.

सोहळ्यानिमित्ताने गडावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवप्रेमींच्या उत्साहामुळे अवघा आसमंत शिवगर्जनांनी दुमदूमून गेला होता. सोहळ्यानिमित्ताने रायगडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक नियमनही करण्यात आले होते.

...Read More

V. S. News
अक्कल असती तर आयएएस अधिकारी झालो असतो – कुमारस्वामी

व्हीएस न्यूज - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी सोमवारी एका कॉलेज कार्यक्रमात सहभागी झाले असता आपल्या एका कबुलीने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. आपण एक कमकुवत विद्यार्थी होतो, त्यामुळे प्रश्न विचारले जातील या भीतीने कधीच पहिल्या बाकावर बसायचो नाही अशी माहिती त्यांनी दिली.

नॅशनल डिग्री कॉलेजचे विद्यार्थी असलेले कुमारस्वामी १२ वर्षानंतर आपल्या कॉलेजात आले होते. जयानगर येथे हे कॉलेज आहे. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतना कुमारस्वामी यांनी सांगितलं की, ‘मी कमी अक्कल असणारा विद्यार्थी होतो. त्यामुळेच तास सुरु असताना प्रश्न विचारले जातील या भीतीने पहिल्या बाकावर बसायचो नाही’.

आपल्या कॉलेज आयुष्यावर बोलताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितलं की, ‘मी डॉक्टर राजकुमार यांचा खूप मोठा चाहता होतो. मी त्यांचे चित्रपट पाहत असे. जर मी चांगला आणि हुशार विद्यार्थी असतो तर आयएएस अधिकारी बनायला आवडलं असतं. माझे वडिल (माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा) मला नेहमीच काहीच कामाचा नसल्याचं म्हणत असतं. आयुष्यात मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही असंही ते म्हणत’.

मी कॉलेजात असताना कशाचीही चिंता करायचो नाही. अत्यंत बेजबाबदारपणे वागायचो. पण आताच्या विद्यार्थ्यांनी जबाबदार झालं पाहिजे. कॉलेजचे विद्यार्थी कधीही विधानसभेत येऊन मला भेटू शकतात. त्यांनी कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नाही’,असंही त्यांनी सांगितलं.

...Read More

V. S. News
कपिल देव होणार भाजपाचे राज्यसभा खासदार

व्हीएस न्यूज - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भेट घेतल्यापासून कपिल देव हे राज्यसभेत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शुक्रवारी अमित शाह यांनी कपिल देव यांच्या घरी जाऊन भेट घेतली. शाह यांनी देव यांची भेट का घेतली ? हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण भाजपाचे चाणक्य असलेले अमित शाह आता कोणती नवीन रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०१४ मध्ये भाजपा आणि शिरोमणी अकाली दलाकडून कपिल देव यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संपर्क करण्यात आला होता. पण त्यावेळी राजकारणापासून दूर राहण्याला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. मात्र, आता राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठीचं गैरराजनितीक नामांकन आल्यास कपिल देव ते नाकारणार नाहीत, असा अंदाज भाजपाच्या नेत्यांकडून वर्तवला जात आहे. आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामांकन दिलं जातं. या कोट्यातून १२ जागा असतात, त्यापैकी आता ७ जागा खाली आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजपाने गांगुलीला पक्षामध्ये घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे. पश्चिम बंगे बीजेपी चाइम्हणजे बंगालमध्ये आम्हाला भाजपा हवीयेया नावाच्या एका फेसबुक पेजवर गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला होता, तेव्हापासून गांगुली भाजपात जाणार असल्याची चर्चा येथे रंगली आहे. पण, भाजपाच्या कोणत्याही नेत्याने किंवा गांगुलीने स्वतःही याबाबतच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही किंवा नाकारलंही नाहीये.

२०१४ मध्ये भाजपाने गांगुलीला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, पण गांगुलीने त्यावेळी नकार दिला होता. भाजपाने ऑफर दिली होती पण माझी जागा क्रिकेटच्या मैदानात आहे, राजकारणाच्या नाही असं म्हणत गांगुलीने त्यावेळी ती ऑफर नाकारली होती.

