व्हीएस न्यूज - पुण्यावरुण लोणावळे कडे जाणाऱ्या लोकलची धडक लागुण एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाला. ही घटना रविवारी सकाळी रेंजहिल्स येथिल रेल्वे बोगदा परिसरात घडली असल्याची माहिती खडकी रेल्वे पोलिसांनी दिली. लोकल अपघातात मृत्यु पावलेल्या या अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्ष असुन उंची पाच फुट चार इंच आहे. रंगाने सावळा अंगाने मध्यम नाक सरळ चेहरा उभट असलेल्या या व्यक्तिने अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट व राखाडी रंगाची पॅंन्ट परिधाण केलेली आहे. अशा वर्णणाच्या व्यक्ती बाबत अधिक माहिती असल्यास नागरिकांनी खडकी रेल्वे पोलिसांसी संपर्क साधावा असे आवाहण पोलिसांनी केले आहे. पुढील तपास रेल्वे पोलिस हवलदार मिलिंद लोणारे करित आहेत.