Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
माथाडी कायद्यात बदल करु नका - इरफान सय्यद

व्हीएस न्यूज - भाजप सरकार उद्योजक धार्जिणे असून माथाडी कायद्यामध्ये उद्योजकांच्या सोयीनुसार बदल करून माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान सरकार आखत आहे. कायद्यात बदल करुन माथाडी कामगाराला देशोधडीला लावण्याचा सरकाराचा इरादा आहे. माथाडी कामगारांचे दैवत आमदार आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी बनविलेल्या कायद्याची सरकारने १७ जानेवारीला काढलेल्या अध्यादेशाद्वारे चिरफाड होत आहे. सरकार त्यांच्या व उद्योजकांच्या स्वार्थासाठी गरीब व माथाडी कामगारांच्या लाखो कुटुंबीयांना उपासमारीच्या खाईत लोटत आहे. नवीन माथाडी मंडळ अस्तित्वात आणून यावर राजकीय व माथाडी कामगारांची जाण नसलेल्या पुढा-यांना बसवून ठराविक घटकांच्या हिताचे राजकारण करण्याचा डाव असल्याचा, गंभीर आरोप महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केला आहे. प्रस्तावित अध्यादेश मागे घेण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र मजदूर संघटना पुणे जिल्ह्यातील एकही कंपनी चालू देणार नाही. त्यासाठी संघटना उग्र आंदोलन करेल. आंदोलनातून होणा-या सर्व नुकसानीला सरकारच जबाबदार असेल, असेही सय्यद म्हणाले.

पिंपरीतील, महात्मा फुले पुतळ्यासमोर महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धरणे आंदोलनात महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, मुरलीधर कदम, ज्ञानोबा मुजुमले, भिवाजी वाटेकर, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, राहुल कोलटकर, राजू तापकीर, समर्थ नाईकवडे, ओमकार माने, नागेश व्हनवटे, पांडुरंग काळोखे, संदीप मधुरे, गोरक्षनाथ दुबाले, मारुती वाळुंज, संतोष जाधव, अक्षय पवार, प्रभाकर गुरव, मारुती कौदरे, सतिश कंटाळे, सुनील सावळे, अशोक साळुंखे, हनुमंत शिंदे, शंकर मदने, गोरक्ष बांगर, बाबासाहेब पोते, संतोष माशेरे, सुभाष मुके, ज्ञानेश्वर घनवट, विजय खंडागळे, चंद्रकांत पिंगट, ज्ञानेश्वर घनवट, विलास ताठे आदी माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना सय्यद बोलत होते. तसेच मंचर, जुन्नर, ओथुर, आळेफाटा आणि नारायण गाव या बाजारपेठांचे काम बंद केले होते. तसेच आद्योगिक परिसरातील पाच हजारहून अधिक माथाडी कामगारांनी धरणे आंदोलन केले.

”माथाडी कामगारांचे दैवत आण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी कायदा बनवला, आणि संघटित कामगारांना न्याय दिला. त्यानंतर प्रत्येक वेळेच्या सरकारने त्या-त्या वेळी माथाडी कामगारांना संरक्षण देण्याचे काम केले. भाजप सरकार मात्र सत्तेचा दुरुपयोग करून हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठीच कायद्यामध्ये बदल करून लोकशाहीमधील कामगार चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा” आरोप करत इरफान सय्यद पुढे म्हणाले की, ”३६ माथाडी मंडळाचे विलिनिकरण करुन राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा सरकार घाट घालत आहे. असे महामंडळ तयार करत असताना कोणत्याही प्रकारच्या माथाडी कामगार यांच्याशी चर्चा न करता हा निर्णय घेत आहे, असे महामंडळ तयार करून सरकार मंत्री यावर अध्यक्ष करण्याच्या बाबतीत घाट घालत आहे. जेणेकरून प्रशासनावर दबाव ठेवण्यात येईल, अशा प्रकारचे कारस्थान सरकार आखत आहे. माथाडी कामगाराला मोडीत काढायचा हा प्रयत्न आहे”.

