Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
पिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे. त्यांच्या निवडीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाकडे शिफारस केली होती.

गेल्या चार वर्षांपासून राहुल कलाटे यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ते वाकड येथून नगरसेवकपदी निवडून आले होते. सध्या त्यांच्याकडे महापालिकेचे गटनेतेपद आहे. कलाटे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे त्यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहरप्रमुख पदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती.

योगेश बाबर हे पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख होते. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. बंडखोरी केल्यामुळे त्यांना पदच्युत करण्यात आले होते. माझ्यावरील अन्यायाविरोधात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असल्याचे सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी त्यांनी जुळवून घेतल्यामुळे बारणे यांनी शहरप्रमुख म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे त्यांना शहरप्रमुखपद बहाल करण्यात आले आहे.

बाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत.

...Read More

V. S. News
नगरसेवक संजय वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणीनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बुधवार दि.१७ रोजी इंद्रायणीनगर मिनी मार्केट येथे सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराचे उद्घाटन माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते होणार आहे. ९.३० वाजता बिल्डींग नं.६०/४ से.नं.२ येथे माता पिता संघ कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १० वाजता बालाजीनगर टेल्कोरोड येथे आरोग्य शिबीर, १०.१५ वाजता बालाजीनगर येथील अंगणवाडी-बालवाडी मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, तसेच १०.३० वाजता खंडेवस्ती येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, ११ वाजता इंद्रायणीनगर येथील अदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना फळवाटप, दुपारी १२ वाजता भोसरी पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळा येथे अन्नदान तसेच १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा येथे अन्नदान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता इंद्रायणीनगर गणेशमंदीर येथे महिला बचत गटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्काराचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम इंद्रायणीनगर येथील से.नं.२ मिनी मार्केट येथे होईल. तसेच इंद्रायणीनगर येथील नगरसेवक संजय वाबळे यांचे कार्यालय येथे दि.१६ ते दि.२० जानेवारी दरम्यान मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी पुस्तकांच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आलीय. बहुजन हिताय सुखाय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती संजय वाबळे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनी विकल्या, हफ्ते गोळा केले; सीआयडी चौकशीची मागणी

व्हीएस न्यूज पिंपळेगुरवमधील राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने पूररेषेतील जमिनींची अनधिकृत व्यवहाराद्वारे विक्री केली आहे. त्याच जागांवर आज मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून, त्यांना अभय मिळत आहे. ही अनधिकृत बांधकामे करण्यासाठी संबंधित नागरिकांकडून लाखो रुपयांचा हफ्ता गोळा केला गेला आहे. तसेच या माजी नगरसेवकाने महार वतनाच्या जमिनींचीही परस्पर विक्री केली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना भाजपकडून अभय मिळत असल्याचे या माजी नगरसेवकाने सांगणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील जमीन विक्रीतून नागरिकांच्या झालेली आर्थिक फसवणूक आणि महार वतनाच्या जमिनींची परस्पर विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी केली आहे.

यासंदर्भात स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “पिंपळेगुरवमधील एका माजी नगरसेवकाने आपल्या प्रभागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या नागरिकांकडून सर्रासपणे हफ्ते गोळा केले आहेत. त्यांची प्रभागात दहशत असल्यामुळे नागरिकांनाही आपले बांधकाम करण्यासाठी हफ्ते देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे असंख्य गोरगरीब नागरिकांकडून अनधिकृत बांधकामांसाठी हफ्ते या माजी नगरसेवकाने लाखोंची माया गोळा केली आहे. या माजी नगरसेवकाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविलेल्या या माजी नगरसेवकाला मतदारांनी घरी बसविले.

भाजपची लाट असतानाही मतदारांनी या माजी नगरसेवकाला नाकारले. या माजी नगरसेवकाने पिंपळेगुरव आणि सांगवी भागातील पूररेषेतील अनेक जमिनींची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. त्यातून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. नागरिकांनी जमिनी खरेदी केल्यानंतर संबंधित जागा ही पूररेषेत असल्याचे लक्षात आले. परंतु, या माजी नगरसेवकाची प्रभागात दहशत असल्यामुळे एकाही नागरिकाने त्याबाबत कोणाकडे तक्रार केलेली नाही. परंतु, निवडणुकीत पराभव करून नागरिकांनी या माजी नगरसेवकावर असलेला रोष व्यक्त केला.

