जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार व्हावेत
पिपंरी
2018-01-31
व्हीएस न्यूज - जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी महापालिका विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धा भरवत असते. तसेच महापालिका विकासाबरोबरच खेळाला नेहमी प्राधान्य देत असते. असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित माजी महापौर विलास विठोबा लांडे महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टींग स्पर्धा (महिला व पुरुष) 2017-18 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. प्रभाग क्र 18 मोरया गोसावी क्रिडा संकुल, चिंचवडगाव पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेंडगे, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रिडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, अशोक पटेकर, जयश्री भोज, अनिता पालवे, महाराष्ट्र वेटलिफ्टींग संघटना सचिव प्रमोद चोळकर, पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनचे सचिव सुधिर माळसकर, वेटलिफ्टींगचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल दुबे, सजना पांडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे, विजय पाटील, अश्विनी पाटील, तुकाराम गायकवाड, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी उपस्थित होते. महापौर नितीन काळजे म्हणाले, खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच जागतिक पातळीचे खेळाडू तयार होण्यासाठी महापालिका सातत्याने असे उपक्रम राबवित असते. खेळाडूंनी मोठ्यासंख्येने अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन महापालिकेचा लौकिक वाढवावा. असे आवाहन यावेळी त्यांनी केले. आयोजित माजी महापौर विलास विठोबा लांडे महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टींग स्पर्धेत सुमारे 170 खेळाडू सहभागी झाले आहेत. विजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिसे व ट्रॅफी, मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत. प्रास्ताविक क्रिडा पर्यवेक्षक राजु कोतवाल यांनी केले. सुत्रसंचालन क्रिडा पर्यवेक्षक अशोक पटेकर यांनी तर आभार क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी मानले.