मोटारीचा एनओसी दाखला काढून देण्याच्या अमिषाने दोन लाखांची फसवणूक
भोसरी
2018-03-04
व्हीएस न्यूज - मोटारीचा ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून एनओसी दाखला काढून देण्याच्या अमिष दाखवून एका दलालाने इसमाची दोन लाख रूपयांची फसवणूक केली. ही घटना कासारवाडी येथे नुकतीच उघडकीस आली.
चार्ज डेव्हिड अल्बर्ट करकडा (वय-50, रा. शांतीनगर, उल्हासनगर, पुणे) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ खत्री (वय-53, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खत्री यांना मोटारीचा ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचा एनओसी दाखला काढून देण्याचे आरोपीने सांगितले. खत्री यांचा विश्वास संपादन करून आरोपीने एनओसी दाखल्यासाठी आरटीजीएसव्दारे दोन लाख रूपये घेतले. एनओसी दाखला काढून न देता फसवणूक केली.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले अधिक तपास करत आहेत.