Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
शिवसेना राजकारणात कच्चा लिंबू नाही - संजय राऊत

व्हीएस न्यूज - भारतीय जनता पार्टीचे राज्य महाराष्ट्राच्या हिताचे नाही. शेतक-यांना कर्जमुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेने प्रथम नाशिक मध्ये केली. त्यानंतर चारच दिवसात कर्जमुक्ती जाहीर झाली. ही कर्जमुक्ती शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखी आहे. सत्तेत राहून हे जाहीरपणे सांगण्याची हिंम्मत शिवसेनेत आहे. शिवसेना राजकारणात‘कच्चा लिंबू’ नाही. सत्तेची उलथापालट शिवसेना केंव्हाही करु शकते. महाराष्ट्रात कधीही निवडणूका होतील अशी आरोळी समोरील पक्ष ठोकतात. त्यांची हिंम्मत असेल तर निवडणूका घ्याव्यात. शिवसेना निवडणुकीला तयार आहे. महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेची संघटना बांधणी सुरु झाली आहे. कधीही निवडणूका घेतल्या तरीही शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल. असा ठाम विश्वास शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.

भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा निहाय मतदार संघांची बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहर प्रमुख व मनपा गटनेते राहूल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, मधुकर बाबर,भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.

यावेळी संजय राऊत पुढे म्हणाले की, हिमाचल प्रदेश आणि गुजरात मध्ये एकाच वेळी निवडणूका होणार असतील तर अद्यापपर्यंत गुजरातच्या तारखा जाहीर का केल्या नाहीत? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. सत्तेत राहून आंदोलने करणे हा विरोधाभास नाही तर विरोधी पक्ष आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने करीत आहे. मुंबईतील मनसेचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न बीजेपी करीत होते. पण त्यांच्या हाताला काही लागले नाही म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे. किरीट सोम्मया काय म्हणतात याला मी महत्व देत नाही. मुंबईत कायम शिवसेनेचा महापौर राहील. नांदेड मध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार आणि कॉंग्रेसचे नगरसेवक भाजपाने फोडले तरीही जनतेने त्यांना नाकारले. शिवसेनेला कायम लढण्याची सवय आहे. त्यामुळे सत्तेचा फायदा शिवसेनेला कधीही झाला नाही. या सरकारच्या कोणत्याही पापाचे शिवसेना भागीदार नाही. त्यामुळे आम्ही रोज सरकारला उठथा लाथ बसता बुक्का मारीत आहोत. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

...Read More

V. S. News
महापौर, स्थायी समिती अध्यक्षा आणि आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन

व्हीएस न्यूज - पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी रमाबाई आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी डीबीएन्‌ ग्रुपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष आणि लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष धुराजी राणोजी शिंदे आणि आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी आज शुक्रवारी (दि 13 ऑक्टोबर 2017) रोजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे जाहिर अभिनंदन केले. धुराजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धुराजी शिंदे, सरिता जामनिक, विशाल कसबे, हिराभाई लांडगे, अरुण मैराळे, शरद कांबळे, संजय ओव्हाळ,दत्ता गोडसे, नसीम शेख, मनोज गजभार, माऊली बोराटे, उमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी अशी मागणी केली की, आगामी अर्थसंकल्पात या विषयी आर्थिक तरतूद करावी आणि पुढील वर्षभरात रमाबाई आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी उभा करावा.

10 जानेवारी 2017 रोजी मा. आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांच्याकडे प्रथम धुराजी राणोजी शिंदे यांनी पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी रमाबाई आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली होती. तसेच 16 जून 2017 रोजी एक दिवसाचे लक्षणिक उपोषण केले होते.

