व्हीएस न्यूज - जन्माला मुलगा आला अन हातात मुलगी दिली या गंभीर प्रकरणाने बीड जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. मुलगा बदलण्याचे काम आणि कारस्थान याच ठिकाणी झाल्याने बीड जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला या प्रकरणाने जिल्हारुग्णालय आणि प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे
जिल्हा रूग्णालयात ११ मे रोजी छाया राजू खिटे यांची प्रसूती झाली. छाया यांना मुलगा झाला होता परंतु त्यानंतर त्यांच्या हातात मुलगी ठेवण्यात आल्याने त्यांना प्रचंड धक्का बसला. दरम्यान, ‘मी स्वत: त्या महिलेची प्रसूती केलेली असून ‘तो’ मुलगाच होता, असे छाया यांची प्रसूती करणाऱ्या डॉ. दिपाली मोराळे यांनी सांगितले. यामुळे प्रकरणातील गुंता वाढत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने सर्व अंतर्गत चौकशी सुरू केलेली आहे. संबंधीत महिला जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्यापासून ते ‘डिस्चार्ज’ होईपर्यंतचे रेकॉर्ड तपासण्याची मोहीम सुरू केली आहे.
एकीकडे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत तर दुसरीकडे जिल्हा रूग्णालय प्रशासन देखील अंतर्गत रेकॉर्ड तपासणी करत असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यत आहे एकीकडे प्रसूती करणाऱ्या डॉक्टर मुलगा जन्माला आला होता असे सांगतात दुसरीकडे खाजगी रुग्णालयात दाखल करताना ती मुलगी होती असे सांगितले जाते म्हणजेच बीडच्या जिल्हा रूग्णालयात मुलगा एक्सचेंज झाला हे निश्चित आहे. बीडचं जिल्हा रूग्णालय दालालानी घेरलं आहे, रुग्णालयात रुग्ण सेवा सोडून बाकीचे उद्योग मात्र बिनधास्त केले जात आहेत. मागच्या काही दिवसात डॉ. अशोक थोरात यांनी पदभार घेतल्या पासून कारभार गतिमान करण्याचा प्रयन्त केला आहे आणि काही प्रमाणात त्यांना यात यशही मिळाले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002