व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मंगळवार, दि.०६ मार्च २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत करण्यात आले असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या मेळाव्याचे उद्दघाटन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हा पालक मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती तर शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, आमदार गौतम चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती तसेच उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष अघाडी गटनेते कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम,नगरसदस्य तुषार हिंगे, बाबु नायर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह सर्व सन्माननिय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांचे कंपनीत असलेल्या रिक्त पदाबाबत मुलाखती घेणेसाठी उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्यास मुलाखतीसाठी येणा-या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता व वैयक्तिक माहितीच्या प्रतीसह सकाळी ९ वाजता नोंदणीकामी ऑटो क्लस्टर हॉल – A सायन्स पार्कजवळ, चिंचवड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या खर्चाला आळा घालून वाचलेल्या रक्कमेतून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करण्याचा स्तुत्य उपक्रम पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी येथील शिवसेनाप्रणित काळूबाई प्रतिष्ठानने राबविला आहे. शिवसेनेचे काळेवाडी विभागप्रमुख व काळूबाई प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सुधाकर नलावडे व सुनिता संधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह प्रतिष्ठान या गरीब विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवाअधिकारी संजय संधू, गौरव केरकर, प्रशांत तरवटे, किशोर भंगाळे, देवेन मोटवाणी, शुभम उनवणे, अखिल सबॉस्टीएन, अनिरुद्ध पालांडे, संस्थेचे प्रकल्प समनव्यक रवींद्र अंबोरे, सीईओ श्रद्धा देव, श्रुती जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी काळूबाई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व भेट वस्तू संस्थेला देण्यात आल्या. तसेच या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आली.
याप्रसंगी बोलताना विभागप्रमुख सुधाकर नलावडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्वप्रथम गोरगरीब रयतेचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य केले. त्यांच्या ‘रयत सुखी तर राज्य सुखी’ या धोरणाचे पालन आम्ही करत आहोत. मागील काही वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा खर्च टाळून आम्ही समाजातील अशाच शोषित, पीडित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. यामाध्यमातून महाराजांनी आम्हाला दिलेल्या शिकवणीचे आम्ही पालन करत असून यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्याचा मानस नलावडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संयोजन संजय संधू यांनी केले होते. काळूबाई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व नागरिकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका आहे. मात्र, लोकनेते शरद पवार यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याबाबत कार्यकर्ते कमी पडले. विरोधकांच्या खोट्या भूलथापा व आश्वासनांना मतदार भुलले. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. पुढील काळात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसह जास्तीत जास्त नागरिकांना सोशल मिडीया वापरण्याबाबत जनजागृती शिबीरे आयोजित करण्यात येतील. त्याचा लाभ घ्यावा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सोशल मिडीयासारख्या प्रभावी व जलद माध्यमातून घरोघरी पोहचवावेत असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कमिटीच्या वतीने सोशल मिडीया बाबत जागृती करण्यासाठी खराळवाडीतील राष्ट्रवादी शहर कार्यालयात अहमदनगर येथील संगणक तज्ञ योगेश फुंदे यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, शहर प्रवक्ता फजल शेख, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, प्रदेश युवक सरचिटणीस संदिप चिंचवडे,प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, संघटक विजय लोखंडे, आनंदा यादव, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, युवक उपाध्यक्ष संतोष वाघेरे, आलोक गायकवाड, निलेश निकाळजे, शेखर काटे, मंगेश बजबळकर, लाला चिंचवडे, अमोल पाटील, मयुर जाधव, अमित बच्छाव, संघटक सचिव कविता खराडे, पुष्पा शेळके, ब्लॉक अध्यक्ष रशिद सय्यद, दिपक साकोरे, युवक उपाध्यक्ष चैतन्य चोरडिया, जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष यतिम पारेख, कार्यालयीन सचिव रामदास मोरे उपस्थित होते.
वाघेरे पाटील म्हणाले की, मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष व आजीमाजी मंत्र्यांवर विरोधी पक्षांनी बिनबूडाचे आरोप सोशल मिडीयातून केले. त्याला समर्पकपणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तर देऊ शकले नाहीत. निवडणुक निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. त्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मिडीयाचा वापर कमी करतात असे आढळले. त्यामुळे अशी सोशल मिडीया जनजागृती शिबीरे युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर घेण्यात येणार आहेत.
यावेळी योगेश फुंदे यांनी शिबीरात सहभाग झालेल्या सर्वांना व्टिटरचे अकाऊंट ओपन करुन दिले व ते कसे वापरायचे याचे मार्गदर्शन दिले. व्टिटरच्या माध्यमातून आपले स्वत:चे विचार, तक्रार अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री व उच्च अधिकारी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध संस्था यांच्यापर्यंत कमी शब्दात क्षणार्धात पोहचविता येतात. तसेच फेसबुक, इंन्स्टाग्राम सभ्य पणाने कमी शब्दात, उच्च वैचारिक पातळीचे भान ठेवून आपले मत योग्य पध्दतीने कसे मांडावे याची माहिती दिली. सोशल मिडीयाबाबत कोणालाही कोणावरही दबावतंत्र वापरता येत नाही. संविधानाने दिलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना पुरेपूर वापरता येतो. मात्र, विकृत विचारांचे लोक ट्रोलींग करतात. तरी देखिल विचारांची लढाई विचारांनी लढायची याचे भान सर्वांनी ठेवावे. असेही फुंदे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष वाघेरे पाटील यांच्या हस्ते फुंदे यांचा सत्कार करण्यात आला.
