व्हीएस न्यूज –पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर चिंचवड येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने येत्या २६ डिसेंबर पासून नागरिकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यातयेणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरणास मान्यता दिली आहे. त्यानुसार तेथील विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. संभाजीनगर चिंचवड येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय येथील कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सोयीसाठी हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि माजी विरोधी पक्ष नेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय-५७) यांचे दिर्घ आजाराने मध्यरात्री एकच्या सुमारास मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
नेताजी चव्हाण यांनी १९९२ ते १९९७ दरम्यान नगरसेवक पद भूषवले आहे. तसेच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक, मोहनगर येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते. तर भगवा रक्षक या साप्ताहीकाचे ते संपादक होते.
चव्हाण यांच्या पार्थीवावर त्यांच्या मुळगावी मु.पोस्ट बोरवडे ता.कागल जि. कोल्हापूर येथे दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मोहननगर शिवसेना शाखा येथे ठेवण्यात आले होते. यावेळी स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे, मीनल यादव, माजी नगरसेवक मधुकर बाबर, मारुती भापकर, नंदकुमार सातुर्डेकर, योगेश बाबर, गणेश लंगोटे, सारंग कामतेकर, अमित बाबर, तसेच अनेक शिसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली.
व्हीएस न्यूज - मानवता हाच धर्म या महात्मा गांधी यांच्या संकल्पनेवर स्थापन झालेला कॉंग्रेस पक्ष नेहमी सहिष्णुता, समानता व मानवी अधिकार मूल्यांचा आदर करणारा पक्ष आहे. कॉंग्रेसने सर्व धर्मातील नागरिकांना बरोबर घेऊन भारताला विकसनशील राष्ट्र बनविले आहे. स्वर्गीय राष्ट्रपती डॉ. ऐ. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेनुसार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी युवक व महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचे धोरण आखले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम मुजावर यांनी केले.
पिंपरीतील बेटीना देवीदास आणि मुख्यधापिका सँड्रा अँथोनी डिसोझा यांना अनुक्रमे कॉंग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी व सचिवपदी नियुक्ती पत्र मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल प्रदेश सचिव मॅन्युअल डिसोझा, रुपा दास व रुपेश दास, मेरी चक्रनारायण आदी उपस्थित होते.
मुजावर म्हणाले कि, बेटीना दास व सँडरा डिसोझा यांच्या कामाचा पुर्वानुभव आणि जनसंपर्क पाहता त्यांची अल्पसंख्यांक कमिटीवर निवड करण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी काँग्रेसमुक्त भारत ची आरोळी ठोकली होती. त्यांचे स्वप्न देशातील दलित, युवा, महिलावर्ग कधी पुर्ण होऊ देणार नाही. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतून हे सिध्द झाले आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व ईशान्येतील राज्यात विधानसभा निवडणुकात कॉंग्रेस समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन निवडणुकांना सामोरे जाईल व यश संपादन करेल असा विश्वास मुजावर यांनी व्यक्त केला. सुत्रसंचालन रुपा दास व आभार मेरी चकरनारायण यांनी मानले.
व्हीएस न्यूज - २९-३०-२०१७ या रोजी धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने आठ ते दहा मागण्या करिता बे मुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यातिल एक प्रमुख मागणि अशि होति की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळ असणारे महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळिल परिसरास 'महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक' कायदेशिर असे नाव देण्यात यावे या करिता धम्मदिप प्रतिष्ठाणच्या वतिने धरणे आंदोलन करण्यात आले होते व त्या नंतर प्रभागाच्या कार्यकक्षम नगरसेविका मा.महापौर वैशालिताई घोडेकर यांना धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे यांनी निवेदन दिले होते त्याचि दख्खल घेउन मा.महापौर नगरसेविका वैशालिताइ घोडेकर यांनि सदर विषय प्रभाग समिति मध्ये मांडुन महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक असा ठराव 'क' प्रभाग समिति मध्ये मांडुन तो ठराव पास करण्यात आला व रविवारी पालिकेच्या वतिने महामानव विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक नामफलकाचे उद्दघाटन मा.महापौर नगरसेविका वैशालिताई घोडेकर यांच्या हस्ते रविवार रोजि 4 वाजता करण्यात आले आहे. या वेळेस धम्मदिप प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राहुल वडमारे, सुरेंद्र जाधव, निलेश सरतापे, आनंद साळवे, धर्मपाल कांबळे, नसरिन शेख, प्रशांत किर्ते,दीपक साबळे व भिम संग्राम संघटनेचे पदाधिकारी तसेच हेल्पिंग हँण्डचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव आदि जण उपस्थित होते....Read More
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002