Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
भाजपाचा पारदर्शक भ्रष्टाचार मात्र जनतेवर अधिभार - सचिन साठे

व्हीएस न्यूज - शहरातील नागकिांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हेसोयीस्कररीत्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असलेल्या भाजपाच्या या पारदर्शक भ्रष्टाचाराचा जनतेवर अधिभार का? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला.

पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (1 मार्च) पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजपाने केलेल्या पाणीपट्टी दरवाढ विरोधात निदर्शने केली. या वेळी महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे,युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्प संख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैसवाल, एनएसयूआय शहराध्यक्ष विशाल कसबे, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, अल्पसंख्यांक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, मॅन्यूअल डिसुजा, क्षितिज गायकवाड,विश्वनाथ खंडाळे, सचिन नेटके, तानाजी काटे, गौरव चौधरी, तारीख रिझवी, विजय ओव्हाळ, सुरेश लिंगायत, सिद्धार्थ वानखेडे, फय्याज शेख, हुरबाणो शेख, कल्पना जाधव, वामण ऐनेले, अर्जून खंडागळे, विठ्ठल खलसे, भास्कर नारखेडे, अनिरूद्ध कांबळे, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले, मागील वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने एक वर्षाच्या कार्यकालात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पाशवी बहुमतामुळे भाजपामध्ये मस्ती आलेली आहे. ही मस्ती कॉंग्रेसचे कार्यकर्ते उतरविल्याशिवाय राहणार नाहीत. पाशवी बहुमतापुढे निषप्रभ ठरलेल्या विरोधी पक्षामुळे पिंपरी चिंचवडच्या जनतेवर चौपट पाणीपट्टी दरवाढ भाजपाने लादली. दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करून सहा हजार लिटर मासिक पाणीपुरवठा प्रत्येक कुटुंबाला मोफत देणारी देशातील पहिली महापालिका असे जाहिर करून प्रसिद्धी करून घेतली.

प्रत्यक्षात मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका आतापर्यंत देशात सर्वात कमी दराने पाणीपुरवठा करीत होती. प्रस्तावित दरवाढीमुळे देशात सर्वात महागडा पाणीपुरवठा पिंपरी चिंचवड मनपा नागरिकांवर लादत आहे. 5 हजार 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा पुढील वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला आहे. 405 कोटीच्या निविदा प्रक्रियेत 35 कोटींची बचत केल्याचा अजब दावा आयुक्तांनी केला आहे. वाचवलेली हि रक्कम पाणीपुरवठ्यावर खर्च करावी व नागरिकांना सुविधा द्यावेत. दरवर्षी पाणीपट्टीतून 70 कोटींहून जास्त रुपये महापालिकेत जमा होतात. तरीदेखील पाणीपट्टीची अन्यायकारक दरवाढ नागरिकांवर लादली आहे. ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरून याला तीव्र विरोध करील असा इशारा सचिन साठे यांनी दिला.

...Read More

V. S. News
राष्ट्रीय गो-कार्ट रेसिंग स्पर्धेत बावधनचे पीव्हीपीआयटी महाविद्यालय चॅम्पियनशीपचे मानकरी

व्हीएस न्यूज - ऑटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप आणि वाघोली, पुणे येथील पार्वतीबाई मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने घेण्यात आलेल्‍या राष्ट्रीय गो-कार्टस्पर्धेत बावधन पुणे येथील पीव्हीपीआयटी महाविद्यालयाने चॅम्पियनशीपचा किताब व रोख 75 हजारांचे पारितोषिक पटकावले. मोशी, प्राधिकरण सेक्‍टर 6 येथील ट्राफिक थिम पार्क येथे झालेल्‍या या स्पर्धेत देशभरातील36अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रासह ओडीसा, राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून एकूण 900 विद्यार्थी सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्‍या या स्‍पर्धेचे उद्‌घाटन माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या हस्ते करण्यात आले. 125 सीसी क्षमतेचे इंजिन वापरून बनवलेल्‍या गो-कार्ट मध्ये स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ब्रेक टेस्‍ट, स्किड पॅड टेस्ट, ॲटो क्रॉस व इंडोरन्स रेसिंग अशा विविध कौशल्‍यपूर्ण चाचण्या पूर्ण केल्‍या. ॲटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप क्‍लब तर्फे प्रा. प्रतीक सातव, प्रा. मनोज भोजणे, प्रा. गणेश कदम,प्रा. मार्तंड पंडागळे यांनी संयोजनात सहभाग घेतला.

स्पर्धेतील विजयी संघ खालीलप्रमाणे : प्रथम क्रमांक (75 हजार रोख व चॅम्पियनशीप ट्रॉफी) : पीव्हीपीआयटी (बावधन,पुणे); व्दितीय क्रमांक (50 हजार रोख) - डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी), तृतीय क्रमांक (35 हजार रोख) - जेएससीओई (हडपसर, पुणे); चतुर्थ क्रमांक (20 हजार रोख) - आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); पाचवा क्रमांक ( रोख 12 हजार ) : सीओईपी (पुणे) या संघांना गौरविण्यात आले.

