व्हीएस न्यूज – महापालिकेच्या हद्दीलगत प्रभाग क्रमांक 26 मधील विशाल नगर ते बाणेर पुलासह 24 मीटरचा नदीच्या पलीकडील डीपी रस्ता पुणे महापालिकेच्या स्मार्ट वॉर्डात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी या भागाला लागून असलेला पिंपळे निलख येथील डीपी रस्ता देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.
यासंदर्भात कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपळे-निलख हा उच्चभ्रू व सुशिक्षीत लोकवस्तीचा भाग आहे. त्यातच नदीपलीकडील पुणे महापालिकेच्या हद्दीतील बाणेरचा भागही उच्चभ्रू लोकवस्तीचा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही महापालिका हद्दीला जोडणारा डीपी रस्ता विशालनगरमधून बाणेरला जोडला आहे. दोन्ही महापालिकांसाठी हा रस्ता म्हणजे प्रवेशद्वार मानला जातो. बाणेरमधील डीपी रस्त्याचा भाग पुणे महापालिकेने स्मार्ट वॉर्डात समाविष्ट केला आहे व तो विकसित करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे विशालनगर भागातील रस्ता पिंपरी पालिकेनेही स्मार्ट वॉर्डात समाविष्ट करावा, असे कामठे यांनी म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002