”माथाडी कायद्यामध्ये उद्योजकांच्या सोयीनुसार बदल करून माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान भाजप सरकार आखत आहे. नियोजित कायद्यानुसार आण्णासाहेब पाटील यांनी असंघटीत माथाडी कामगारांच्या न्याय व हक्कासाठी आदर्श माथाडी कायदा बनवन्यासाठी प्रयत्न केले. त्या कायद्याची चिरफाड या सरकारने १७ जानेवारीला काढलेल्या अध्यादेशाव्दारे केली आहे. हे सरकार त्यांच्या व उद्योजकांच्या स्वार्थासाठी गरीब व कष्टकरी माथाडी कामगार व त्यांच्या लाखो कुटूंबांना उपासमारीच्या खाईत लोटत आहे. यासाठी नवीन माथाडी मंडळ अस्तित्वात आणून यावर राजकीय व माथाडी कामगारांच्या समस्येची जाण नसलेल्या पुढा-यांना बसवून ठराविक घटकांच्या फायद्यापोटी असे करणे अत्यंत चुकीचे आहे”, असेही सय्यद म्हणाले.

...Read More

V. S. News
जिल्हाधिकारीपदावरून सौरभ राव यांची हकालपट्टी करा - अमोल थोरात

व्हीएस न्यूज - सौरभ राव यांची त्वरित बदली करून पुण्याच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमोल थोरात यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सौरभ राव फेब्रुवारी २०१४ पासून अर्थात तब्बल चार वर्षांपासून कार्यरत आहेत. शासकीय सेवकांच्या बदल्यांसदर्भात नियमावली, मार्गदर्शक तत्वे आणि संकेतावली अस्तित्वात आहे. त्यानुसार शासकीय सेवक एकाच पदावर तीन वर्षे आणि एकाच जिल्ह्यात पाच वर्षे सेवा करू शकतात. विशेष बाब म्हणून या कालावधीत बदल करता येतो. त्यानुसार सौरभ राव पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी तब्बल चार वर्षांपासून सेवेत आहेत; मात्र सौरभ राव यांच्याकडून कामात हलगर्जी होत असून, त्यांचा बेजबाबदारपणा वाढला आहे.

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील दंगल केवळ प्रशासकीय बेजबाबदारपणाची परिणीती आहे. ‘विजयदिन’ आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम आदींबाबतचे महत्त्व, उपाययोजना, घ्यावयाची काळजी आणि नियोजन करण्याकडे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. विजयदिनी कोरेगाव भीमा येथे तब्बल सात ते आठ लाख अनुयायी येणार असल्याचा अहवाल संबंधित विभागांकडून देण्यात आल्यानंतरही सक्षम नियोजन आणि ठोस उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी राव यांनी उदासीनता दाखविली. केवळ काही हजार अनुयायी कोरेगाव भीमा येथे हजेरी लावतील, असे गृहीत धरून जिल्हाधिकारी राव यांनी विजयदिनाच्या नियोजनबाबत कामचलाऊपणा केला. दंगल उसळल्यानंतरही जिल्हाधिकारी राव यांनी तत्परता न दाखवता निर्णय घेण्यात कुचराई केली. परिणामी प्रकरण अधिक चिघळले आणि जिल्हाधिकारी राव यांच्या अकार्यक्षमतेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्वरित निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात जिल्हाधिकारी राव कमी पडले. त्यामुळे समाजकंटकांना संधी मिळाली आणि सरकारच्या विरोधकांनाही आयते कोलीत मिळाले. यातून पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि सरकार म्हणून भाजपची प्रतिमा मलीन झाली.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अकार्यक्षमतेचा फटका महाराष्ट्राला आणि सरकारला सहन करावा लागला. स्थानिक पातळीपासून राज्य आणि केंद्रातही भाजप सरकारकडून पारदर्शक आणि विकासाचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. सर्वसामान्यांकडून भाजपच्या कार्यशैलीला पसंती मिळत आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार भाजप सरकार कार्यरत आहे; मात्र काही जण याला बाधा निर्माण करीत आहेत. अशांपैकी जिल्हाधिकारी सौरभ राव एक असल्याचे ‘कोरेगाव भीमा’ प्रकरणावरून दिसून आले आहे. त्यामुळे सौरभ राव यांची त्वरित बदली करून जिल्हाधिकारी पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या निवेदनातून केली आहे.

...Read More

V. S. News
शहीद हेमू कलानी यांचा पुतळा लवकरच उभारणार – संदिप वाघेरे

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील हेमू कलानी उद्यानामध्ये शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा लवकरच सुशोभिकरण करुन बसविण्यात येणार असल्याची माहिती भाजप नगरसेवक संदिप वाघेरे यांनी दिली. याबाबत वाघेरे यांनी पाठपुरावा सुरू केलायं.