या माजी नगरसेवकाने बेकायदेशीरपणे विकलेल्या पूररेषेतील जागांवरच शेकडो अनधिकृत बांधकामे झाली आहेत आणि आजही काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांना आता अभय मिळत आहे. असे असताना या माजी नगरसेवकाने अनधिकृत बांधकामांवर बोलणे म्हणजे चोराने उलट्या बोंबा मारण्यासारखा प्रकार आहे. पूररेषेतील बांधकामांवर महापालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. याच महाशयाने महार वतनांच्या जमिनींची परस्पर विक्री करून मागासवर्गातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सांगवी व पिंपळेगुरवर भागातील पूररेषेतील जमिनींची विक्री, नागरिकांची झालेली आर्थिक फसवणूक तसेच महार वतनांच्या जमिनींची परस्पर झालेल्या विक्रीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

...Read More

V. S. News
परमार्थात श्रवण व सद्‌गुरुंना महत्व - प्रल्हाद वामनराव पै

व्हीएस न्यूज - परमार्थात श्रवण व सद्‌गुरु यांना फार महत्व आहे. सद्‌गुरुशिवाय गती नाही तर श्रवण हा परमार्थाचा पायाच आहे. कोणाकडून तरी माळ किंवा मंत्र घेतला म्हणजे आपल्याला सद्‌गुरु मिळाला असे समजू नये. वास्तविक, गुरु-शिष्य संबंध जोडण्याची ही केवळ एक सांप्रदायिक रीत आहे. इतकेच याने परमार्थ-मार्गात पहिले पाऊल टाकले एवढेच घडले. श्रवणाची वाट चोखाळली शुध्द। गेले भेदाभेद निवारोनी।। असे मार्गदर्शन प्रल्हाद वामनराव पै यांनी रविवारी भोसरी येथे केले. आमदार महेश लांडगे आणि मित्र परिवाराने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याच्या समारोप प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे, जीवनविद्या मिशनचे माजी विश्वस्त शैलेश मोरे, पै. किसनराव लांडगे, पै. सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

खा. श्रीरंग बारणे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक सुखाच्या मागे धावत आहे. सुख कुठे मिळेल याचा शोध माणूस अव्याहतपणे घेत असतो. काही वेळा तो आपल्या मार्गावरुन भरकटण्याचा सुध्दा धोका असतो. परंतू जीवनविद्या मिशन समाजाला सुखाचा मार्ग दाखविण्याचे काम करीत आहे. सद्‌गुरु वामनराव पै यांचे हे कार्य प्रल्हाद पै पुढे नेत आहेत. प्रारंभी खा. बारणे, आ. महेश लांडगे यांचा मिशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर उद्योजक कार्तिक लांडगे, नितीन लांडगे, युवराज लांडगे, नितीन लांडगे, सागर लांडगे, प्रज्ञा कार्तिक लांडगे यांनी प्रल्हाद पै यांचा सत्कार केला.

या तीन दिवसीय सोहळ्यात राज्यभरातून सुमारे एक लाखांहून जास्त साधकांनी पै यांच्या प्रबोधनपर व्याख्यानाचा लाभ घेतला. 450 हून जास्त व्यक्तींनी अवयव व देहदानाचे अर्ज भरले. जीवनविद्या मिशनच्या वतीने चालविण्यात येणा-या संस्कार शिक्षण अभियान, गर्भ संस्कार, विद्यार्थ्यांना, तरुणांना मार्गदर्शन, कौटूंबिक सौख्य, स्वानंदयोग, जीवन जगण्याची कला, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या मार्गदर्शन शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. यासाठी महेशदादा लांडगे स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि मित्र परिवार प्रयत्नशील राहिल असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

जीवनविद्या मिशन आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या वतीने तीन दिवस अवयव प्रत्यारोपण, प्रतिरोपण आणि अवयव आणि देह दानाविषयी जगजागृती करण्यात आली. अवयव दान करण्यास इच्छुक असणा-या व्यक्तींचे अर्ज भरुन घेण्यात आले. यामध्ये राजू हरिभाऊ भगत या अंध व्यक्तीसह 450 व्यक्तींनी अवयव दानाचे अर्ज भरले. अशी माहिती समन्वयक विवेक पालव यांनी दिली.