यावेळी धुराजी शिंदे यांच्या समवेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, बौध्द विकास महासंघाचे अध्यक्ष शरद जाधव, डीबीएन्‌.ग्रुपचे शहराध्यक्ष नितीन वाघमारे, पुतळा पुष्पहार समितीचे पदाधिकारी, लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र सचिव सचिन जाधव, कायदा सल्लागार ॲड. सुनिल जामनिक, महिला शहराध्यक्षा ॲड. सरीता जामनिक, डीबीएन्‌ ग्रुप रिक्षा वाहतुक आघाडीचे शहराध्यक्ष हिरा लांडगे, मोशी अध्यक्ष माऊली बोराटे, एन्‌एस्‌युआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बिरसा मुंडा संघटनेचे पांडूरंग परचंडराव, पिंपरी चिंचवड शहर सचिव लोकजनशक्ती पार्टी अरुण मैराळे, कार्याध्यक्ष दत्ता गोडसे, धम्म दिप प्रतिष्ठानचे राहूल वडमारे, भिमाई महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सज्जनबाई गायकवाड, यशोधरा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भामाबाई जगताप, एम्‌आयएम्‌चे शहर प्रवक्ते धम्मराज साळवे, भारतीय बौध्द महासंघाचे पिंपरी अध्यक्ष मनोज गजभार, पिपल्स रिपब्लीकन शहराध्यक्ष सुनिल ढसाळ, ज्ञानेश्वर बोरकर, फारुख कुरेशी, नसीम शेख, प्रविण कांबळे, दत्ता प्रधान, शिवाजी कदम, उमेश गायकवाड, शरद कांबळे, कौसाबाई गजभार, राधाबाई गायकवाड, कमल कांबळे, सुमन कांबळे, संजीवनी शिंदे, सखूबाई शिंदे, कांताबाई कांबळे, सुशाला शिंदे, सुनिता दळवी, विजय कांबळे, केशर वाघमारे, ललीता सावंत आदींसह अनेक आंबेडकर अनुयायांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला होता. यानंतर मनपा प्रशासनाने रमाबाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत कारवाई सुरु केली.

...Read More

V. S. News
स्पीड ब्रेकरवर डंपरने तरूणीला चिरडले, 25 वर्षीय भाग्यश्रीचा जागीच मृत्यू

व्हीएस न्यूज - भरधाव डंपरने दुचाकीला उडवल्याने तरुणी जागीच ठार झाल्याची घटना येरवड्यातील शास्त्रानीगर येथे शनिवारी सकाळी घडली. भाग्यश्री रमेश नायर (२५,रा.वडगावशेरी,पुणे) असे मृत तरुणीचे नाव अाहे. याप्रकरणी येरवडा पाेलिसांनी डंपर चालक सागर चाैगुले याला अटक केली अाहे. भाग्यश्री ही तरुणी एका खासगी बँकेत नाेकरी करत हाेती. तसेच महाराष्ट्र लाेकसेवा अायाेग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत हाेती. शनिवारी सकाळी ती कुटुंबीयांना तुळजापूर येथे जाण्यासाठी तिकीट घेऊन येत हाेती. या वेळी शास्त्रीनगर येथील चाैकात सिग्नलला पाठीमागून अालेल्या डंपरने तिच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे भाग्यश्रीचा ताेल जाऊन ती रस्त्यावर पडली व तिच्या डाेक्यावरून डंपरचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी डंपर चालक चौगुले याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.

असा झाला अपघात
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 9 वाजता येरवडा येथील शास्त्रीनगर या चौकात हा अपघात झाला.
- या अपघात 25 वर्षीय भाग्यश्री रमेश नायर हिचा मृत्यू झाला. भाग्यश्री ही वडगाव शेरी येथील शुभम सोसायटीत राहत होती.
- भाग्यश्रीचे लग्न झाले नव्हते आणि तिच्या घरचे तिच्यासाठी योग्य वर शोधत होते.
- ती एका खासगी बॅंकेत कामाला होती. ती एमपीएससीची तयारी करत होती अशी माहिती तिच्या मित्रांनी दिली.
- पोलिसांनी ट्रक चालक सागर चौगुलेला अटक केली आहे.

कॅमेऱ्यात कैद झाली पू्र्ण घटना
- शास्त्रीनगर चौकात झालेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात भाग्यश्रीला डंपरचा धक्का लागल्यानंतर ती पडल्याचे कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे.
...Read More

V. S. News
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भुमिपूजन

व्हीएस न्यूज मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या धर्तीवर मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भूमिपुजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते गुरुवारी (दि.12) करण्यात आहे. गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे.