...Read More

V. S. News
भाजप आमदाराची जीभ घसरली, म्हणाले… सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा वेश्या बऱ्या

व्हीएस न्यूज - जनतेची उपेक्षा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा वेश्या बऱ्या असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशातील एका आमदाराने केले आहे. जनतेकडून लाच घेऊन कामाची आश्वासने देण्याच्या वृत्तीवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. मात्र, यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह चेनता दिवस साजरा करताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, भ्रष्ट अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांपेक्षा तर वेश्या चांगल्या आहेत ज्या पैसे घेऊन काम तरी करतात. हे लोक तर कामाचे पैसे घेतात आणि ते करीतही नाहीत. त्यामुळे जर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाच मागितली तर त्याला एक ठोसा द्या अन्यथा त्याला जोड्याने मारा असे त्यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सिंह म्हणाले, जर कुठला अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर त्याचा आवाज रेकॉर्ड करा आणि ते रेकॉर्डिंग माझ्याकडे घेऊन या. त्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. यावेळी बलिया तहसिल कार्यालची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचे सांगत मी आमदार असलो किंवा नसलो तरी तहसिल कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना येथे राहू देणार नाही. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला की, जमीनीसंदर्भातील नोंदी आणि शेतीसंदर्भातील कामांसाठी लाच घेणे बंद झाले पाहिजे.

...Read More

V. S. News
गृहकर्जे-वाहनकर्जे महागण्याची शक्यता

व्हीएस न्यूज - अखेर तब्बल साडे चार वर्षांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने आरबीआय ज्या दरानं बँकांना वित्तपुरवठा करतं त्या व्याजाचे दर किंवा रेपो रेट पाव टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्के केला आहे.

बँका ज्या दरानं आपल्याकडे असलेला अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर (म्हणजे रिव्हर्स रेपो) त्यांना 6 टक्के व्याज मिळेल. एप्रिल महिन्यामध्येच दोन सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती. आजच्या बैठकीमध्ये सर्वच्या सर्व सदस्यांनी दरवाढीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं व एकमतानं ही वाढ करण्यात आली आहे.

या दरवाढीमुळे भविष्यातील सर्व कर्जांचे दर वाढू शकतात. परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली की बँका हा वाढीव बोजा ग्राहकांकडे सरकवतात. असा अनुभव आहे की सगळ्यात मोठी सरकारी बँक प्रथम व्याजदरात वाढ करते मग मागोमाग सगळ्या बँकांचे कर्जही महागते. जर का आत्तापर्यंतची ही प्रथा सुरू राहिली तर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज व अन्य प्रकारची कर्जेही महागण्याची शक्यता आहे.

अर्थात, गेल्या आठवड्यातच स्टेट बँक, पंजाब नॅशनल व आयसीआयसीआय बँकेने प्रमाण कर्जाचा दर किंवा एमसीएलआर 0.1 टक्क्यांनी वाढवला होता व कर्ज महागत असल्याचे सूतोवाच केले होते. बहुतेक सर्व प्रकारची कर्जे या एमसीएलआरशी जोडलेली असतात, व त्यात होणारे बदल कर्जाच्या व्याजात किंवा हप्त्यात उमटतात. त्यामुळे एमसीएलआर किंवा प्रमाण दर वाढला की ईएमआय वाढतो. बुधवारच्या व्याजदर वाढीनंतर किती बँका हा प्रमाण दर वाढवतात व किती वाढवतात यावर कर्जे महाग होतील का व किती होतील हे ठरणार आहे.

...Read More

V. S. News
दहा दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु – राहुल गांधी

व्हीएस न्यूज - मध्य प्रदेशमध्ये आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना सुरक्षित करणे हे आमचे पहिले काम असेल. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले तर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु अशी घोषणा राहुल यांनी केली. पंतप्रधान मोदी आणि भाजपाला शेतकऱ्यांची चिंता नाही हे सत्य आहे. श्रीमंत बिझनेसमॅन मित्रांना मदत करायला ते प्रथम प्राधान्य देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशच्या जनतेची फसवणूक केली. त्यांनी फक्त मध्य प्रदेशच्याच नव्हे तर संपूर्ण देशाची फसवणूक केली. नोकरी देण्याचे त्यांनी खोटे आश्वासन दिले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदसौर येथील जाहीर सभेत केला. मागच्यावर्षी मध्य प्रदेशात मंदसौर येथे झालेल्या गोळीबारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची राहुल यांनी भेट घेतली.

काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास १० दिवसात न्याय मिळेल. ज्यांनी शेतकऱ्यांवर गोळया चालवल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करुन दाखवू असे राहुल म्हणाले. पंतप्रधान मोदींनी पंधरा उद्योगपतींचे १.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण मी त्यांना शेती कर्ज माफ करायला सांगितले त्यावर ते मौन होते असे राहुल म्हणाले.

मी जेव्हा कॅप्टन अमरींदर सिंग, सिद्धारामय्या यांना सांगितले तेव्हा कर्नाटक आणि पंजाब सरकारने दहा दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असे राहुल यांनी सांगितले. माझ्यासाठी सर्वात प्रथम या देशाची जनता आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि माझे तिसरे प्राधान्य काँग्रेस नेत्यांना आहे असे राहुल म्हणाले. पाच-सात वर्षानंतर मी जेव्हा पुन्हा इथे येईन तेव्हा माझ्या हातात असलेल्या फोनवर मला मेड इन मंदसौरलिहिलेले पाहायचे आहे. नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान हे करु शकणार नाहीत. पण कमल नाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतात असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

...Read More

V. S. News
‘लष्कर-ए-तोयबा’कडून काशी विश्वनाथ मंदिर उडवण्याची धमकी

व्हीएस न्यूज - लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून उत्तर प्रदेशातील कृष्ण जन्मस्थळ, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर, हापूड आणि सहारनपूर रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबतचे एक पत्र मिळाले आहे. त्यामुळे राज्यात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या पत्रानुसार, ८ आणि १० जून रोजी या प्रमुख ठिकाणांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्राची सत्यता सध्या पडताळण्यात येत आहे.

गुप्तचर यंत्रणेकडून (आयबी) हे पत्र मिळाल्यानंतर अॅलर्ट जारी करण्यात आला असून युपी पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलिस महानिरिक्षक आनंदकुमार यांनी सांगितले की, महत्वपूर्ण धार्मिक, पर्यटन आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

या पत्रावर जम्मू-काश्मीरच्या लष्करचा क्षेत्रीय कमांडर मौलाना अबू शेख याची सही आहे. याच दहशतवादी संघटनेने मंगळवारी बांदीपुरातील हाजिन सैन्यशिबिरावर हल्ला केल्याची जबाबदारी स्विकारली आहे. लष्करच्या एका प्रवक्त्याने अब्दुल्ला गजनवी याने श्रीनगरमधील एका वृत्त संस्थेशी फोनवरुन संपर्क करीत यामागे आपल्या संघटनेचा हात असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्यामागे देखील लष्कर-ए-तोयबाचा हात होता. ही दहशतादी संघटना दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनांपैकी एक आहे. हाफिज सईदने याची स्थापना अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात केली होती. सध्या तो पाकिस्तानातील लाहोरमधून आपल्या चालवतो. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवतो. या संघटनेने भारतात अनेकदा दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.

...Read More

V. S. News
दहावीचा निकाल 8 जूनला लागण्याची शक्यता

व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल येत्या दोन ते चार दिवसांनी लागणार असल्याचे संकेत आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार दहावीचा निकाल तयार असून तो शुक्रवार 8 जून किंवा सोमवार 11 जून यापैकी कुठल्याही दिवशी लागू शकतो. शिक्षण मंडळानं अधिकृतरीत्या याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही. परंतु मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रसारमाध्यमांशी बोलताना 8 जून किंवा 11 जून रोजी निकाल जाहीर होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील.

कसा आणि कुठे पाहाल निकाल?

http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल. सीबीएसईचा दहावीचा निकाल लागल्यानंतर या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा मार्च महिन्यामध्ये झाल्या होत्या. एकूण 18 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे तब्बल 18लाख विद्यार्थ्यांचे या महत्त्वाच्या निकालांकडे लक्ष लागले आहे. प्रशासकीय समस्यांमुळे निकाल जाहीर करण्यास किंचित विलंब होत असल्याचे सांगण्यात येत असून ही प्रतीक्षा लवकर संपावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करताना दिसत आहेत.