पै पुढे म्हणाले की, मनावर ताबा मिळविण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. साधनेमुळे हळूहळू माणसाच्या मानसिकेतेत बदल होतो. माणसातील कृतघ्नपणा संपून कृतज्ञपणा जागृत होतो. माणसाची आसक्तीची ओढ कमी होऊन विरक्तीकडे प्रवास सुरु होतो. एखादे कर्म करताना कुठे थांबायचे हे कळले की मनुष्य प्रगतीकडे वाटचाल करतो. कर्म करत असताना आपण दैववादी होतो. देवावर अवलंबून राहतो. परंतू देवाने मनुष्याला प्रारब्ध दिले आहे. ते कर्म करण्यासाठी, म्हणजेच कर्म करण्यासाठीच प्रारब्ध भोगताना एका बाजूने कर्म दुस-या बाजूने प्रारब्ध आणि या दोन्हीच्या माध्यमातून क्रियमान व्हावे. कर्माचे फळ मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती यावी लागते. संगत आणि संस्कार यातून अनुकूल परिस्थिती निर्माण होते. चांगल्या संगतीने गुण तर कुसंगतीने दोष वर येतात. सध्या युवा पिढीमध्ये नैराश्यमुळे व कुसंगतीमुळे व्यसनाचे व आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अंत:र्मन शांत असेल तर अशा परिस्थितीवर सहज मात करता येते. अंत:र्मन शांत राहण्यासाठी जीवनविद्येची प्रार्थना म्हणा, मन शांत होईल. अंत:र्मन तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल, असे पै यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
अमित बच्छाव यांचा राज्यस्तरीय ‘विश्वरत्न गौरव’ पुरस्काराने सन्मान

व्हीएस न्यूज - सामाजिक व क्रिडा सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल अमित राजेंद्र बच्छाव यांना राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील व विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय हवामान व कृषी तज्ञ शास्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे, प्रमुख पाहुणे नंदकुमार वाळंज, सुरेश कोते, शिवाजीराव कोते, शिवाजी घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन “राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव २०१७” पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते.

काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्ये देखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील, परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करुया. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडूवृत्तीने समाजासाठी कार्य करणा-यांची गरज आहे असे मत अमित बच्छाव यांनी सत्कारानंतर व्यक्त केले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

...Read More

V. S. News
कामगार कायद्यासाठी सुधारित अध्यादेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – इरफान सय्यद

पिंपरी – माथाडी कामगार दिवसभर घाम गाळून कष्टाचे काम करतात. परंतु, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या बाजूने घेतलेल्या कायद्याची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही, हे मोठे दुदैव आहे. माथाडी मंडळाने सुधारीत अध्यादेशाची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केली आहे. कायद्याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

तसेच, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना साकडे घातले असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरीत बुधवार दि.१० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, ज्ञानोबा मुजुमले, राजू तापकीर, भिवाजी वाटेकर, समर्थ नाईकवडे, ओमकार माने, नागेश व्हनवटे, पांडूरंग काळोखे, संदीप मधुरे, गोरक्षनाथ दुबले, संतोष जाधव, मारुती कौदरे आदी उपस्थित होते.

इरफान सय्यद म्हणाले, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यात कार्यरत असणाऱ्या माथाडी, हमाल, कष्टकरी, असंघटीत हमाल या सारख्या श्रमजिवी कामगारांच्या नोकरीचे नियमन करणे, त्यांच्या कामाच्या बाबतीत अटी, शर्ती तसेच श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत अधिक चांगल्या तरतुदी करण्यासाठी माथाडी कामगार कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. त्या संबंधीचा सुधारित अध्यादेव देखील काढला आहे. या सुधारित कायद्यात माथाडी मंडळाच्या योजनांच्या माध्यमातून असुरक्षित कष्टकरी माथाडी कामगारांच्या तसेच त्यांच्या मालकांच्या नोंदण्या करण्याबरोबर या असुरक्षित घटकांसाठी स्वतंत्र्य भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बोनस, भरपगारी रजा, आरोग्य सुविधा, कामाच्या निश्चित वेळा, कामगारांना नोकरीविषयक संरक्षण अशा विविध कामगारांना सुविधा दिल्या आहेत. तसेच, मुंबई, ठाणे परिसरातील कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून आरोग्यसुविधा दिल्या जातात. परंतु, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक परिसरातील माथाडी कामगारांसाठी अशा सुविधा दिल्या जात नाहीत. जीवन विमा निगम या संस्थेच्या सुविधा मिळत नाहीत. सरकारचा हा कायदा व त्यातील योजना अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत.