या कार्यक्रमाला यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मौजे मोशी येथे सेक्‍टर क्रमांक 5 व 8 मधील सुमारे 98 हेक्‍टर जागेमध्ये “आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता, विविध विभागाच्या परवानगी मिळविण्याचे काम प्राधिकरण प्रशासनाकडून सुरु आहे. पिंपरी- चिंचवड शहरात व चाकण परिसरात बहुराष्ट्रीय उद्योग समूहांचे उत्पादन प्रकल्प आहेत. आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामुळे या परिसरात येणाऱ्या उद्योग समुहांच्या प्रकल्पांमध्ये भर पडणार असून, त्यामुळे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधीही निर्माण होणार आहेत. या केंद्रामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ तयार होणार आहे. तसेच,स्थानिक कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

...Read More

V. S. News
दिवाळीत आकाशातील “फ्लाईंग लॅटर्न’वर बंदी

व्हीएस न्यूज - आग लागण्याच्या दुर्घटनांमुळे दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर (फ्लाईंग लॅटर्न) पुणे व मुंबई पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने राज्यभरात ही बंदी कायम केली असून, आकाश कंदील उडविण्याबरोबरच विक्री व साठा करण्यावर बंदी घातली आहे. आकाशात दिवे उडविल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वात पेटविल्यानंतर पॅराशुटप्रमाणे हा आकाश कंदील उंच जातो. त्यानंतर पुन्हा दिवा जमिनीच्या दिशेने येतो. हा दिवा खाली झेपावताना तो घरांच्या छतांवर तसेच झाडांवर पडतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना दरवर्षी दिवाळीदरम्यान घडतात. दिवाळी पहाट कार्यक्रमांबरोबरच रात्री उशिरापर्यंत “फ्लाईंग लॅटर्न’ आकाशात झेपावताना दिसतात. अशाप्रकारे 17 जानेवारी 2015 मध्ये उडविलेला आकाश कंदील मालाडमधील इमारतीवर ठेवलेल्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या व इतर बांधकाम साहित्यावर पडून मोठी आग लागली होती. या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलीस उपायुक्‍तांनी आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर बंदी घातली आहे. आकाशात दिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,नगरपालिका मुख्याधिकारी व विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आकाश कंदीलाचा वापर करुन, दहशतवादी कृत्य घडण्याची शक्‍यता नाकारता येत नसून, या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, थायलंडसारख्या देशांकडूनही “फ्लाईंग लॅटर्न’वर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय अग्निशमन सुरक्षा संस्थेने देखील अशाप्रकारच्या आकाश कंदीलवर बंदी घालण्याचे समर्थन केले आहे. यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.

...Read More

V. S. News
विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्‍त दिवाळी साजरा करण्याचा संकल्प

व्हीएस न्यूज पर्यावरण संरक्षणसाठी एक प्रभावी उपक्रम म्हणून “फटाके मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प मॉडर्न निगडी संकुलातील 1500 शालेय विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली व पैशाची बचत करून पुस्तके खरेदी करणे, अनाथाश्रमाला व वृद्धाश्रमाला मदत करण्याचा संकल्प घेतला.

याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार यांनी मार्गदर्शन करताना फटाके उडविण्याची परंपरा, सद्यस्थितीत पर्यावरणाची होणारी हानी,परिसरातील पशुपक्षी यांवर होणाऱ्या परिणामाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्याचबरोबर प्रदूषणातून कॅन्सरसारख्या भयावह रोगाची कल्पना विध्यार्थ्यांना दिली. विदेशी फटाक्‍यांतून निर्माण होणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांमुळे फटाक्‍यांपासून स्वतःला, कुटुंबाला अलिप्त ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक गोकुळ कांबळे,पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, अनिसच्या कार्यकत्या श्रीमती बुद्धीसागर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रतिज्ञा वाचन विजय गायकवाड यांनी केले.

...Read More

V. S. News
पिंपळे निलख येथील डीपी रस्ता स्मार्ट वार्डात समाविष्ट करण्याची मागणी

व्हीएस न्यूज महापालिकेच्या हद्दीलगत प्रभाग क्रमांक 26 मधील विशाल नगर ते बाणेर पुलासह 24 मीटरचा नदीच्या पलीकडील डीपी रस्ता पुणे महापालिकेच्या स्मार्ट वॉर्डात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी या भागाला लागून असलेला पिंपळे निलख येथील डीपी रस्ता देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

यासंदर्भात कामठे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपळे-निलख हा उच्चभ्रू व सुशिक्षीत लोकवस्तीचा भाग आहे. त्यातच नदीपलीकडील पुणे महापालिकेच्या हद्दीतील बाणेरचा भागही उच्चभ्रू लोकवस्तीचा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महापालिका हद्दीला जोडणारा डीपी रस्ता विशालनगरमधून बाणेरला जोडला आहे. दोन्ही महापालिकांसाठी हा रस्ता म्हणजे प्रवेशद्वार मानला जातो. बाणेरमधील डीपी रस्त्याचा भाग पुणे महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट केला आहे व तो विकसित करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे विशालनगर भागातील रस्ता पिंपरी पालिकेनेही स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, असे कामठे यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा कंदील मोर्चा

