Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
"कवींना अक्षरांचा मंत्र बहाल "

व्हीएस न्यूज - "परमेश्वराने कवींना अक्षरांचा मंत्र बहाल केलेला असतो म्हणून एकेक अक्षर एकत्र होऊन तयार होणारे कवींचे शब्द हे रसिकांना कधी हसवतात तर कधी रडवतात" असे उद्गार ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांनी निगडी येथे काढले.
निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात कवी बी.एस.बनसोडे लिखित, साहित्य सुधा आणि सूरज पब्लिकेशन आयोजित 'तुझ्याविना' या गझलसंग्रहाच्या आणि 'जीवनगाणे' या काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ए.के.शेख बोलत होते. प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते 'तुझ्याविना' या गझलसंग्रहाचे; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते 'जीवनगाणे' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत हुईलगोळकर, कवी बी.एस.बनसोडे आदी उपस्थित होते.
गझलकार ए.के.शेख म्हणाले की, "आतड्याला पीळ पडणारे काव्य म्हणजे गझल होय; आणि अशा गझलसदृश्य रचना बी.एस.बनसोडे यांच्या 'तुझ्याविना' या गझलसंग्रहात आढळतात.
डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले की, जीवन जगत असतानाअंत:प्रेरणेने त्यांना जे गाणे स्फुरले त्यातून 'जीवनगाणे' हा काव्यसंग्रह अस्तित्वात आला असावा.
प्रा.तुकाराम पाटील यांनी, "स्वतः स्थिर राहून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी जगण्यातला अस्सल अनुभव लागतो; आणि तो कवी बी.एस.बनसोडे यांच्यापाशी आहे" असे मत मांडले.
प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संजय जगताप यांनी आभार मानले. प्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले, त्यात सुमारे वीस कवींनी सहभाग घेतला. रघुनाथ पाटील, दीपेश सुराणा, अशोक कोठारी, डॉ.सुधीर काटे, दीपक अमोलिक, आय.के. शेख, दत्तू ठोकळे, राजेंद्र सोनवणे, आदींच्या कविता उल्लेखनीय होत्या. नंदीन सरीन यांनी गझलगायन केले. दिनेश भोसले यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. आशा बनसोडे, सूरज बनसोडे, माधुरी विधाटे, दादा इंचलकर, राजेश जैन यांनी संयोजनात सहकार्य केले.
...Read More

V. S. News
लोकलची धडक बसून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

व्हीएस न्यूज - पुण्यावरुण लोणावळे कडे जाणाऱ्या लोकलची धडक लागुण एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाला. ही घटना रविवारी सकाळी रेंजहिल्स येथिल रेल्वे बोगदा परिसरात घडली असल्याची माहिती खडकी रेल्वे पोलिसांनी दिली. लोकल अपघातात मृत्यु पावलेल्या या अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्ष असुन उंची पाच फुट चार इंच आहे. रंगाने सावळा अंगाने मध्यम नाक सरळ चेहरा उभट असलेल्या या व्यक्तिने अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट व राखाडी रंगाची पॅंन्ट परिधाण केलेली आहे.
अशा वर्णणाच्या व्यक्ती बाबत अधिक माहिती असल्यास नागरिकांनी खडकी रेल्वे पोलिसांसी संपर्क साधावा असे आवाहण पोलिसांनी केले आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस हवलदार मिलिंद लोणारे करित आहेत.
...Read More

V. S. News
लायन्स पॉईटच्या दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात शिवदुर्गला यश

व्हीएस न्यूज - लोणावळ्यातील लायन्स पॉईटच्या दरीत पडलेल्या पुण्यातील सचिन लल्लन उपाध्याय (वय 21) या युवकाला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना यश मिळाले. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती.
सचिन उपाध्याय हा त्यांच्या काही मित्रांच्या सोबत रविवारी लोणावळ्यात फिरायला आला होता. दुपारच्या सुमारास ते सर्व मित्र लायन्स पॉईट येथिल दरीला लावण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगच्या पुढे असलेल्या अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मस्ती करत असताना सचिनचा पाय घसरला व तो दरीत पडला. सुदैवाने 60 फुट अंतरावर एका झाडाच्या खोडाला तो आडकला. अंगाला मुका मार लागला होता व दरीच्या वर येण्याकरिता मार्ग नसल्याने तो स्वतःला वाचविण्याकरिता याचना करत होता. त्याचे मित्र देखिल प्रयत्न करत होते. या दरम्यान शिवदुर्गचे वैभव शेलार यांना लायन्स पॉईटच्या दरीत एक युवक पडला असल्याचा फोन आला व लोणावळ्यातील शिवदुर्गची टिम तातडीने रेस्कूचे सर्व साहित्य गोळा करत लायन्स पॉईटकडे रवाना झाली.
घटनास्थळाचा अंदाज घेत अजय शेलार व प्रविण देशमुख हे दरीत उतरले, हार्निस व दोरच्या सहाय्याने त्यांनी सचिन उपाध्याय याला सुखरुपपणे दरीतून बाहेर काढले. शिवदुर्ग मित्रचे प्रविण देशमुख, वैभव शेलार, अभिजीत बोरकर, समीर जोशी, पुनिकेत गायकवाड, तुषार केंडे, राजेंद्र कडु, अजय राऊत, प्राजक्ता बनसोड, वैष्णवी भांगरे, सुनिल गायकवाड हे या मोहिमेत सहभागी झाले होते. लोणावळा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी ठोंबरे हे देखिल घटनास्थळी दाखल झाले होते.
...Read More

V. S. News
एसबी पाटील व्यवस्थापन संस्थेत युवोत्सव 18 उत्साहात साजरा.

व्हीएस न्यूज - पिपंरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एसबी पाटील इंन्स्टिट्युट मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) मध्ये युवोत्सव 2018 अंतर्गत घेण्यात आलेल्या अंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत पीसीसीओई (अ) निगडी व बास्केटबॉल स्पर्धेत आयसीसीएस ताथवडे संघाने विजय मिळविला.

या स्पर्धेत पुण्या जिल्ह्यातून फुटबॉलच्या 32 व बास्केटबॉलच्या 18 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌घाटन प्रसिध्द गिर्यारोहक अर्पणा प्रभूदेसाई व पीसीईटीचे संचालक भाईजान काझी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, संशोधन विभाग प्रमुख डॉ. हंसराज थोरात उपस्थित होते.

पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निगडीतील एसबीपीआयएम मध्ये 2015 पासून पासून आंतर महाविद्यालयीन फुटबॉल व बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 2 फेब्रुवारी) या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ भाईजान काझी व डॉ. डॅनियल पेनकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

फुटबॉल अंतिम निकाल प्रथम क्रमांक - पीसीसीओई(अ), निगडी, व्दितीय क्रमांक - पीसीसीओई (ब), निगडी, तॄतीय क्रमांक आयसीसीएस, ताथवडे ; बास्केटबॉल अंतिम निकाल प्रथम क्रमांक - आयसीसीएस, ताथवडे, व्दितीय क्रमांक - आरएससीओई, ताथवडे.

...Read More

V. S. News
क्लस्टरमध्ये मागासवर्गीय उद्योजकांना समाविष्ट करावे - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया प्रकल्पांअंतर्गत देशभरात विकसित करण्यात आलेल्या ‘क्लस्टर’ मध्ये मागासवर्गिय नव उद्योजकांना व प्रशिक्षणार्थींना आगामी काळात समाविष्ट करुन घेतले जावे असे प्रतिपादन एमएसएमईचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) गिरीराज सिंह यांनी चिंचवड (पुणे) येथे केले. चिंचवड येथील पुणे इंजिनिअरिंग क्‍लस्टरच्या वतीने ‘पुणे व्हेंडेंक्स 2018’अंतर्गत प्रदर्शनाचे उद्‌घाटन गिरीराज सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, पुणे इंजिनिअरिंग क्‍लस्टरचे संचालक, अध्यक्ष सागर शिंदे, विजय देशमुख, राजेश चव्हाण, संतोष तिडके, एमएसएमईचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष योगेश बाबर आदी उपस्थित होते.

गिरीराज सिंह म्हणाले की, मागील तीन वर्षात उद्योग व्यवसायास अनुकूल धोरण राबवून त्याची अंमलबजावणी केल्यामुळे भारतात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. यातून प्रत्यक्ष सत्तर लाख रोजगार निर्मिती झाली आहे. एमएसएमईतून एकूण रोजगाराच्या 80 टक्के रोजगार अप्रत्यक्ष निर्माण होतो. त्यामुळे या सरकारने एमएसएमईच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. जाती धर्माच्या राजकारणामुळे यावर प्रतिकूल परिणाम होता. उद्योगांना चालना मिळावी म्हणूनच मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबाजवणी केली. यातून देशाच्या जीडीपीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात 50 कोटी नागरीकांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. देशाच्या विकासात वाढत्या लोकसंख्येचा देखील अडसर आहे. विकासाची फळे वाढत्या लोकसंख्येमुळे गरीब जनतेला मिळत नाहीत. जे सरकार गरीबांचा विचार करते त्यांनाच सत्तेवर राहण्याचा अधिकार असल्याचेही सिंह म्हणाले. पुणे इंजिनिअरींग क्लस्टरचे काम गुणवत्तापुर्ण आहे. त्यामुळेच येथून प्रशिक्षण घेतलेल्या सर्व युवकांना रोजगार मिळाला आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत या संस्थेला पारितोषिक मिळाले हे अभिनंदणीय आहे असे सिंह म्हणाले.

पुणे इंजिनिअरींग क्लस्टरचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी सांगितले की, चिंचवड येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सरकारी अध्यादेशानुसार केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत कंपन्यांनी 20 टक्के खरेदी लघुउद्योजकांकडून करावी असे आदेश आहेत. त्यानुसार इंजिनिअरिंग क्‍लस्टरच्या माध्यमातून सुक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी उपलब्ध असणा-या व्यवसायिक संधी याविषयी मार्गदर्शन तसेच संरक्षण खाते, रेल्वे खाते, ऑईल पुरवठा करणा-या कंपन्या तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अंगीकृत इतर कंपन्यांमधून एमएसएमईच्या उद्योजकांना निविदा भरताना आवश्यक असणा-या कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत या चर्चासत्रात नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती सागर शिंदे यांनी दिली. प्रास्ताविक महाराष्ट्र राज्‍य उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते, स्वागत सागर शिंदे, सुत्रसंचालन अभय दप्तरदार आणि आभार विजय देशमुख यांनी मानले.

...Read More

V. S. News
माजी खासदार शंकरराव पाटील यांचा संकल्प विसपुतेंच्या कार्यकालात पुर्ण झाला - हर्षवर्धन पाटील

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा नावलौकिक वाढविण्यात पद्माकर विसपुते यांचे योगदान महत्वपुर्ण आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर गेली 22 वर्षं त्यांनी पीसीईटीच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यक्षमपणे अव्याहतपणे सेवा केली. पीसीईटीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांचा या संकुलात केजी टू पीएचडी शिक्षण देण्याचा संकल्प होता. हा संकल्प विसपुते यांच्या कार्यकालात पुर्ण झाला. त्यांचे मार्गदर्शन भावी काळात देखील आम्हाला दिशादर्शक ठरेल. तसेच विसपुते यांचा 101 वा वाढदिवस साजरा करण्याचा आम्हाला लाभ मिळावा. विसपुते यांचे भावी आयुष्य आरोग्य संपन्न जावो अशा शुभेच्छा माजी मंत्री व पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या.

पीसीईटीचे प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे विसपुते यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, गोरख भालेकर, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्रा. डॉ. हरीश तिवारी, प्राचार्य डॉ. डॅनिअल पेणकर, प्राचार्या डॉ. विद्या बॅकॉड, प्राचार्या मधूबाला गॅरोला, प्राचार्या अनुजा कामठे, व्ही.एम.कड,लेखाधिकारी सुभाष कानेटकर, रजिस्टार योगेश व्हि. भावसार आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
देशाच्या विकासासाठी कंपन्या- शिक्षण संस्थांनी एकत्र यावे - उद्योगमंत्री सुभाष देसाई

व्हीएस न्यूज - भारताचा औद्योगिक विकास वाढविण्यासाठी कंपन्या, उद्योजक आणि शिक्षण संस्‍थांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्‍यामुळे उद्योग व्यावसायिकांना कुशल, अनुभवी मनुष्यबळ उपलब्‍ध होईल. त्‍यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्‍ध होतील. विद्यार्थी-शिक्षण संस्था-उद्योग संस्था जोपर्यंत एकत्र येत नाही; तोपर्यंत उद्योग क्षेत्र मोठे होऊ शकत नाही. इंजिनिअरिंग क्‍लस्टर सुक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी फायदेशीर आहेत, असे मत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी चिंचवड येथे व्‍यक्‍त केले.

पुणे, पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग क्‍लस्टरच्या वतीने आयोजित केलेल्‍या नॅशनल व्हेंडर कार्यक्रम आणि प्रदर्शनाचे उद्‌घाटन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्‍य उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते, सहसंचालक विश्वनाथ राजळे, पुणे इंजिनिअरिंग क्‍लस्टरचे संचालक, अध्यक्ष सागर शिंदे, संचालक अभय दप्तरदार, विजय देशमुख, राजेश चव्हाण, संतोष तिडके, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते.

देसाई म्‍हणाले की, इंजिनिअरिंग क्‍लस्टरमध्ये 'कॉमन फॅसिलिटी सेंटर' सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा छोट्या उद्योजकांनी घ्यावा. महागडी मशिनरी खरेदी करून आर्थिक भार वाढवण्यापेक्षा फॅसिलिटी सेंटरमधून अपेक्षित उत्‍पादन घेता येईल. उत्‍पादित वस्‍तुंची उपयुक्‍तता, गुणवत्ता, दर्जा आदी बाबी तपासणीच्या सुविधादेखील अशा क्लस्‍टरमधून दिल्‍या जातात. त्‍यामुळे एमएसएमई उद्योजकांच्या उत्‍पादनांना मोठ्या कंपन्यांकडून तसेच जागतिक बाजारपेठे मधूनही मोठ्याप्रमाणावर मागणी असते, हे राज्‍यातील 14 क्‍लस्टरमधून होत असलेल्‍या कामावरून सिध्द झाले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून उपयोग नाही, तर सॉफ्ट स्किल असणे आवश्यक आहे. तरच चांगल्‍या रोजगारसंधी उपलब्‍ध होतील. उद्योग विश्वाला अपेक्षित कार्य पुण्यातील क्‍लस्टरकडून होत आहे, त्‍याबद्दल देसाई यांनी कौतुक केले. आज घडीला देशातील औद्योगिक क्षेत्रास विजेच्या समस्येने ग्रासले आहे. मुबलक पाणी उपलब्‍ध नाही, चांगल्या दर्जाचा कोळसा भारताला आयात करावा लागतो. यासाठी अधिक आर्थिकभार सोसावा लागतो. याचा परिणाम वीज निर्मितीवर होतो. त्‍याऐवजी आपण सौर, पवन ऊर्जा या अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढविला पाहिजे. परंतु, या ऊर्जा स्‍त्रोतांच्या वापरासाठी आवश्यक तंत्रज्ञान, साधनसामुग्री यांची निर्मिती भारतामध्ये झाल्‍यास उत्‍पादन खर्च कमी होऊन स्वस्त आणि किफायतशीर वीज निर्मिती होऊन देशापुढील समस्या सुटण्यास मदत होईल. देशातील एकुण गुंतवणुकीचा विचार केल्‍यास 50 टक्‍क्‍यांहुन अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होते. उद्योग क्षेत्रात राज्‍याचा प्रथम क्रमांक अजुनही आबाधित आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्रालाच प्रथम पसंती देतात. मागील वर्षी मेक इन इंडिया मध्ये 8 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. त्‍यातील निम्‍म्‍यापेक्षा जास्‍त प्रकल्‍प कार्यान्वित होण्यास सुरुवात झाली आहे, असे सुभाष देसाई म्‍हणाले. प्रास्ताविकात पुणे इंजिनिअरिंग क्‍लस्टरचे संचालक सागर शिंदे म्हणाले की, 2011 मध्ये चिंचवड येथे क्‍लस्टरची स्थापना होऊन 2014 मध्ये प्रत्‍यक्ष कामकाजास सुरूवात झाली. या क्‍लस्टरमधील सुविधांचा लाभ तीनशेहुन अधिक लघु उद्योजकांना झाला असून सुमारे 800 कुशल कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्‍ध झाल्‍या. महाराष्ट्रासह देशभरातून उद्योजक आणि कामगार येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्‍यांच्यासाठी उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून होस्टेलची सुविधा उपलब्‍ध करण्यात यावी, अशी मागणी, शिंदे यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली. यावेळी राजीव गुप्ते यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभय दप्‍तरदार यांनी केले. कार्यक्रमास इंजिनिअरिंग क्‍लस्टरचे सदस्य, लघु उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमएसएमईशी संबंधित हे प्रदर्शन 6फेब्रुवारीपर्यंत विनामुल्य सुरू राहणार आहे.

...Read More

V. S. News
अँक्सिस बँकेचे ७४ लाख पळवणारा चालक साथीदारांसह गजाआड

व्हीएस न्यूज - एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली कॅश घेऊन व्हॅनसह फरार चालकाला त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून ७४ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीसांनी आपली चक्रे फिरवत या गुन्ह्याचा ७२ तासात छडा लावला आहे.

एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले ७४ लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. ३१) रोजी दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम शाखेजवळ घडली होती. या प्रकरणातील आरोपींना वाकड पोलिसांनी ७२ तासात जेरबंद केले असून त्यांच्याकडून ७४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

या कारवाईची माहिती देताना पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, मुख्य आरोपी रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर), असे या व्हॅन चालकाचे नाव आहे. तर त्रिंबक गणपती नहिराळे (वय ३७, रा. मांडवजाळी, ता. जि. बीड), अमोल लक्ष्मण धुते (वय २७,साई पार्क, माऊलीनगर, दिघी), विठ्ठल रामहरी जाधव (वय ३४, रा. लोळदगाव, ता. गेवराई, जि. बीड), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ब्रिक्स इंटरनॅशनल या कंपनीची गाडी (एम. एच.१४, सीएक्स ५७११) रणजित कोरेकर चालवत होता. बुधवारी सकाळी ही गाडी डेक्कन येथून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघाली. दुपारपर्यंत सात एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. गाडीमध्ये सुरक्षा रक्षक, दोन कॅशियर आणि चालक असे चौघे होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि कॅशियर एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी उतरले असता चालक रणजित कोरेकर याने गाडी घेऊन धूम ठोकली. यावेळी गाडीमध्ये ७४ लाख रुपयांची रोकड होती.

वरील आरोपी ईटीऑस कार (एम एच ४८, एफ १९८४) मधून पैसे असलेल्या वाहनाचा पाठलाग करीत होते. कॅश वाहन चोरण्याची संधी साधून चौघांनी मिळून भोसरी येथून सर्व कॅश ईटीऑस कारमध्ये ठेवून पळाले. बुधवारी रात्री उशिरा पळवून नेलेली व्हॅन भोसरी एमआयडीसी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. मात्र, त्यामधील रोख रक्कम घेऊन चालक रणजित कोरेकर फरार झाला होता. गुरुवारी शिक्रापूर हद्दीत ज्या पेटीमध्ये कंपनीने पैसे भरून ठेवले होते, ती पैशांची पेटी सापडली. पण सापडलेली पेटी मोकळी होती. काही वेळेच्या फरकाने एक-एक गोष्टी समोर येत असल्याने हा पूर्वनियोजित कट तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यावरून वाकड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले, व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा गुन्हा उघडकीस आला. प्रकरणाचा ७२ तासांमध्ये तपास करत आरोपींना गजाआड करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.

...Read More

V. S. News
शासनाने वाहतूक पोलीसांना नागरिकांना मारण्याचे आदेश दिले आहेत का?

व्हिएस न्युज - चिंचवड येथे भुमकर चौकात वाहतूक पोलीसाने चालकाला बेदम मारहाण केल्याचा विडिओ वायरल झाला असून सोशल मीडिया वर चर्चेत आहे. सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेल्या विडिओमध्ये एमएच 12, एफ डी 6795 हा टेम्पो उभा आहे.त्या व्हिडिओ मागचं पूर्ण सत्य अद्याप स्पष्ट झालं नसून त्यावर लवकरात लवकर तपास करण्यात येईल, असे स्पष्टीकरण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिले.

वाहतूक पोलीसाने चालकाला बेदम मारहाण केल्याचा आणि चालक वाहतूक पोलीसाची मरू नये म्हणून हाथ जोडून विनंती करत असल्याचे विडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ रस्त्याने जाणा-या एका वटसरूने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. वर्दीची ताकद, पोलिसी खाक्या, अशोभनीय, निंदनीय, कदाचित पैशांची मागणी पूर्ण केली नसणार म्हणून मारहाण करण्यात येत आहे. अशा एक ना अनेक चर्चा सध्या सुरू आहेत.

याबाबत बोलताना परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, या प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल. नेमका प्रकार काय आहे हे तपासणे महत्वाचे आहे. ज्याची चूक असेल त्याला शिक्षा नक्की होणार. नागरिकांनी नको त्या चर्चा सोशल मीडियावर पसरवू नये. व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तसेच व्हिडिओ संपल्यानंतर नेमका काय प्रकार झाला आहे, हे देखील तपासण्यात येईल.

वाहतूक पोलीसांची दादागिरी आणि अरेरावी वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत पार पाडण्या पेक्षा पावती फाडण्यात जास्त मग्न आहेत असे नागरिकांचे मत आहे.

...Read More

V. S. News
महाराष्ट्रातील शिवसेना सोशल टिमचा मेळावा मोठ्या उत्सहात साजरा.

व्हिएस न्युज - रविवार दिनांक ४/५/२०१८ रोजी महाराष्ट्रातील शिवसेना सोशल टिमचा मेळावा मंगलसेन बहल सभागृह नेहरूनगर या ठिकाणी शिवसेना पिंपरी विधानसभा संपर्क प्रमुख गिरीशजी सावंत व पिंपरी विधानसभा आमदार अॕड गौतम चाबुस्कवार यांच्या प्रमुख उपस्थित उत्सहात पार पाडला.


यावेळी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महीला शहर संघटीका सुलभाताई उभाळे, शिवसेना प्रभाग प्रमुख राहटणी काळेवाडी युवराज दाखले. विभाग प्रमुख राजेश वाबळे, मा विभाग प्रमुख रामदास वानखडे चंद्रकांत सरडे,मुंबई वरून मोहन गव्हाणे, डाॕ मुंकुद दाभाडे, रावसाहेब पाटिल, विनायक जठार, रावसाहेब पाटिल चंद्रकांत सरडे, मंगेश मिस्किन धाराशिव वरुन राजवर्धन पाटिल, दौंड हुन अक्षय पासलकर, दत्ता डेरे, कोल्हापूर वरून आनंद भोसले, रितेश राजशिर्के, हिंगोली चे ओंकार कानोडे, वाईचे विनोद वानखेडे आदि शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसैनिक निलेश फुलसुंदर, विशाल चव्हाण,संभाजी जगताप, अमोल शेंडगे,नामदेव घुले, आतिश पाटोळे, आदी शिवसैनिकांनी नियोजन केले.
...Read More

V. S. News
चांगले कर्म चांगली दिशा देऊ शकतात

व्हीएस न्यूज - जीवनात सकारत्मकतेची ताकद येण्यासाठी अध्यात्मिक योग, ध्यानधारणा गरजेची आहे. चांगले विचार आचरण, संवाद संस्कार यातूनच प्रेम आपुलकी वाढते. चांगले कर्म चांगली दिशा देऊ शकतात. डॉक्टर ताण तणाव, क्रोध, अहंकार, स्वार्थ दूर करूनच रुग्णांच्या वेदना दूर करू शकतात यासाठी मनशक्ती जागरूक ठेवण्याची गरज आहे त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा, असे मत बी के शिवानी दीदी यांनी व्यक्त केले.
डॉ. डी. वाय पाटील मेडिकल महाविद्यालय व संशोधन केंद्रात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या बी के शिवानी दीदी यांनी 'आत्मविश्वास व सकारत्मकता' या विषयी व्याख्यानाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ पी. एन राजदान तसेच विद्यार्थी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्यानी उपस्थित होते.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!