याबाबत संदिप वाघेरे म्हणाले की, २००६ पासून या उद्यानात शहीद हेमू कलानी यांचा अर्ध पुतळा बसविण्याचे काम रखडले होते. मुंबई येथील कलासंचनालय यांचे मान्यता अभावी हा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. या पुतळ्याचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी सिंधी बांधवांकडून वारंवार केली होती. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करुन कलासंचनालय मुंबई यांची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार हेमू कलानी यांच्या पुतळ्यास कलासंचनालय मुंबई यांनी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार डिझाईन तयार करण्यात आले आहे. लवकरच मुख्य वास्तुशास्ञ मुंबई यांची मान्यता मिळवून कामास सुरुवात केली जाणार असल्याचे वाघेरे म्हणाले.

...Read More

V. S. News
स्किल डेव्हल्पमेंटला उद्योगजगताकडून मिळणारा प्रतिसाद आशादायी - सुनील चतुर्वेदी

टाटा मोटर्स व यशस्वीसंस्थेतर्फे विद्यार्थ्याना ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेन्ट कौन्सिलचे प्रशिक्षण संपन्न.

व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्किल इंडिया मिशनला यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांना उद्योगजगताकडून मिळणारा अनुकूल प्रतिसाद हा निश्चितच आशादायी आहे, असे मत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. पिंपरी येथील टाटा मोटर्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र प्रदान करताना बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, टाटा मोटर्स सारखे उद्योगसमूह स्वतःच्या विकासासोबतच सातत्याने देशातील जनतेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीही महत्वपूर्ण योगदान देतात, म्हणूनच मेक इन इंडिया व स्किल इंडिया सारख्या महत्वाकांक्षी अभियानातही टाटा मोटर्सने घेतलेला पुढाकार हा वाखाणण्याजोगा आहे. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत 'ऑटो कंपोनंट असेम्ब्ली फिटर' या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या १६६ विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये ९४ मुले व ७२ मुलींचा समावेश आहे.

यावेळी बोलताना आपल्या मनोगतात टाटा मोटर्सचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर व कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर म्हणाले की, नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन अर्थात नीम योजनेअंतर्गत टाटा मोटर्स मध्ये जे विद्यार्थी कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत त्यांची कामाप्रती असलेली शिस्त, काम करण्याची शैली ही वेगाने प्रगतिपथावर आहे. दहावी, बारावी चे शिक्षण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे तांत्रिक कौशल्य नसतानाही ऑन द जॉब ट्रेनिंग पद्धतीने ही मुले- मुली आज कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे वाहन उत्पादन क्षेत्रातील अद्ययावत तांत्रिक कौशल्यामध्ये खूप कमी वेळात निपुण होत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे असेही बोरवणकर यांनी सांगितले. यावेळी आपल्या मनोगतात टाटा मोटर्स कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी गजेंद्र चंडेल यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना सांगितले की, नीम सारख्या योजनांच्या अंमलबजावणीमुळे युवकांना प्रत्यक्ष कंपनीत चालणारी कामकाज पद्धती जवळून पाहता येते,हाताळता येते व शिवाय त्या विषयाचे तांत्रिक ज्ञानही प्रशिक्षकांमार्फत शिकता येते, ही अतिशय परिणामकारक बाब आहे. विशेष बाब म्हणजे या प्रशिक्षणामध्ये सहभागी करण्यासाठी टाटा मोटर्सतर्फे प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवक युवतींना प्राधान्य दिले जाते असेही चंडेल यांनी सांगितले. तसेच या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सर्व प्रशिक्षकांबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.अशाप्रकारचे प्रशिक्षण गुजरात राज्यातील सानंद येथील टाटा कंपनीच्या प्रकल्पामध्येही सुरु असून, मार्च २०१८ पर्यंत आणखी ५०० प्रशिक्षणार्थ्याचें प्रशिक्षण पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगीं कल्याणी पुरोहित व अनंत मराठे या विद्यार्थ्यानीही आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व्ही. सुरेश, सीव्हीबीयु क्वालिटी हेड राजेश खत्री, सीव्हीबीयु प्लांट हेड आलोक सिंह, पीव्हीबीयू प्लांट हेड जयदीप देसाई,टाटा मोटर्सचे कौशल्य विकास विभाग प्रमुख श्रीनिवासन, कंपनीचे टॅलेंट एक्विझिशन हेड सुधांशु मिश्रा, पीव्हीबीयू वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका अनुराधा दास ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे अधिकारी संजीव तिवारी, अलका पांडे, 'यशस्वी' चे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संचालक राजेश नागरे यांच्यासह विविध पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक टाटा मोटर्सचे वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक व्ही. सुरेश यांनी, सूत्रसंचालन मनुष्यबळ व्यवस्थापक नेहा शिशुपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन पीव्हीबीयूचे कौशल्य विकास प्रशिक्षण विभागाचे उपमहाव्यवस्थापक सुहास कुलकर्णी यांनी केले.

