पीएमपीएमएलमध्ये प्रवाशाच्या खिशातील पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास
वाकड
2018-01-30
व्हीएस न्यूज - पीएमपीएमएलमध्ये गर्दी फायदा घेत एका प्रवाशाच्या खिशातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी डांगे चौक ते शिवाजीनगर या प्रवासादरम्यान घडली. हर्षल साखरे (वय-35, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील भारत साखरे हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता डांगे चौकातून चिंचवडगाव ते कात्रज या पीएमपीएमएलमध्ये बसले. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने भारत साखरे यांच्या खिशातील रोख 18 हजार 850 रूपये व सोन्याचे दागिने असा दोन लाख 73 हजार 850 रूपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.