व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड
महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शैलजा मोरे व स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या
हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत
झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग
अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेविका अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप
गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार
कल्याण अधिकारी विजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते औदुंबर बागडे,
माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले,
आकाश चव्हाण, भरत गायकवाड, जोपा पवार, सुखदेव जाधव, रामदास
कटके आदी उपस्थित होते.
दरम्यान, पुनावळे
येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ
तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नगरसेविका रेखा
दर्शले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.