व्हीएस न्यूज – भारनियमन जाहीर करून राज्याला अंधाराच्या खाईत लोटणाऱ्या महा-वितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीने शुक्रवारी कंदील मोर्चा काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. महा-वितरणचे पिंपरी विभागीय कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांना कंदील-कोळसा भेट दिला.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे व युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, नगरसेविका संगीता ताम्हणे, अपर्णा डोके, पक्ष प्रवक्‍ते फजल शेख, मछिंद्र तापकीर, आनंदा यादव, कविता खराडे, गंगा धेंडे, विजया काटे, विश्रांती पाडाळे, मिनाक्षी उंबरकर, वर्षा शेडगे, प्रदीप गायकवाड, अभिषेक बोके, उत्तम आल्हाट, फिरोज शेख, यतीन पारेख, धैर्यशील धर्मे, महेश झपके, संदीप पाटील, विशाल काळभोर, विनोद कांबळे, ऋषिकेश वाघेरे, रवींद्र वाकडकर, अतुल वाकडकर, ऋषिकेश वाकडकर, निशांत वाकडकर, बाळासाहेब पिल्लेवार, विठ्ठल गुजर, संतोष वाघेरे, रशीद सय्यद, अलोक गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संजोग वाघेरे म्हणाले, दहा दिवसांपूर्वी राज्यात भारनियमन जाहीर केल्याने महा-वितरण विरोधात राज्यात असंतोष पसरला. अतिरिक्‍त वीज उपलब्ध असताना देखील भारनियमन करणे चुकीचे असल्याची टीकेची झोड उठल्यानंतर केवळ शहरी भागाला भारनियमनातून वगळल्याचे जाहीर केले. मात्र अद्याप ग्रामीण भागात भारनियमनाच्या नावाखाली बारा-बारा तास वीज नसते. शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता अतिरिक्‍त विजेचा सर्व भागांत पुरवठा करावा. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी दिला. नगरसेवक भाऊसाहेब भोईर व विशाल वाकडकर यांनी देखील महा-वितरणच्या पक्षपाती धोरणावर टीका केली.

...Read More

V. S. News
वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची संख्या वाढविण्याचा निर्णय

व्हीएस न्यूज महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात डॉक्‍टरांची संख्या अपुरी असल्याने चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्यात कमतरता येत नाही. डॉक्‍टरांची संख्या वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. डॉक्‍टरांना काही सवलती व भत्ते वाढवून आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सत्तारुढ पक्षनेते यांच्या उपस्थिती डॉक्‍टरांच्या संख्या वाढविण्यासाठी गुरुवारी (दि.12) बैठक घेण्यात आली. वायसीएमसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये डॉक्‍टरांची आवश्‍यकता आहे. हे डॉक्‍टर उपलब्ध व्हावेत, यासाठी काही पर्यायांचा विचार केला जात आहे. प्रामुख्याने डॉक्‍टरांसाठी असलेला व्यावसायरोध भत्ता (एनपीए) स्विकारणे ऐच्छिक केले जाणार आहे. त्यामुळे काही डॉक्‍टर खासगी क्षेत्रात सेवा बजावून देखील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करू शकतील,असेही पवार यांनी सांगितले.

त्याचबरोबर पालिकेच्या निवासी डॉक्‍टरांना त्यांच्या शिफ्टनुसार कमी-अधिक भत्ता देणे गरजेचे आहे. बंधपत्रित डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने ते वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, आरएमओ डॉक्‍टरांसाठी 1200 रुपयांचा भत्ता 194 पासून वाढविलेला नसल्याने तो वाढवावा. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयासाठी कर्मचारी वर्ग नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असेही पवार यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
नांदेड महापालिकेत काँग्रेसचा विजय म्हणजे भाजपच्या परतीच्या प्रवासाचे संकेत

व्हीएस न्यूज – नांदेड महापालिकेत कॉंग्रेस पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापर आणि भाजपच्या परतीच्या प्रवासाचे संकेत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केली.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने घवघवीत यश मिळविले. त्या निमित्ताने सचिन साठे आणि महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या हस्ते संत तुकारामनगर पिंपरी येथे नागरीकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी सचिन साठे बोलत होते.

यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवक अध्यक्ष मयुर जैयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, तारीक रिझवी, भाऊसाहेब मुगूटमल, हिरा जाधव, नंदा तुळसे,अर्जुन खंडागळे, विठ्ठल कळसे, सागर धावडे, इर्शाद शेख आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई?

व्हीएस न्यूज - आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. अनिल रॉय यांच्या ऐवजी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे डॉ. पवन साळवे यांची नेमणूक करण्याचा ठराव विधी समितीने नुकताच पारित केला. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याचा आरोप डॉ. रॉय यांनी केला. या आरोपाने पालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांना प्रशासकीय नोटीस बजावली आहे. यासंदर्भात24 तासाच्या आत समाधानकारक खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सक्त सूचना हर्डीकर यांनी दिली आहेत. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदावर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने या पदावर सेवा ज्येष्ठता कार्यकाळाचा विचार करून डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती दिली. शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना डावलण्यात आले. मात्र, फेब्रुवारी 2017 रोजी पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर ही पदोन्नती योग्य नसल्याचे सांगून सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने पदोन्नतीचा फेरप्रस्ताव विधी समितीसमोर आणला. त्याला विधीने मंजुरीही दिली. त्यामुळे डॉ. रॉय यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा प्रशासनाला साक्षात्कार कसा काय झाला?. प्रशासन राजकीय दबावाला बळी पडले असून यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचाही आरोप रॉय यांनी केला आहे. त्यांच्या आक्षेपार्ह आरोपामुळे पालिकेची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त हर्डीकर यांनी त्यांन नोटीस बजावली आहे.

साळवे यांच्या पदोन्नतीचा ठराव विधीने मंजूर केल्यानंतर रॉय यांनी आयुक्त हर्डीकर यांना स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केला आहे. त्यामध्ये आयुक्तांसह प्रशासनावर आरोप केले आहेत. आरोपाच्या बातम्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेची बदनामी झाली असून रॉय यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात नागरिकांनी निवेदने दिली आहेत. त्यामुळे रॉय यांच्यावर बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवला आहे. कार्यालयीन शिस्तभंगाचा ठपका ठेवून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56 (2) मधील तरतुदींनुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? असे आयुक्त हर्डीकर यांनी नोटिसीत नमूद केले आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून 24 तासाच्या आत याबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले आहेत. असमाधानकारक खुलासा केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणींत दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे.

...Read More

V. S. News
शहराच्या विकासात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा – महापौर

व्हीएस न्यूज महापालिकेला ग्रामपंचायत ते महापालिका असा 35 वर्षाचा इतिहास आहे. महापालिकेच्या विकासामध्ये स्व.यशवंतराव चव्हाण व अण्णासाहेब मगर यांचा मोलाचा वाटा आहे. शहराच्या विकासात कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा, उद्योजकांचा, गुणवंत कामगारांचा तसेच महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्य कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) सत्कार करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार अमर साबळे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य शैलेश मोरे, विलास मडिगेरी, उत्तम केंदळे, आरती चोंधे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले, मनपाच्या विकासासाठी महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व शहरवासियांनी योगदान दिले पाहिजे. आपला प्रामाणिकपणा आपल्या कर्तव्यातून दाखवून दिला पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिका कामगारांची नगरी आहे. सर्वांचा समन्वय साधून वातावरण चांगले राहण्यासाठी तसेच पुढील 30-40 वर्षांचा विचार करुन महापालिकेचा विकास होण्यासाठी पदाधिकारी, नगरसदस्य व अधिकारी यांनी काम केले पाहिजे. शहरातील खेळाडूंना व उल्लेखनीय काम करणाऱ्यांना न्याय देण्याचे काम महापालिकेने करावे. पिंपरी-चिंचवडची ओळख अण्णासाहेब मगर यांच्यामुळे आशिया खंडात झाली आहे, पुढेही ती अशीच रहावी. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते यावेळी म्हणाले.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, अण्णासाहेब मगर यांनी शहराला दिशा दिली, पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी त्यांच्या स्वप्नातून साकार झाली. आज महापालिकेच्या विकासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. महापालिका विकासामध्ये आपण योगदान दिले पाहिजे, असे ध्येय सर्वांनी निश्‍चित केले पाहिजे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी काम करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी आभार मानले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!