प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. या सुधारित अद्यादेशाची माथाडी मंडळाकडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित राहत आहे. हाल अपेष्टात माथाडी कामगार विविध सोयी-सुविधांपासून वंचित रहात आहे. हाल अपेष्टात जीवन जगतात. त्यामुळे माथाडी कामगार मंडळाने सुधारित अद्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर माथाडी मंडळात करोडे रुपयांचा भरणा होत असतानादेखील मंडळातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी हजारो कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. याकडेही सय्यद यांनी लक्ष वेधले आहे. हे प्रश्न लवकरात- लवकर मार्गी लागावेत, अन्यथा आगामी काळात महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने हजारो कामागारांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपण स्वतः कामगार मंत्री संभाजीराज निलंगेकर पाटील यांना निवदेन दिले आहे. मंत्री पाटील यांनी कष्टकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा देखील सय्यद यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

...Read More

V. S. News
पुण्यात खंडणीसाठी बिल्डरची गोळ्या घालून हत्या

व्हीएस न्यूज - डेक्कन जिमखाना परिसरात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा आज सकाळी मृत्यू झाला. देवेंद्र शहा असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. प्रभात रस्ता, गल्ली क्रमांक ८ येथे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

डेक्कन परिसरात काल शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास बिल्डर देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी शहा यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या असून त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. यात शहा गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन परिसरातील प्रभात रोडवरील गल्ली नंबर आठमध्ये शहा यांचं घर आहे. त्यांच्या घराशेजारीच हा प्रकार घडला.हल्ल्यामागील कारण समजू शकले नाही. मात्र, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहा यांचा बांधकाम आणि जागा खरेदीविक्रीचा व्यवसाय आहे. याप्रकरणी डेक्कन जिमखाना पोलिस पुढील तपास करीत आहेत. गोळीबार करणार्‍या दोन्ही दुचाकीस्वारांनी तोंडाला रुमाल बांधला होता. खंडणीच्या प्रकरणातून हा गोळाबार झाल्याचा संशय डेक्कन पोलिसांनी व्यक्त केला आहे.
...Read More

V. S. News
घाणीच्या साम्राज्यावर तोडगा काढुन रोगराई थांबविण्या यावि ..... युवराज भगवान दाखले.

व्हीएस न्यूज - प्रभाग क्रमांक १९ भाटनगर-बौधनगरमध्ये गिरजुबाबा मंदीर व ९नंबर बिल्डिंग व १०नंबर बिल्डिंगच्या मध्ये तसेच जाधव बंगल्या शेजारी खुप प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आसल्याने तेथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या ठिकाणी खुप प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आसल्याने मंच्छरचे प्रमाण देखील वाढले आहे.
घाणीच्या साम्राज्यावर तोडगा काढुन रोगराई थांबविण्यात यावी व या गोष्टींची गांभीयाॕने दखल घेऊन स्वच्छतेचे तात्काळ आदेश द्यावे अशी नम्र विनंती श्री युवराज भगवान दाखले.(शहर अध्यक्ष -शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा) यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदना द्वारे केली .
...Read More

V. S. News
सलमान आला अन्‌ नागरिकांचे हाल करून गेला….

व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चित्रपट सृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री येणे काही नवीन नाही. आपल्या कार्यक्रमानुसार ते येतात आणि जातात देखील. मात्र, सिनेसृष्टीमधील आघाडीचा अभिनेता सलमान खान पिंपरी-चिंचवड शहरात आला, अन्‌ नागरिकांचे हाल करून गेला. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. निमीत्त होते ते पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने सुरु होणाऱ्या पी.एन.गाडगीळ या सोने विक्रीच्या नव्या दालनाचे.

पिंपरी – चिंचवड परिसरात पी.एन.जी च्या नव्या दालनाच्या शुभारंभासाठी सलमान खान येणार म्हणून संपूर्ण दिवसभर शहरात जोरदार चर्चा सुरु होती. तशी बातमी देखील शहरभर फिरत होती. मात्र, सायंकाळी ५ वाजण्याचा कार्यक्रम असताना देखील दुपारी १ वाजल्यापासून मोरवाडी चौकातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवरून दैनंदिन ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुरवरील पल्ल्यांच्या मार्गांनी तसेच गल्ली बोळातून मार्ग काढावे लागले. याचा परिणाम म्हणजे ज्या रस्त्यांवर रोजची शांतता पाहावयास मिळायची, त्याठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण झाली.