...Read More

V. S. News
स्वच्छ अभियानास तळेगावकर सज्ज

व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 या उपक्रमाअंतर्गत चालू असलेल्या अभियानास नागरिक आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून उस्फुर्त प्रतिसात मिळत असून राज्य शासनाने आयोजित केलेल्या प्रभागनिहाय स्पर्धेसाठी नगरसेवक आणि नगरपरिषद आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
राज्य शासनाच्या अभियानानुसार स्वच्छ तळेगाव दाभाडे सुंदर तळेगाव दाभाडे ही संकल्पना युध्दपातळीवर नगरपरिषदेकडून राबविण्यात येत आहे. या संकल्पनेसाठी तळेगावकर नागरीकांना जनजागृतीच्या माध्यमातून सहभागी करुन घेत आहे. घरोघरी यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरीकांचे प्रबोधन केले जात आहे.
नगरपरिषदेकडून यासाठी जाहिरात फलक, आरोग्य पत्रके, माहितीपत्रके, स्टिकर, इलेक्टानिक डिस्प्ले, वृत्तपत्र माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये यातील सर्व विद्यार्थी, तसेच जेष्ठ नागरीक संघ, लयन्स, रोटरी क्लब बरोबरच सामाजिक संस्था, या मधून स्वच्छता विषयक सहभाग आणि जागृती वाढविण्यात येत आहे.
शहरातील वाणिज्य क्षेत्रातील हॉटेल्स व्यावसायिक, मटन, चिकन व्यावसायिक यांनाही या अभियानात सहभागी करुन घेतले जात आहे. प्रत्येक प्रभाग निहाय स्वच्छतेची स्पर्धेचे आयोजिन करण्यात आल्याने प्रभागा प्रभागात चुरस निर्माण झाली आहे. लहानापासून थोरांपर्यंत या अभियानात सहभाग वाढला आहे.
नगरपरिषदेच्या अध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, आरोग्य सभापती अरुण भेगडे, सर्व नगरसेवक आणि प्रशासन हे अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
अलंकापुरीतील इंद्रायणी नदी पात्रात मासेमारीला बंदी

मासेमारीचे साहित्य जप्त करणार; जलचरांचे अस्तित्वासाठी निर्णय
व्हीएस न्यूज - अलंकापुरीतील इंद्रायणी नदी पात्रात जलचरांचे अस्तित्वासाठी मासेमारी बंदीचा निर्णय पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यापुढील काळात नदी पात्रात मासेमारी करताना आढळल्यास साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिला आहे.
याबाबतची कारवाई पाणी पुरवठा विभागावाचे माध्यमातून करण्यात येणार आहे. मासेमारी रोखण्याचे उपाय योजना करण्याच्या सूचना तसेच पाणी पुरवठा केंद्रासह पाणी साठवण बंधाऱ्याचे दोन्ही किनारे स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच पाणी पुरवठा बंधारा, चौंडी घाट परिसराचे सुशोभीकरण, स्वच्छता, किनारा मार्ग साफसफाईचे काम आळंदी नगरपरिषद, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाउन व रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी सांगितले.
इंद्रायणी नदी प्रदूषण व जलपर्णी मुक्त करण्याचे काम प्रभावी पणे हाती घेण्यात आले आहे. यासाठी नागरिक, लोकसहभाग यासाठी आवाहन करण्यात आले आहे. इंद्रायणी नदी तील स्वच्छता व जलपर्णी मुक्त नद्यांचे प्रवाह कायम सुरु रहावेत या मोहिमेत जिल्ह्यातील सेवाभावी संस्थानी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एकाचवेळी सर्वत्र जलपर्णी हटविण्याची मोहीम सुरु होण्याची गरज असल्याने पिंपरी महापालिकेने तसेच आळंदी लगतच्या ग्रामपंचायतींनी देखील आपापल्या नदी परिसरातील जलपर्णी हटविण्याचे कामकाज सुरु करण्यासाठी संपर्क मोहीम सुरु करण्यात आल्याचे नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष सागर भोसले यांचे मार्गदर्शनाखाली केळगाव, चिंबळी, मोई, निघोजे, कुरुळी आदी ठिकाणी यासाठी संपर्क मोहीम राबविण्यात आली जलपर्णी रोखण्यास वायर रोप, ड्रम बांधण्याचे काम सुरु
इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्त करण्याचे कामाचा भाग म्हणून वायर रोप, ड्रम बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान भाविकांना आळंदीत इंद्रायणी नदी पात्रात पाणी उपलब्ध व्हावे, तसेच इंद्रायणी स्वच्छ राहावी यासाठी मुख्य प्रदर्शनी भागात नदी पात्र जलपर्णी मुक्त करण्यात आले आहे. यासाठी इंद्रायणी नदीवर ठिकठिकाणी जलपर्णी अडविण्यात आली असून नदी पात्राबाहेर जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे.
...Read More

V. S. News
जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार व्हावेत

व्हीएस न्यूज - जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी महापालिका विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धा भरवत असते. तसेच महापालिका विकासाबरोबरच खेळाला नेहमी प्राधान्य देत असते. असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित माजी महापौर विलास विठोबा लांडे महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टींग स्पर्धा (महिला व पुरुष) 2017-18 चे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. प्रभाग क्र 18 मोरया गोसावी क्रिडा संकुल, चिंचवडगाव पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेंडगे, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रिडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, अशोक पटेकर, जयश्री भोज, अनिता पालवे, महाराष्ट्र वेटलिफ्टींग संघटना सचिव प्रमोद चोळकर, पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनचे सचिव सुधिर माळसकर, वेटलिफ्टींगचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल दुबे, सजना पांडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे, विजय पाटील, अश्विनी पाटील, तुकाराम गायकवाड, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले, खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच जागतिक पातळीचे खेळाडू तयार होण्यासाठी महापालिका सातत्याने असे उपक्रम राबवित असते. खेळाडूंनी मोठ्यासंख्येने अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन महापालिकेचा लौकिक वाढवावा. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
आयोजित माजी महापौर विलास विठोबा लांडे महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टींग स्पर्धेत सुमारे 170 खेळाडू सहभागी झाले आहेत. विजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिसे व ट्रॅफी, मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक क्रिडा पर्यवेक्षक राजु कोतवाल यांनी केले. सुत्रसंचालन क्रिडा पर्यवेक्षक अशोक पटेकर यांनी तर आभार क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी मानले.
...Read More

V. S. News
मतभेद असणाऱ्यांना जगूच द्यायचे नाही, अशी आजची परिस्थिती

व्हीएस न्यूज -आज समाजात प्रेम कमी आणि हिंसा मोठ्या प्रमाणात आहे. मतभेद असणाऱ्यांना जगूच द्यायचे नाही, अशा परिस्थितीमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. फुले-शाहू-आंबेडकर, महात्मा गांधी यांचे प्रेम, बंधुता, अहिंसा, शांतता, आर्थिक-सामाजिक समतेवर आधारित विचार आचरणात आणले, तरच समाजात सलोखा निर्माण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केले.
इंद्रायणी महाविद्यालयातर्फे आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना सामाजिक सलोखा आणि आजचे समाज वास्तव याविषयावर निखील वागळे बोलत होते. महात्मा गांधीजीच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, रामदास काकडे, केशव वाडेकर, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राजश्री म्हस्के, प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, व्याख्यानमालेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. एस.के. मलघे आदी उपस्थित होते.
निखील वागळे म्हणाले, सामाजिक सलोख्याची आस मनात असावी लागते. ती अचानक निर्माण होत नाही. आज जातीव्यवस्था बळकट होत चालल्यामुळे समाजात अस्थिरता येऊ लागली आहे. धार्मिक कारणावरून दंगली घडण्याचा शाप 1872 पासून महाराष्ट्राला आहे, तो अद्याप आहे. दंगलीची कारणे माहीत असूनही, अद्याप दंगली होतच आहेत. स्वातंत्र्यानंतर नथुराम गोडसे या माथेफिरुने महात्मा गांधी यांचा खून केला. स्वातंत्र्यानंतर सामाजिक सलोखा बिघडवणारी ही पहिली घटना होती. गांधीजींमुळे फाळणी झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण गांधीजींचा फाळणीला विरोधच होता. नथुराम ब्राह्मण होता, म्हणून गांधीजींच्या खूनानंतर ब्राह्मणांना लक्ष्य करणेही चुकीचे होते. नथुराम ब्राह्मण नाही, तर माणूसच नव्हता. तो धर्मांध अतिरेकी होता. त्यामुळे त्याने केलेल्या कृतीचे समर्थन करणे चुकीचे आहे. महात्मा गांधीजी स्वत:ला सनातनी हिंदू मानायचे. सनातन हिंदू धर्म ऋग्वेदावर आधारित असून, त्याचा पाया सर्वधर्म समानतेचा आहे. आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक विकास ही सनातनची धर्मकल्पना आहे.
वागळे यांनी पुढे सांगितले, आजच्या तरुणाईने फुले-शाहू-आंबेडकर-महात्मा गांधींचे विचार आत्मसात केले पाहिजेत. त्यांच्याविषयी वाचले पाहिजे. शिवाजी महाराज अभ्यासले पाहिजेत. शिवाजी महाराजांसारखा धर्मनिरपेक्ष राजा नाही. आज शेतकरी मंत्रालयाच्या दारात मरताहेत. तरी सरकारला काही देणे-घेणे नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकरी, गरीब, व्यापारी सर्व मिळून मिसळून राहायचे. ते सर्व जाती-धर्माचे राज्य होते. आज निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाती-धर्माचे अवडंबर माजवले जात आहे. धर्मजाती व्यवस्था, आर्थिक विषमता, लिंगभेद विसरून समता निर्माण झाल्याशिवाय सामाजिक सलोखा शक्य नाही, असेही वागळे यांनी सांगितले.
डॉ. एस. के. मलघे यांनी परिचय वाचन केले. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी, तर आभार प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी मानले.
...Read More