याबरोबरच बेस्ट डिझाईन गटात सीओईपी पुणे यांना प्रथम क्रमांक, तर व्दितीय क्रमांक जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (कुरण, पुणे) यांना देण्यात आला. एक्स्लिरेशन गटात प्रथम - आर्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयपूर राजस्थान); व्दितीय - एमएमआयटी, (लोहगाव, पुणे). स्किड पॅड - प्रथम सीओईपी (अवसरी,पुणे); व्दितीय - पीव्हीपीआयटी (बावधन, पुणे); ॲटो क्रॉस - प्रथम क्रमांक एमएमआयटी, (लोहगाव, पुणे); व्दितीय क्रमांक डीकेटीईएस टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (इचलकरंजी). इनोव्हेशन - प्रथम युपीईएस (डेहराडून) व्दितीय - बीव्हीआरआयटी (नौरपूर हैद्राबाद), ॲस्थिटीक - प्रथम - सिंहगड इन्स्टिट्यूट (लोणावळा,पुणे); व्दितीय - सीओईपी (अवसरी, पुणे). बेस्ट कॅप्टन - प्रथम - मानस जयस्वाल, (युपीईएस, डेहराडून); व्दितीय शुभम गारडे (आरएससीओई, पुणे); बेस्ट ड्रायव्हर - प्रथम - तेजवीर सिंग, व्दितीय - अजिंक्‍य शिंदे, द्रोणाचार्य ॲवॉर्ड - प्रथम - बी. श्याम बाबू, व्दितीय - शिवलिक दुबे, तृतीय - सुनील तपासे. यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

...Read More

V. S. News
आगामी निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळतील : आठवले

व्हीएस न्यूज - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असे भाकित वर्तवले आहे. पण भाजप २५० जागा मिळवून केंद्रात सत्तेत येईल, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी भाजपच्या जागा कमी होण्याला दिला.

आठवलेंना यावेळी मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मी सत्तेत असलो तरी माझ्या गृहखाते माझ्याकडे नाही. पण यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच, शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेची आठवलेंनी खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरे बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र लढू म्हणाले असतील, तरी उद्या ते विचार बदलतील, असे आठवले म्हणाले.

...Read More

V. S. News
तापकीरनगर चौकातील बीआरटी रोडवरील खोदाच्या जागेवर डांबरीकरण करा – युवराज दाखले

व्हीएस न्यूज - तापकीरनगर चौकातील वडेवाले जोशी समोरील बीआरटी रोडवरील खोदाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची मागणी रहाटणी- काळेवाडी विभागाचे शिवसेना प्रभागप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी केली आहे. याबाबत महापालिकेच्या ग प्रभागाचे मुख्य अधिकारी दांगट यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तापकीरनगर चौकात जीओ कंपनीच्या वतीने केबल टाकण्याचे काम चालू आहे. परंतु, संबंधीत ठेकेदाराकडून कामाकडे गांभिर्याने पाहिले जात नसून यामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वास्तविक पाहता खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ काम पूर्ण करून डांबरीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या वर्दळीच्या ठिकाणी लहान गाड्या स्लिप होऊन पघात होण्याचे प्रमाणात वाढले आहे. तरी, याबाबत प्रशासन म्हणून लक्ष देण्यात यावे, असेही दाखले यांनी निवदेनात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
वृद्ध कामगाराचा मृत्यूप्रकरणी दोन ठेकेदारांवर गुन्हा 

व्हीएस न्यूज - आचार्य अत्रे रंगमंदिराचे काम करणाऱ्या कामगारांना ठेकेदाराकडून सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची साधन सामुग्री पुरविली गेली नसल्याने सोमवारी एका 65 वर्षीय वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन ठेकेदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश फाळके (वय 40, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि चंद्रकांत जाधव (वय 32, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदारांची नावे आहेत. याबाबत सतीश डोंगरे (वय 28, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहाचे डागडुजीचे काम सुरु होते. हे काम शैलेश फाळके व चंद्रकांत जाधव या दोन ठेकेदारांनी घेतले आहे. सभागृहात पाण्याच्या टाकीचे काम करून घेत असताना कामगारांना ठेकेदाराकडून सुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. फिर्यादी यांचे वडील कचरू डोंगरे यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. तरीही त्यांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता पाण्याच्या टाकीमध्ये काम करायला लावले. अखेर कचरू डोंगरे यांचा जीव गुदमरल्याने मृत्यू झाला. पुढील तपास फौजदार घुगे करीत आहेत.

