व्हीएस न्यूज - जुन्या भांडणातून मोकळ्या मैदानात उभा केलेला ट्रक जाळण्यात आला. ही घटना गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हिंजवडीतील पॉवर हाऊस येथे घडली.
याप्रकरणी रामनारायण ज्ञानोबा पारखी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंजीर (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी माहिती दिली. पारखी आणि कुंजीर यांची यापूर्वी भांडणे झाली आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आहे. पारखी यांचा ट्रक हिंजवडी येथील पॉवर हाऊस शेजारील वीटभट्टी जवळील मोकळ्या जागेत गेल्या सहा महिन्यापासून उभा आहे. कुंजीर यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन गुरूवारी सकाळी पहाटे पाच वाजता पारखी याचा ट्रक पेटवून दिला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.