रुपीनगर येथे ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या
निगडी
2018-03-04
व्हीएस न्यूज - एका ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
प्रभाकर केशव पांचाळ (वय-65, रा. सरस्वती हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे), असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. प्रभाकर पांचाळ यांनी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.