V. S. News
केस व त्वचा विकार विशेष मोफत तपासणी तसेच औषधोपचार शिबीर

व्हीएस न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पवना इंडस्ट्रीज जवळ, पिंपरी येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता संगणक व अत्याधुनिक मशीन द्वारे केसांची व त्वचा विकार विशेष मोफत तपासणी, औषधोपचार तसेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये केसांची वाढ न होणे, केस गळतीच्या समस्या, चाई येणे, टकल पडणे, इत्यादी तसेच तारुण्यपिटिका, खरूज, नायटा, डाग, सोरियासिस, इसब व विविध त्वचेच्या विकारांची तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे या एक दिवसीय शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुर्वेद रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
पीएमपीएमएलमध्ये प्रवाशाच्या खिशातील पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

व्हीएस न्यूज - पीएमपीएमएलमध्ये गर्दी फायदा घेत एका प्रवाशाच्या खिशातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी डांगे चौक ते शिवाजीनगर या प्रवासादरम्यान घडली. हर्षल साखरे (वय-35, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील भारत साखरे हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता डांगे चौकातून चिंचवडगाव ते कात्रज या पीएमपीएमएलमध्ये बसले. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने भारत साखरे यांच्या खिशातील रोख 18 हजार 850 रूपये व सोन्याचे दागिने असा दोन लाख 73 हजार 850 रूपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
खासदार रेखा कडून कासारवाडीतील शाळेला ३ कोटींचा निधी

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्‍या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा यांच्या खासदार निधीतून ३ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे. या निधीसाठी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला आहे.

कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४२० येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी १३ कोटी ७१ लाख ३२ हजार १९७ रुपये खर्च असून, त्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दोन वर्षांत इमारत बांधली जाणार आहे. एकूण भूखंडाचे क्षेत्र ८ हजार ९११.३० चौरस मीटर आहे. सद्यःस्थितीत शाळेचे क्षेत्र तीन हजार ७८९.२१ चौरस मीटर आहे. दोन हजार ८६१.८१ चौरस मीटरमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे.

इमारतीसाठी निधी मागण्यासाठी पत्र पाठविण्याची मागणी नगरसेवक शाम लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ८ नोव्हेंबर २०१७ ला केली होती. त्याला खासदार रेखा यांनी प्रतिसाद देत जानेवारी २०१८ ला जिल्हा नियोजन समितीकडे पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तीन कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नुकताच वर्ग झाला आहे. सदर निधी महापालिकेने घ्यावा, असे पत्र जिल्हाधिकार्‍यांनी २४ जानेवारीला आयुक्त हर्डीकर यांना पाठविले आहे, अशी माहिती नगरसेवक शाम लांडे यांनी दिली.

...Read More

V. S. News
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार देशाच्या स्वातंञ्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी यावेळी २ मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!