Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
विश्वास नांगरे-पाटील साधणार माजी विद्यार्थ्यांशी संवाद

प्रा.मोरे महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

व्हिएस न्यूज - आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज़्य व विज्ञान महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 26 डिसेंबर 2017 रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने आणि माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाशी संपर्क वाढावा, जुन्या आठवणींना उजाळा देता यावा, आजी विद्यार्थांसमोर एक आदर्श निर्माण व्हावा, होतकरू विद्यार्थ्यांस मदत व्हावी या उद्देशाने हा मेळावा घेण्यात येत असून मेळाव्यास सुमारे 3 ते 4 हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तरूणांचे आदर्श प्रमुख पाहुणे स्पेशल आय.जी. कोल्हापूर विभाग विश्वास नांगरे पाटील हे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर, माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपध्याक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदिप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए.एम. जाधव, प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम जी चासकर आदि उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, सुसज्ज अशा स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये उपयुक्त भरपूर पुस्तके, इंटरनेट, ए.सी आदि सुविधा असणार आहेत. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे अनुभव यशोगाथा या पुस्तकाच्या रूपाने प्रसिध्द करण्यात येईल. तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 1992 साली स्थापन झालेल्या प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये महाविद्यालयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम सोय उपलब्ध करून दिलेली आहे. महाविद्यालय अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून महाविद्यालयाला व प्राध्यापकांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाविद्यालयातील 14 विद्यार्थी सुवर्णपदक प्राप्त असून विद्यार्थी व प्राध्यापक राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभागी होत असतात. यावेळी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष शांताराम वायकर, नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक अँड. मोरेश्वर शेडगे, नाना शिवले, ज्ञानेश्वर कुटे, दत्तात्रय भालेकर, विजय लांडगे, प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे उपसचिव एल. एम. पवार, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे, डॉ. सुजाता टापरे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे, रजिस्ट्रर अनिल शिंदे तसेच माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक डॉ. सुजाता टापरे करणार आहेत.
नाव नोंदणीसाठी मोबाईल अँप तयार करण्यात आले असून विद्यार्थांनी त्यावरून आपली नोंदणी करावी, तसेच अधिक माहितीसाठी डॉ. सुजाता टापरे (9970925914) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
...Read More

V. S. News
डी. एस. कुलकर्णींना न्यायालयाकडून एक महिन्याचा दिलासा

व्हिएस न्यूज – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेवीदारांचे ५० कोटी रुपये भरण्यासाठी उच्च न्यायालयात दिलेली पहिली तारखी उलटून गेल्यानंतर अटकेची टांगती तलवार असणारे कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आले आहे.

या निवेदनामध्ये आम्हाला १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी भरण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व रक्कम सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या मुदतीमध्ये जमा करण्यात येईल. कोणत्याही गुंतवणुकदारांचा एक रुपयाही आम्ही ठेवणार नसून कोणाचीही फसवणूक केली जाणार नाही असे आश्वासनही कुलकर्णी यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आमचे म्हणणे सर्वोच्च न्यायलयाने ऐकून घेत आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळेच आता सर्व गोष्टी व्यवस्थित होतील आणि व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे
...Read More

V. S. News
राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त एच.ए.स्कूल ची स्वच्छता मोहीम

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील एच.ए.स्कूल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय 'ह' चे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सौ.अशा राऊत आणि आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत मिशन (नागरी) स्वछ महाराष्ट्र मिशन (नागरी) अंतर्गत राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ह्या मोहिमेत एच.ए.स्कूलच्या १४०० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. या दरम्यान एच.ए.स्कूल आणि एच.ए.कॉलनी च्या परिसराची साफसफाई केली आणि विध्यार्थ्यांना काचऱ्या विषयी प्रबोधन करण्यात आले.
...Read More

V. S. News
दहा हजाराचे बंदे देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक

व्हिएस न्यूज - तूप विकायला आलेल्या चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रूपयांचे बंदे देतो, असे सांगून दहा हजार रूपये घेवून पोबारा केला. हा प्रकार ताथवडे येथील जीवननगर नरहरी सोसायटी येथ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडला.
रमाकांत रेपाळ (वय़-70, रा. जीवननगर नरहरी सोसायटी, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपाळ यांच्या घऱी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता एक जण तुप विकण्याच्या बहाण्याने आला. रेपाळ यांना 10 हजार रूपयांचे बंदे करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दहा हजार रूपये घेवून पोबारा केला.
फौजदार मोहन जाधव अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
वायसीएम रुग्णालयात दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी

व्हिएस न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात शुक्रवारी ड्युटीवर असणाऱ्या दोन डॉक्टरांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला आहे. हजेरी पुस्तकावर सही करण्यासाठी गेलेल्या एका डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरने शिवीगाळ करत हाणामारी केली. यामध्ये दोघांचे शर्ट फाटले. हा प्रकार वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजता संबंधित डॉक्टर हजेरी पुस्तकावर सही करण्यासाठी आले होते. त्यावेळी दुसऱ्या डॉक्टरने त्यांना शिवीगाळ केली. यामुळे दोघांत शाब्दीक बाचाबाची झाली. याचे रुपांतर भांडणात झाले. यामध्ये दोन्ही डॉक्टरांनी एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत प्रकरण वाढले होते. याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे अथवा रुग्णालय प्रशासनाकडे कोणाचीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
...Read More

V. S. News
लेखा विभागाच्या लिपिकाला चार हजाराची लाच घेताना अटक

व्हिएस न्यूज - बायोमॅट्रीक मशीन दुरुस्तीचे एक लाख 64 हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी लेखा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पिंपरी पालिकेतील लेखा विभागात दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली.
प्रकाश जयसिंग रोहकले (वय-39, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय कंत्राटदाराने लाच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत बायोमॅट्रीक मशीन दुरुस्तीचे कंत्राट होते. याच कंत्राटाचे एक लाख 64 हजार रुपयांच्या बिलाच्या फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन धनादेश देतो असे सांगून तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. लाचलुचपत विभागाने महापालिकेतील लेखा विभागात सापळा लावून रोहकले याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सुरेखा घार्गे यांनी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एका वर्षात लाचलुचपत विभागाची ही पाचवी कारवाई आहे.
...Read More

V. S. News
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक फरार

व्हिएस न्यूज – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर फरार झाले आहेत. गुरुवारी पुण्यात डी. एस. कें.च्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कर्जरोखे धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अर्थात डी. एस. के. आणि त्यांच्या पत्नी हेमंती या बैठकीला गैरहजर होते.