...Read More

V. S. News
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या दोघे गजाआड

व्हीएस न्यूज - सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन तरुणांना गजाआड केले आहे. या तरुणांनी मराठा समाजाबाबत व्हाट्‌सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
विश्वनाथ निवृत्ती वाजे आणि राजेंद्र गोरख मोडवे (दोघेही रा. शिंदेवस्ती, रावेत) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक सुनील संपत जाधव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन तरुण बेरोजगार आहेत. दोघांना दारूचे व्यसन असून या दोघांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास व्हाट्‌सअप ग्रुपवर मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. याबाबत पोलीस नाईक सुनील जाधव यांनी तक्रार दिली. विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखावल्याचे कारणावरून निगडी पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले.

...Read More

V. S. News
आगीत दहा झोपड्या जळून खाक

व्हीएस न्यूज - वाघेरे कॉलनी येथे कामगारांच्या झोपड्यांना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सुमारे दहा झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
वाघेरे कॉलनी येथे रिकाम्या जागेत बिगारी काम करणारी अनेक कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे कर्नाटकवरून पुण्यात रोजी-रोटी कमविण्यासाठी आले आहेत. रोजच्याप्रमाणे झोपड्यांमधील सर्वजण कामावर गेले असता बुधवारी दुपारी एकच्या सुमारास एका झोपडीतून अचानक धूर निघाला. घरी असलेल्या काही महिलांनी जवळ जाऊन बघितले असता झोपडीमधील सर्व वस्तूंनी पेट घेतला होता. महिलांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षणात आग आजूबाजूला पसरली. यामध्ये शेजारी असलेल्या सुमारे दहा झोपड्या जाळून खाक झाल्या.
नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची तात्काळ माहिती दिली. पिंपरी अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. यामध्ये जिवितहानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

...Read More

V. S. News
चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडून 641 मोबाईल लंपास

व्हीएस न्यूज - मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 641 मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात ते सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली.
वसिम खान (वय 37, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसिम खान यांचे निगडीतील ट्रान्सपोर्टनगर भागात साई एन्टरप्रायजेस नावाचे मोबाईलचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी दुकान बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी लोखंडी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. 6 लाख 32 हजार 423 रुपये किंमतीचे मोझोमॅक्स व सेलकॉन कंपनीचे एकूण 641 मोबाईल चोरून नेले. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.बी. खारगे अधिक तपास करीत आहे.

...Read More

V. S. News
पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न  

व्हीएस न्यूज - गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आरोपीची चौकशी करत असताना आरोपीने पोलीस ठाण्यातच स्वतःचे डोके फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडला.
प्रशांत उर्फ डिग्या भानुदास दिघे (वय-26, रा. तंगडेवस्ती, माथळवाडे फाटा भूगाव, ता. मुळशी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल होते. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आरोपीकडे चौकशी करीत होते. चौकशीमध्ये पोलिसांना सहकार्य न करता त्याने जवळच असलेल्या लोखंडी कपाटावर डोके आपटून घेतले. यामध्ये आरोपीच्या डोक्याला मार लागला. तसेच लोखंडी कपाटाची काच फुटली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व आत्महत्येचा प्रयत्न या गुन्ह्याखाली आरोपीला पोलिसांनी अटक केली.
पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

...Read More

V. S. News
माहेरहून पैसे आण, नाहीतर सामूहिक बलात्कार करू; पतीची पत्नीला धमकी

व्हीएस न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आण, असा तगादा लावून विवाहितेचा छळ केला. पैसे न आणल्यास सामूहिक बलात्कार करण्याची धमकी पतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे निलख येथे उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे सासरच्या मंडळींनी सुनेकडे हुंड्याच्या पैशांची मागणी केली. फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 15 लाख रुपये आण, असा तगादा वारंवार लावला. फिर्यादी महिलेने पैसे आणले नाहीत म्हणून तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. पतीने तर यापुढे जाऊन पैसे न आणल्यास पत्नीला सामूहिक बलात्काराची धमकी देखील दिली. याबाबत पीडित महिलेने पोलिसांकडे दाद मागितली. महिलेने सासरच्या मंडळींविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास फौजदार संभाजी पाटील करीत आहेत.

...Read More

V. S. News
मोटारीचा एनओसी दाखला काढून देण्याच्या अमिषाने दोन लाखांची फसवणूक 

व्हीएस न्यूज - मोटारीचा ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून एनओसी दाखला काढून देण्याच्या अमिष दाखवून एका दलालाने इसमाची दोन लाख रूपयांची फसवणूक केली. ही घटना कासारवाडी येथे नुकतीच उघडकीस आली.
चार्ज डेव्हिड अल्बर्ट करकडा (वय-50, रा. शांतीनगर, उल्हासनगर, पुणे) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ खत्री (वय-53, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खत्री यांना मोटारीचा ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचा एनओसी दाखला काढून देण्याचे आरोपीने सांगितले. खत्री यांचा विश्वास संपादन करून आरोपीने एनओसी दाखल्यासाठी आरटीजीएसव्दारे दोन लाख रूपये घेतले. एनओसी दाखला काढून न देता फसवणूक केली.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले अधिक तपास करत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!