इतके नव्हे तर, सलमान खान येणार म्हणून नागरिकांनी वेळेच्या आधी येवून कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. यामुळे त्याठिकाणाहून जाणाऱ्या वाहन धारकांमध्ये वाद निर्माण झाला होता. सलमान खान येणार म्हणून परिसरातील रस्ते बंद केले. त्यामुळे लांबून वळसा घालून नागरिकांना जावे लागले. सलमान खानला बघण्यासाठी नागरिकांची झालेली झुंबड, त्यात काही नागरिक बाजूला असलेल्या पुलावरून खाली पडले व जखमी झाले, पुलाचे कठडे हि तुटले ,काही नागरिक झाडावरून खाली पडले त्या वेळी झालेल्या गर्दीत नागरिक जखमी झाले याला जबाबदार पि.एन.जी राहणार का ?

तसेच, या परिसरातील निदान केंद्र आणि हॉस्पिटलकडे जाणारे रस्ते बंद केल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. सर्व रस्ते बंद केले असल्याने रुग्ण दवाखान्यात पोहचू शकले नाहीत, याला जबाबदार कोण ? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यावेळी निदान केंद्र आणि हॉस्पिटल जवळ स्पीकर लावण्यात आले. मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले, रुग्णांना झालेल्या या त्रासाला जबाबदार कोण ? हे सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.



...Read More

V. S. News
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांना अभिवादन

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते औदुंबर बागडे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले, आकाश चव्हाण, भरत गायकवाड, जोपा पवार, सुखदेव जाधव, रामदास कटके आदी उपस्थित होते.

दरम्यान, पुनावळे येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसेविका रेखा दर्शले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

...Read More

V. S. News
शहरात भीक मागणाऱ्यांचे मोठे रॅकेट 

व्हीएस न्यूज - काळेवाडी सिग्नल जवळ मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एक महिला ही तरुणाला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत असल्याचे स्माईल प्लस संस्थेचे योगेश मालखरे यांनी पाहिले. त्यांनी संशय येताच तरुणाकडे धाव घेतली असता संबंधित महिला पळून गेली. पिडीत तरुणाने त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुप सिंग (वय अंदाजे 30, रा. जॉनपूर,उत्तरप्रदेश) या पीडित तरुणाला दुणुकाबाई युवराज काळे (वय 70, रा. अहमदनगर) हिने केवळ हजार रुपयांना विकत घेतले होते. त्याला दिवसाला दीड हजार रुपयांचे टार्गेट देखील या बाईंनी दिले होते. ते पूर्ण झाले नाही तर त्याला रात्री उपाशी ठेवणे, सिगारेटचे चटके देणे असे अत्याचार केले जात. दुणुकाबाई ही अनुपला दोरी बांधून ओढत नेत असून त्याला भीक मागायला लावत होती. यावेळी मालखरे यांनी अनुपला विचारणा केली असता दुणुकाबाई हिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अनुपही मला वाचवा असे ओरडू लागला. तिला पकडून विचारणा केली असता तिने अनुपला चक्क एक हजार रुपये देऊन भाड्याने आणल्याचे सांगितले. त्यानंतर मालखरे यांनी दोघांना वाकड पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी अनुपचा जबाब नोंदवून महिलेवर मुंबई भिक्षा प्रतिबंधक नियम कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची म्हणजे दुणुकाबाई हिचा पेहराव व अवतार भिक्षुक महिलेचा होता. मात्र तिची झडती घेतली असता हजारो रुपये आणि चक्क व्होल्वो बसच्या स्लीपर कोचचे तिकीट मिळाले. इतकेच नाही तर तिने पोलिसांना एका वकिलाचे व्हिजिटिंग कार्ड देत हा आमचा वैयक्तिक वकील असून याला फोन करा असे सांगितले. या प्रकारामुळे भीक मागणाऱ्यांचे एक मोठे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

...Read More

V. S. News
जुन्या भांडणातून हिंजवडीत ट्रक जाळला 

व्हीएस न्यूज - जुन्या भांडणातून मोकळ्या मैदानात उभा केलेला ट्रक जाळण्यात आला. ही घटना गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हिंजवडीतील पॉवर हाऊस येथे घडली.
याप्रकरणी रामनारायण ज्ञानोबा पारखी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंजीर (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी माहिती दिली. पारखी आणि कुंजीर यांची यापूर्वी भांडणे झाली आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आहे. पारखी यांचा ट्रक हिंजवडी येथील पॉवर हाऊस शेजारील वीटभट्टी जवळील मोकळ्या जागेत गेल्या सहा महिन्यापासून उभा आहे. कुंजीर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरूवारी सकाळी पहाटे पाच वाजता पारखी याचा ट्रक पेटवून दिला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!