१ एप्रिल २०१८ पर्यंत मुदत कंपनीच्या इतर संचालकांनी पैसे परत करण्यासाठी वाढवून देण्याची मागणी गुंतवणुकदारांना केली आहे. पण आता डी. एस. कें.च्या शब्दावर विश्वास राहीला नसल्याने गुंतवणुकदारांनी ही मुदत देण्यास नकार देत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली. ही बैठक डीएसकेंच्या कंपनीचे संचालक आणि कर्मचारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यानेआटोपती घ्यावी लागली. पैसे परत मिळत नसल्याने अनेक गुंतवणुकदार अक्षरश रडकुंडीला आल्याच यावेळी दिसून आले.

मुदत ठेवीखाली कर्जरोखे धारकांनी सहाशे कोटी ठेवले आहेत. ज्या जागा विकल्या जातील त्यापैकी चाळीस कोटी रक्कम राहणार आहे. मुदत ठेवधारकांनी पोलिसांशी संवाद सुरु ठेवावा, जेणेकरुन ती रक्कम वेळेवर मिळेल, असे रिअल इस्टेटचे अभ्यासक रवी करंदीकर यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
शिवसेनेचा जप्त संगणक परत मिळाला

व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना कार्यालयातील जप्त करण्यात आलेला संगणक मनसेने परत मिळवून दिला आहे. मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी हा संगणक परत करावा यासाठी महापौरांकडे मागणी केली होती.

पिंपरी महापालिकेतील शिवसेना कार्यालयातील संगणक प्रशासनाने जप्त केला होता. गटनेते राहुल कलाटे यांच्या अनुपस्थितीत येथे संगणकाचा गैरवापर केला जात असल्याचे कारण आयुक्तांनी दिले होते. वास्तविक पाहता सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर हे या संगणकावरून सत्ताधारी भाजप विरोधात पत्रकबाजी करत होते. विरोधात होत असलेली प्रसिध्दी सहन न झाल्यामुळेच सत्ताधारी पदाधिकार्यांनी हा संगणकच जप्त करण्यास आयुक्तांना सांगितले होते.

प्रशासनाने केल्या या कारवाईची सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान सेना गटनेते राहुल कलाटे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते विरोध करू शकले नाहीत. मात्र शिवसेनेचे इतर नगरसेवक मुग गिळून गप्प राहिले. त्यामुळे सेनेची आक्रमकता गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले सेनेवर झालेल्या अन्यायाविरूध्द धावून आले. चिखले यांनी सत्ताधार्यांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत महापौरांना सेनेचा संगणक परत करा अशी मागणी केली.

सचिन चिखले यांनी महापौरांकडे केलेल्या या मागणीनंतर शिवसेनेचा तो जप्त करण्यात आलेला संगणक कार्यालयात परत बसविण्यात आला. एवढंच नाही तर सचिन चिखले यांच्यासाठी ही प्रशासनाने स्वतंत्र संगणक उपलब्ध करून दिला आहे.
...Read More

V. S. News
लग्नाच्या अमिषाने 16 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार

व्हीएस न्यूज - एका 16 वर्षाच्या मुलीवर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दुपारी घरामध्ये कोणी नसताना संबंधित मुलाने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केले. तसेच या घटनेची माहिती बाहेर देऊ नको असे धमकावले. पीडित मुलीने ही माहिती आईला सांगितल्यानंतर मंगळवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
...Read More

V. S. News
सांगवीत पीडब्ल्युडीच्या मुकादमाला मारहाण

व्हीएस न्यूज - पीडब्ल्युडीच्या कॉलनीत निवासस्थान बळकावून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाचे घर सील करण्यासाठी गेलेल्या मुकादमाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच 'तु काम करतो ते मी बघतो, तुला कोणास काय सांगायचे ते सांग' अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी सकाळी 11 वाजता सांगवीतील पीडब्ल्युडी कॉलनीत घडला.
पीडब्ल्युडीचे मुकादम विश्वनाथ साठे (वय-58, रा. आनंद पार्क, पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश विजय गायकवाड (रा. पीडब्ल्युडी कॉलनी, डी 1/14 नवी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत फौजदार एस. जी. पाटील यांनी माहिती दिली. योगेश गायकवाड याचे वडील पीडब्ल्युडीमध्ये कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना नवी सांगवीतील पीडब्ल्युडी कॉलनीत घर मिळाले आहे. योगेश याने त्यांच्या घराशेजारील मोकळे असलेले घर बळकावून त्यात राहू लागला. याची माहिती मुकादम साठे यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्याच्या वडीलांच्या पगारातून घराचे पैसे जमा करण्यात येऊ लागले. योगेशचे घर सील करण्यासाठी मुकादम साठे मंगळवारी पीडब्ल्युडी कॉलनीत कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी योगेशने साठे यांना शिवीगाळ करत धक्का-बुक्की केली. 'तु काम करतो ते मी बघतो, तुला कोणास काय सांगायचे ते सांग' अशी धमकी दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!