व्हीएस न्यूज - तापकीरनगर चौकातील वडेवाले जोशी समोरील बीआरटी रोडवरील खोदाच्या जागेवर डांबरीकरण करण्याची मागणी रहाटणी- काळेवाडी विभागाचे शिवसेना प्रभागप्रमुख युवराज भगवान दाखलेयांनी केली आहे. याबाबत महापालिकेच्या ग प्रभागाचे मुख्य अधिकारी दांगट यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तापकीरनगर चौकात जीओ कंपनीच्या वतीने केबल टाकण्याचे काम चालू आहे. परंतु, संबंधीत ठेकेदाराकडून कामाकडे गांभिर्याने पाहिले जात नसून यामुळे अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वास्तविक पाहता खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ काम पूर्ण करून डांबरीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या वर्दळीच्या ठिकाणी लहान गाड्या स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाणात वाढले आहे.तरी, याबाबत प्रशासन म्हणून लक्ष देण्यात यावे, असेही दाखले यांनी निवदेनात म्हटले आहे.