जकी अधिकृतरीत्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी निकाल तयार असून तो 8 किंवा 11 जून रोजी लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी असे सांगण्यात येत आहे. मंडळाचा प्रयत्न 8 जून रोजीच निकाल जाहीर करण्याचा असून ते शक्य न झाल्यास 11 जून रोजी तो निश्चित लागेल अशी सूत्रांची माहिती आहे.

...Read More

V. S. News
बीड जिल्हा रुग्णालयात मुलाची झाली मुलगी

व्हीएस न्यूज - जन्माला मुलगा आला अन हातात मुलगी दिली या गंभीर प्रकरणाने बीड जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. मुलगा बदलण्याचे काम आणि कारस्थान याच ठिकाणी झाल्याने बीड जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला या प्रकरणाने जिल्हारुग्णालय आणि प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे

जिल्हा रूग्णालयात ११ मे रोजी छाया राजू खिटे यांची प्रसूती झाली. छाया यांना मुलगा झाला होता परंतु त्यानंतर त्यांच्या हातात मुलगी ठेवण्यात आल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला. दरम्यान, ‘मी स्वत: त्या महिलेची प्रसूती केलेली असून तोमुलगाच होता, असे छाया यांची प्रसूती करणाऱ्या डॉ. दिपाली मोराळे यांनी सांगितले. यामुळे प्रकरणातील गुंता वाढत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने सर्व अंतर्गत चौकशी सुरू केलेली आहे. संबंधीत महिला जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्यापासून ते डिस्चार्जहोईपर्यंतचे रेकॉर्ड तपासण्याची मोहीम सुरू केली आहे.

एकीकडे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत तर दुसरीकडे जिल्हा रूग्णालय प्रशासन देखील अंतर्गत रेकॉर्ड तपासणी करत असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यत आहे एकीकडे प्रसूती करणाऱ्या डॉक्टर मुलगा जन्माला आला होता असे सांगतात दुसरीकडे खाजगी रुग्णालयात दाखल करताना ती मुलगी होती असे सांगितले जाते म्हणजेच बीडच्या जिल्हा रूग्णालयात मुलगा एक्सचेंज झाला हे निश्चित आहे. बीडचं जिल्हा रूग्णालय दालालानी घेरलं आहे, रुग्णालयात रुग्ण सेवा सोडून बाकीचे उद्योग मात्र बिनधास्त केले जात आहेत. मागच्या काही दिवसात डॉ. अशोक थोरात यांनी पदभार घेतल्या पासून कारभार गतिमान करण्याचा प्रयन्त केला आहे आणि काही प्रमाणात त्यांना यात यशही मिळाले आहे.

...Read More

V. S. News
धर्मनिरपेक्षतता संकटात आहे, उपवास करा - ख्रिस्ती धर्मगुरुंचे आवाहन

व्हीएस न्यूज - देशात सध्या भयंकर वातावरण निर्माण झाले असून धर्मनिरपेक्षतता संकटात सापडल्याचं सांगत ही परिस्थिती बदलण्यासाठी सगळ्या ख्रिस्ती बांधवांनी उपवास करावा असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप आनिल जोसेफ थॉमस काउटो यांनी ख्रिस्ती बांधवांना केले आहे. थॉमस यांच्या या आवाहना नंतर राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील भाजप सरकारने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आर्चबिशप आनिल यांनी दिल्लीतील सर्व चर्चं व पादरींना पत्र पाठवले आहेत. आपण सध्या एका विचित्र राजकीय अस्थिरतेमधून जात आहोत. ज्यामुळे आपल्या लोकशाहीच्या मूल्यांवरच गदा आली आहे. तसेच देशाची धर्मनिरपेक्ष छवीही धोक्यात आली आहे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच २०१९ साली होणाऱ्या निवडणूकां डोळ्यासमोर ठेवून नेत्यांसाठी व्रत करण्याचे आवाहनही अनिल यांनी केले आहे.

