स्पीड ब्रेकरवर डंपरने तरूणीला चिरडले, 25 वर्षीय भाग्यश्रीचा जागीच मृत्यू
पुणे
2017-10-15
व्हीएस न्यूज - भरधाव डंपरने दुचाकीला उडवल्याने तरुणी जागीच ठार झाल्याची घटना येरवड्यातील शास्त्रानीगर येथे शनिवारी सकाळी घडली. भाग्यश्री रमेश नायर (२५,रा.वडगावशेरी,पुणे) असे मृत तरुणीचे नाव अाहे. याप्रकरणी येरवडा पाेलिसांनी डंपर चालक सागर चाैगुले याला अटक केली अाहे. भाग्यश्री ही तरुणी एका खासगी बँकेत नाेकरी करत हाेती. तसेच महाराष्ट्र लाेकसेवा अायाेग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत हाेती. शनिवारी सकाळी ती कुटुंबीयांना तुळजापूर येथे जाण्यासाठी तिकीट घेऊन येत हाेती. या वेळी शास्त्रीनगर येथील चाैकात सिग्नलला पाठीमागून अालेल्या डंपरने तिच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे भाग्यश्रीचा ताेल जाऊन ती रस्त्यावर पडली व तिच्या डाेक्यावरून डंपरचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी डंपर चालक चौगुले याला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
असा झाला अपघात - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी 9 वाजता येरवडा येथील शास्त्रीनगर या चौकात हा अपघात झाला. - या अपघात 25 वर्षीय भाग्यश्री रमेश नायर हिचा मृत्यू झाला. भाग्यश्री ही वडगाव शेरी येथील शुभम सोसायटीत राहत होती.
- भाग्यश्रीचे लग्न झाले नव्हते आणि तिच्या घरचे तिच्यासाठी योग्य वर शोधत होते. - ती एका खासगी बॅंकेत कामाला होती. ती एमपीएससीची तयारी करत होती अशी माहिती तिच्या मित्रांनी दिली.
- पोलिसांनी ट्रक चालक सागर चौगुलेला अटक केली आहे.
कॅमेऱ्यात कैद झाली पू्र्ण घटना - शास्त्रीनगर चौकात झालेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात भाग्यश्रीला डंपरचा धक्का लागल्यानंतर ती पडल्याचे कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे.