Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
इन्डूरन्स चॅम्पियनशिपमध्ये हॉर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबचे यश

व्हीएस न्यूज - इंडिजिनियस हॉर्स ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या इन्डूरन्स चॅम्पियनशिप या हॉर्स रायडिंग स्पर्धेत तब्बल पाच सुर्वण, दोन रौप्य व पाच कांस्य पदके मिळवीत हॉर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबने घवघवीत यश संपादित केले.
इंडिजिनियस असोसिएशनच्या वतीनेे दरवर्षी वेगवेगळ्या भागात हॉर्स रायडिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धकाने स्पर्धा पुर्ण करावी लागते. तसेच घोड्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते, स्पर्धा संपल्यानंतर घोड्याच्या ह्दयाचे ठोके तपासून स्पर्धकाने यशस्वीरित्या स्पर्धा पुर्ण केल्याचे घोषित केले जाते. नुकतीच लोणावळ्यात पार पडलेली ही स्पर्धा 20, 40 आणि 60 किमी या तिन गटात घेण्यात आली. देशभरातील व परदेशी खेळाडू अशा 50 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली पोलंड येथील नऊ वर्षीय यहाना व 68 वर्षाचे अजय शहा हे खेळाडू लक्षवेधी ठरले.
14 वर्षाखालील वयोगटाच्या 20 किमी अंतराच्या स्पर्धेत लोणावळा नेट क्लबच्या हर्षल खळदकर याने सुर्वण पदक तर सुजल जाधव याने रौप्य व तन्मय वांद्रे याने कांस्य पदकाची कामगिरी केली. तसेच अनुराग गायकवाड याने स्टेबल मेट या वर्गात सुर्वण पदक प्राप्त केले, टीम कॅटेगिरीमध्ये हॉर्स रायडर्स नेटच्या दोन्ही संघांनी सुर्वण व रौप्य पदकं मिळवली.
...Read More

V. S. News
लोकनेते गोपीनाथ मुंडे हे लोकप्रतिनिधी घडविणारे व्यक्तीमत्वं होते.....पंकजा मुंडे

व्हीएस न्युज - पिडीत वंचित वर्गाचा विकास करण्यासाठी मला काम करायचे आहे. उत्कृष्ठ लोकनेता होणे हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते पुर्ण करण्यासाठी मी भविष्यात काम करील. लोकप्रतिनिधी घडविणारे त्यांचे व्यक्तीमत्वं होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणा-यांवर मी अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन ग्रामविकास, महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रहाटणी, पुणे येथे केले.


स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंती निमित्त शनिवारी (दि. 3 फेब्रुवारी) रहाटणी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समितीच्या वतीने ‘आठवणीतले मुंडे साहेब’या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पायलट रमीला लटपटे, विजय वडमारे, अंजिक्य गायकवाड यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपिठावर खासदार अमर साबळे, डॉ. अमित पालवे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, संघटन मंत्री सुनिल कर्जतकर, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, उपमहापौर शैलजा मोरे, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते आदींसह बहुतांश नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या की, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या मागे असणा-या सर्मथकांना बरोबर घेऊन नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची संधी दिली. त्यांच्या विषयी बोलताना अश्रू येऊ न देता फक्तं भावना व्यक्तं करायच्या याचं धाडस मला त्यांच्यामुळेच आले. त्यांनी भावनेचे राजकारण केले नाही तर, जे केले ते भावनेने केले म्हणून देशभर त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम लोक घेत आहेत. त्यांची सदैव आठवण त्यांच्या मित्रांना नेहमी येतेच परंतू त्यांच्या शत्रूंना देखील त्यांची आठवण येते असे त्यांनी अजातशत्रू बनविले. सकारात्मक स्वभावामुळेच ते यशस्वी झाले. भाजपाने त्यांच्यावर अन्याय केला असे म्हणणा-यांना त्यांच्या मागचा वर्ग आपलासा करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मुंडे म्हणाल्या. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मैत्रीपुर्ण नातेसंबंध तसेच विलासराव देशमुख यांच्या बरोबरच्या त्यांच्या आठवणी यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितल्या. मुंडे साहेबांमुळेच मला अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुंदरलालजी पटवा यांच्याबरोबर राहून शिकण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर अधिवेशनाला उपस्थित राहून, कार्यकर्त्यांच्या घरी पिठलं भाकरी खाऊन मी घडले. माझ्या मुलीने मला निवडून आणले हे ते अभिमानाने राज्यभर सांगायचे. मुले- मुली असा भेदभाव त्यांनी केला नाही. बारामतीत मी जेंव्हा युवा मोर्चाची एल्गार सभा घेतली तेंव्हा ती पाहण्यासाठी ते टिव्ही पुढे बसले, आणि सभेला झालेली गर्दी पाहून माझे भाषण संपताच त्यांनी मला फोन करुन अभिनंदन केले. तरुणांना संधी देण्याचे त्यांचे धोरण होते. अशा अनेक आठवणी पंकजा मुंडे यांनी सांगितल्या.

खासदार अमर साबळे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे माझ्या जीवनात आले नसते तर मी खासदार झालो नसतो. दिल्लीत देखिल माझी ओळख गोपीनाथ मुंडेचा माणूस म्हणूनच आहे. सत्ता असू नाही तर नसू दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले.

संयोजनात सदाशिव खाडे, आबा नागरगोजे, रघूनंदन घुले, अरुण पवार, सुभाष गराडे, केशव घोळवे, बाबू नायर, गणेश ढाकणे, सुभाष पालवे, माऊली थोरात, चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभूवन, दिपक जाधव, श्रीनिवास नढे, अशोक सोनवणे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन भगवान सेना पिंपरी चिंचवड, बीड जिल्हा मित्र मंडळ, राष्ट्र संत भगवान बाबा प्रतिष्ठान पुणे, जय भगवान युवा फाऊंडेशन, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, मराठवाडा जनविकास संघ, मराठवाडा मित्र मंडळ, भगवान बाबा मित्रमंडळ, जय भगवान महासंघ, लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व लोकनेते गोपीनाथ मुंडे विचारमंच पिंपरी चिंचवड आदी संस्थांनी केले होते.

स्वागत, प्रास्ताविक सदाशिव खाडे, आभार मोरेश्वर शेडगे यांनी मानले.
...Read More

V. S. News
दोन उच्चशिक्षित तरूणांची नोकरीच्या अमिषाने फसवणूक

व्हीएस न्यूज - संकेतस्थळावर हॉटेलमध्ये नोकरीची जाहिरात पाहून दोन उच्च शिक्षित तरूणांची 60 हजार रूपयांची फसवणूक सराईत गुन्हेगाराने केली. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी उघडकीस आली.
दिपेश सोनी (रा. पिंपरी) असे फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर भोसरीसह चतुःश्रृगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या आरोपी सोनी हा चतुःश्रृगी पोलीसांच्या कोठडीत आहे. याप्रकरणी नदिन गंवडी (वय-25, रा. कर्वेनगर) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 6 ते 26 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडला.
फौजदार आर. बी. सोडनवर यांनी माहिती दिली. फिर्यादी गंवडी हा बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेत आहे. तो व त्याचा अभिजीत बाबासाहेब पाटील पार्टटाईम नोकरीच्या शोधात होते. लिंक इन या संकेतस्थळावर त्यांनी चिंचवड येथील रिव्हर व्हयु हॉटेलमध्ये नोकरी लावण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी व त्याच्या मित्राने आरोपी सोनीशी संपर्क साधला. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सोनीने दोघांकडून प्रत्येकी 30 हजार असे 60 हजार रूपये घेतले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली.
चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
...अन्‌ कारवाईला घाबरून दारूडा दुचाकीसोडून पळून गेला

व्हिएस न्यूज - ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह कारवाईला घाबरून दारूड्या दुचाकीस्वाराने पळून जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलीसाला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. घाबरलेला दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेला. ही घटना गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडली.
नाथाराम काळे असे जखमी झालेल्या वाहतूक पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी (एमएच क्रमांक 14, सीए-397) या दुचाकीचालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहाय्यक फौजदार बी. जी. केदार यांनी माहिती दिली. फिर्यादी हे भोसरी वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते सहकाऱ्यांसमवेत गुरूवारी रात्री इंद्रायणीनगर येथील राकेश स्वीट मार्ट समोर ड्रंक ऍण्ड ड्राईव्हची कारवाई करत होते. आरोपी दुचाकीस्वाराला काळे यांनी थांबण्याची सुचना केली. दुचाकीस्वार थांबला नाही. दुचाकीस्वाराने काळे यांना जोरदार धडक दिली. यामुळे घाबरलेला दारूडा दुचाकीस्वार दुचाकी घटनास्थळी सोडून पळून गेला.
एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
'आज तुम्हारी गेम बजाके ए रोजका किस्साच खतम कर डालता'

व्हीएस न्यूज - सांडपाणी दारात येत असल्याच्या कारणावरून आई व चुलतीमध्ये झालेल्या भांडणातून 'तुम्हारा रोजकाच नाटक हुएला है, आज तुम्हारी गेम बजाके ए रोजका किस्साच खतम कर डालता, एक जान जाने से मुझको फरक नही गिरता' असे म्हणत चुलत्यावर व चुलत भावावर भावानेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना खडकीतील महादेववाडी येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
शाहबाज कुरेशी (वय-19, रा. खडकी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. अरबाज हनिफ कुरेशी, शाहरूख हनिफ कुरेशी, हनिफ गफुर कुरेशी, तायरा हनिफ कुरेशी (सर्व. रा. महादेववाडी, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची आई आणि चुलती तायरा हनिफ कुरेशी शेजारी राहतात. यांच्यामध्ये सांडपाणी दारात येत असल्याच्या कारणावरून भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्याचा शाहबाजचा भाऊ मुसेफ कुरेशी आणि त्याचे वडील प्रयत्न करत होते. आरोपी अरबाज कुरेशीने घरात जावून लोखंडी कोयता आणून फिर्यादीला ' तुम्हारा रोजकाच नाटक हुएला है, आज तुम्हारी गेम बजाके ए रोजका किस्साच खतम कर डालता, एक जान जाने से मुझको फरक नही गिरता' असे म्हणत चुलत भावावर व चुलत्यावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. शाहरूख कुरेशीने रॉडने तर हनिफ कुरेशी याने फिर्यादी व त्याच्या वडिलांना लाथा बुक्यांनी मारहाण केली.
फौजदार व्हि. एस. आजगेकर अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
आई-वडिलांना दहा वर्षांची मुलगी झाली 'नकोशी' !

दोघांचे पटत नसल्याने मुलीला सांभाळण्यास नकार
व्हीएस न्यूज - पती-पत्नीत होणाऱ्या सततच्या भांडणामुळे दोघांनी पोटच्या दहा वर्षांच्या मुलीला सांभाळण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार आकुर्डी येथे शुक्रवारी उघडकीस आला आहे. निर्देयी आई-वडीलांनी मुलीला निगडी पोलीस ठाण्यात आणून सोडले आहे. दोघांवर गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, दोघांनाही शुक्रवारी मोरवाडी न्यायालयात हजर केले असता पतीचा जामीन मंजूर झाला तर पत्नीच्या जामीनदाराला येण्यास उशिरा आल्याने तिचा जामीन होऊ शकला नाही. पत्नीने न्यायालयातही मुलीला सांभाळण्यास नकार दिल्याने शेवटी पतीनेच दोन्ही मुलांना सांभाळण्याची तयारी दर्शविली.
राजेश जयसिंग भोसले (वय-39, रा. स्वप्नपुर्ती बिल्डींग, पंचतारानगर, आकुर्डी), प्रतिभा राजेश भोसले (वय-34, रा. सेक्टर नंबर. 21, बिल्डींग 20, रूम 06 यमुनानगर, निगडी) असे अटक केलेल्या आई-वडीलांची नावे आहेत. समृध्दी (वय-10) असे दुर्देवी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक काशिनाथ खंडाळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी माहिती दिली. राजेश भोसले व प्रतिभा भोसले यांचे अकरा वर्षापुर्वी लग्न झाले आहे. त्यांना पाच वर्षाचा शौर्य तर दहा वर्षांची समृध्दी आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून सतत वाद होत आहेत. त्यामुळे ते दोघेही विभक्त राहत आहेत. प्रतिभा भोसले मुलाला सांभाळण्यास तयार झाल्या. तर मुलीला सांभाळण्यासाठी प्रतिभा यांनी पतीकडे पैसे मागितले. राजेश यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी मुलीला सांभाळण्यास नकार दिला. त्यानंतर राजेश यांनीही मुलीला सांभाळण्यास नकार दिल्याने हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. त्यांनी मुलीला गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता निगडी पोलीस ठाण्यात आणून सोडले. गेल्या तीन दिवसांपासून निगडी पोलीस व महिला दक्षता समितीच्या महिलांनीही भोसले दांपत्याला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतू, ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. भोसले दांपत्यावर कलम 317, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे शौर्य व समृध्दी दोन दिवसांपासून निगडी पोलीस ठाण्यातच राहत असून पोलीस कर्मचारी त्यांचा सांभाळ करत आहेत.
राजेश भोसले एक्साईड बॅटरीमध्ये कामाला आहेत. तर प्रतिभा भोसले या गृहिणी आहेत. समृध्दी ही निगडीतील अमृता शाळेत चौथी वर्गात शिकत आहे.
दरम्यान, केंद्र सरकार 'बेटी बचाओ, बोटी पढाओ', असा नारा देत असले तरी 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आजही मुलीबाबतचे समाजमन बदलण्यास तयार होत नसल्याचे दिसून येत आहे. आई-वडीलांच्या वादात दोन्ही चिमुकल्यांच्या मनावर काय परिणाम होतील याचा भोसले दांपत्याने जराही विचार केला नसल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
ज्ञानदीप प्रशालेत स्नेहसंमेलन वार्षिकोत्सव उत्साहात

व्हीएस न्यूज - ज्ञानदीप इंग्लिश स्कुलचे वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन उत्साहात विविध उपक्रमांनी पार पडले.
स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, माजी अध्यक्ष राहुल चिताळकर, प्रशांत पाटील, परशु केकाण, पूजा ठवरे, यशस्वी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, अंकुश पांढरे, भागवत काटकर आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष सागर भोसले, संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसह शालेय वैयक्तिक व सामाहिक स्पर्धा, खेळ, मनोरंजनात्मत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी पल्लवी जाधव, हेमांगी शिंदे, शीतल जगताप, पूजा ठवरे, हेमलता राऊत, रुपाली गजरमल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मारुती बोन्द्रे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांनी तर आभार अनिल नाटेकर यांनी मानले.
...Read More

V. S. News
सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची महिलांमध्ये ताकद

व्हीएस न्यूज - धार्मिक व सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याची ताकद महिलांच्या सामूहिक नेतृत्वात असून त्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांनी नुकतेच केले.
श्री जगद्गुरु प्रतिष्ठानच्या वतीने कर्तृत्वान महीलांचा व उत्कृष्ट महीला बचतगटांचा सत्कार समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुलक्षणा धर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. लक्ष्मण रानवडे, ऍड. सुनिता रानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एच. ए. कॉलनीतील स्वरांजली महिला बचत गट, छाया सिनलकर, रंजना मुळिक, सुरेखा कामठे, संस्कृती महिला बचत गट वनमाला वाघमारे यांना जिजाऊ सावित्री उत्कृष्ठ कार्य पुरस्कार देऊ न सन्मानित करण्यात आले. तर सायुजता दोडके यांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बहल पुढे म्हणाल्या, गेली एकवीस वर्षे महिलांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ऍड. रानवडे हे पुरस्कार देऊन करत असलेले कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या समाजरुपी कार्याची दखल राज्य शासनानेही नुकतीच घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी सुलक्षणा धर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. लक्ष्मण रानवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजिता ऍड. सुनिता रानवडे यांनी आभार मानले. चॉंद शेख, देवेंद्र गावंडे, सुधीर कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
...Read More

V. S. News
मंजूर केलेला निधी ज्येष्ठांसाठी पूर्णपणे वापरला जात नाही

व्हीएस न्यूज - ज्येष्ठ नागरिक हे या वयातही तरुणांना लाजवतील अशा उत्साहात सामाजिक कार्य करतात, ही बाब निश्चितच भूषणावह आहे. तरीदेखील महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी तरतूद करून मंजूर केलेला निधी पूर्णपणे वापरला जात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबत जागरूकता दाखवून निधीचा योग्य विनियोग करावा, असे आवाहन माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी येथे केले.
आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, गोलांडे इस्टेट, सुदर्शननगर यांनी आयोजित केलेल्या वर्धापनदिन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोलांडे बोलत होते. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाला स्वतःची वास्तू मिळाली; तसेच त्याची अधिकृत शासकीय नोंदणी झाली याबद्दल गोलांडे यांनी समाधान व्यक्त केले. उद्योजक स्वानंद राजपाठक यांनी, "अध्यात्माबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाची शिदोरी तरुण पिढीला द्यावी. कारण त्या ज्ञानाचा उपयोग अनेक विधायक कामांसाठी होऊ शकतो" असे विचार मांडले.
रवींद्र कुलकर्णी यांनी अहवालवाचन केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त करून स्वरचित कविता सादर केली. याप्रसंगी आशा कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी आणि रवींद्र कुलकर्णी यांनी भक्तिरचना सादर केल्या.
विजय राजपाठक, सच्चिदानंद दिवेकर, कविता कोल्हापुरे, दत्तात्रय पुजार यांनी संयोजनात सहकार्य केले. अशोक कपोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा चाफे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
...Read More

V. S. News
मोफत पाणी पुरवठा योजना फसवी

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने पाणी दरवाढ मोठ्या प्रमाणात करून फक्त सहा हजार लिटर पाणी मोफत देण्याचे शहरवासियांना अमिष दाखविले आहे. परंतू, मोफत पाणी फक्त पाच दिवसात संपणार असून सत्ताधारी भाजपाने त्याआडून मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल यांनी केला आहे.
बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार जणांच्या कुटूंबाला यापुर्वी सरासरी महिन्याला 75 रूपये मासिक बिल येत होते. परंतू, सत्ताधारी भाजपाने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ प्रस्तावित केली आहे. दरवाढ केल्यानंतर जनतेमध्ये रोष निर्माण होऊ नये यासाठी सहा हजार लीटर पाणी मोफत देण्याचे आमिष दाखविले आहे. परंतू, हे सहा हजार लीटर पाणी अवघ्या चार ते पाच दिवसात संपणार आहे. त्यामुळे ही योजना फसवी असून पाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी बकाल यांनी केली आहे. यापुर्वीही तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने पाण्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्याचे नियोजन केले. परंतू, जनतेने पाणी दरवाढ मागे घेण्यास भाग पाडले होते. त्याचप्रमाणे भाजपलाही दरवाढ मागे घेण्यास भाग पाडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
...Read More

V. S. News
घोलप महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा

व्हीएस न्यूज - बाबुरावजी घोलप यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी घोलप महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मेळाव्यात भाग घेतला. या मेळाव्यास राहुल जवळकर आणि माजी नगरसेविका वैशाली जवळकर, राम जांभूलकर, महविद्यालय विकास समिती सदस्य अभिजित शिर्के, प्रसाद जाधव, अपर्णा भालेराव यांच्यासह माजी विद्यार्थी हजार होते.
प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा प्रकाश पांगारे यांनी तर आभार प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय घारे व प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी योगदान दिले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. ढगे, डॉ.एल. के. निकम उपस्थित होते.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!