दरम्यान, दिल्ली आर्चबिशपचे सचिव फादर रॉबिन्सन यांनी आर्चबिशपचे पत्र राजकीय किंवा पंतप्रधानांविरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ते एक प्रार्थनेचे निमंत्रण असून अशी अनेक पत्रं यापूर्वीही लिहण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान जाती व धर्माची बंधने तोडून भेदभाव न करता सगळ्यांच्या विकासासाठी काम करत आहेत. यामुळे आर्चबिशप यांनी प्रगतिशील मानसिकतेवर विचार करावा असे त्यांना सांगावेसे वाटते. असे नकवी यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
गुगलकडून राजा राम मोहन रॉय यांना श्रद्धांजली

व्हीएस न्यूज - आधुनिक विचाराचे जनक, भारताचे महान समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्या २४६ व्या जयंतीनिमित्त गुगलकडून डूडल बनवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राम मोहन रॉय यांनी १९ व्‍या शतकामध्ये सामाजिक चळवळींना सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी सतिप्रथा, बालविवाह अशा जाचक प्रथेतून त्यांनी भारतीय महिलांना त्यांनी मुक्‍त केले.

सतिप्रथा बंद व्‍हावी यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभा केली. या समाज कार्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झली. स्‍त्रियांवर अन्याय करणारी सतिप्रथा असल्याने त्यांनी सतिप्रथेविरूध्द कायदा करण्यात यावा यासाठी लॉर्ड विल्‍यम बेंटिक यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्‍यानंतर ४ डिसेंबर १८२९ रोजी त्यांनी सतिप्रथा बंद करण्याचा कायदा केला. ही प्रथा बंद ठेवण्याचे धोरण कायम ठेवावे यासाठी ते ब्रिटीश सरकारला अर्ज करण्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. या प्रथेविरूध्द राजा राम मोहन रॉय यांनी आवाज उठवल्यानंतर दिल्‍लीच्या बादशहाने त्यांना राजा किताब बहाल केला.

राजा राम मोहन रॉय यांचा जन्‍म बंगालमधील हुगळी येथे ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला होता. राजा ही पदवी त्यांना मुगल सम्राट अकबर यांनी बहाल केली होती. भारतातून इंग्लडला जाणारे ते पहिले भारतीय होते. मुगल सम्राटचे राजदूत म्‍हणून ते इंग्लडला गेले होते. त्यांनी १८३० साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात उल अखबार हे पर्शियन व्रतपत्र त्‍यांनी सुरु केले.

...Read More

V. S. News
महाराष्ट्रात न राहण्याचे शेतकऱ्यांचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र !

व्हीएस न्यूज - आम्हाला महाराष्ट्रात रहायचे नाही, तुमच्या राज्यात आमच्या गावांचा समावेश करून घ्या, अशी विनंती करणारे पत्र सीमा भागातील काही गावकऱ्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. वाचताना थोडा धक्का बसेल पण हे खरे आहे.

नांदेड जिल्ह्यातील सीमा भागात राहणाऱ्या धर्माबाद तालुक्यातील ग्रामस्थांनी येथील गावांचा समावेश तेलंगणा राज्यात करण्याची मागणी केली आहे. सीमा भागातील या गावातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आहेत. जर या गावांचा समावेश तेलंगणा राज्यात झाला तर त्या योजनांचा फायदा आम्हाला देखील घेता येईल, असे येथील लोकांना वाटते. तेलंगणामधील के.चंद्रशेखर राव सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना तयार केल्या आहेत. या योजनेतून शेतकऱ्याला प्रत्येक हेक्टरसाठी वर्षाला 8 हजार रुपये दिले जातात.

केसीआर सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज देखील माफ केले आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला 24 तास मोफत वीज दिली जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याचा 5 लाख रुपयांचा विमा सरकारने उतरवला आहे.

धनाबाद तालुक्यातील सरपंच असोशिएशनचे अध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी देखील येथील गावांचा समावेश तेलंगणामध्ये करावा अशी मागणी केली आहे. तर तालुक्यातील बबली गावाच्या सरपंचांनी टीआरएसच्या खासदार कविता यांची भेट घेऊन या गावांचा समावेश तेलंगणा राज्यात करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे खासदार कविता जेव्हा निझामाबाद येथे शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचे वाटप कर होत्या तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आमचा समावेश तेलंगणा राज्यात करा अशी मागणी केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!