व्हीएस न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा १२१ वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट कल्ब येथे पार पडला. शिवजयंतीचे औचित्य साधून नदी घाटावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाला सुरवात करण्यात आली. अभियानात २०० लोक सहभागी झाले होते. यावेळी नदीघाटावर समर्थ क्रिएटीव्ह एनलाईटर्स ग्रुप चे २५ स्वयंसेवक सागर दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घाटावर श्रमदानासाठी सहभागी झाले. आर्मी रिटायर्ड सचिन घाडगे तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच बी यु भंडारी ऑटो मोबाईल्स व ट्रम्प बाईक्सचे संचालक शैलेश जयकुमार भंडारी हे देखील अभियानासाठी उपस्थित होते. राजयोग पेट्रोलियम टीम तर्फे १० हजार रुपयांची देणगी व संजय शंकरराव कलाटे यांच्या तर्फे २१०० रुपयांची देणगी या अभियानातील संचयन कक्षामध्ये जमा झाली. तसेच चिंचवडच्या प्रभुणे डायमंडचे श्रीनिवास प्रभुणे बोट क्लब येथे दररोज फिरायला येतात. त्यावेळी त्यांनी अभियानाची माहिती घेऊन सर्व सहभागी व्यक्तींच्या आरोग्यासाठी २ बॉक्स मास्क आणून दिले. मागील १२१ दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई संकल्पना याबाबतची माहिती रोटरीचे अध्यक्ष रो प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी नवीन सहभागी सदस्यांना सांगितली. भविष्यात केल्या जाणा-या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामाची व योजनांची माहिती दिली.
या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभियंता प्रविण लडकत, रानजाई प्रकल्पाचे आबा मुसुगडे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे रो सोमनाथ हरपुडे, रो सुनील कवडे, रो शेखर चिंचवडे, रो राजेंद्र चिंचवडे, रो गणेश बोरा, रो जगन्नाथ फडतरे, रो वसंत ढवळे, रो सुभाष वाल्हेकर, रो सचिन काळभोर, रो संदिप वाल्हेकर, रो स्वाती प्र वाल्हेकर, रो स्वाती सुनील वाल्हेकर, प्रणाली हरपुडे, वैशाली खराडे, स्वाती पाटील, संगीता घोडके, अनंता पानसे व कुटुंबीय रविकांत व धनंजयव बालवडकर, ज्ञानेश्वर आबा वाल्हेकर, एस पी वायर्स टिम, राजयोग पेट्रोलियम टिम, पी.सी.सी.एफ., सावरकर मित्र मंडळ, भावसार व्हिजन, पोलीस नागरीक मित्र मंडळ, हरिष मोरे व गार्डन ग्रुप थेरगाव एस. के .एफ व टेल्को कामगार ग्रूप, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अॅड. हर्षद नढे, अॅड. महेश टेमगिरे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, संजय कलाटे आणि आय .सी. सी .सायकल क्लबचे पाच सदस्य सायकल वर येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत या अभियानात सहभागी झाले. अनेक महिलाबचत गट, अनेक निसर्गप्रेमी व संस्थांचे कार्यकर्ते श्रमदानासाठी सहभागी झाले होते.
या मोहिमेत तीन ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली. या अभियानामध्ये आजवर ६९८ ट्रक जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. दररोज चालणारे हे अभियान निसर्ग प्रेमींसाठी पुढील रविवारी (दि.८ मार्च) केजुबाई बंधारा, रावेत येथे होणार आहे, असे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी सांगितले.
अरविंद एज्युकेशन सोसायटीत आग सुरक्षिततेवर विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन
व्हीएस न्यूज -आज मोबाईल बोलत किंवा टीव्हीवरील मालिका बघत बघत स्वयंपाक करण्याचे महिलांमधील प्रमाण खूप वाढले आहे. मात्र, महिलांची ही सवय संपूर्ण घरासाठीच धोकादायक ठरू शकते. कारण मोबाईल किंवा टीव्ही पाहत स्वयंपाक करत असताना दुर्लक्ष होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी मोबाईल आणि टीव्ही या दोन गोष्टी स्वयंपाकघरापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्यांनी दिला.
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम स्कूलमध्ये सेफ किड्स फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘सेफ किड्स अॅट होम’ या उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
सेफ किड्स फाऊंडेशनच्या अधिकार्यांनी सांगितले, की महिला स्वयंपाक करताना सैल, घोळसर कपडे घालून स्वयंपाक करताना दिसतात. साडीचा पदरही नीट खोचलेला नसतो. एका बाजूला लहान मुलांना कडेवर घेत स्वयंपाक सुरु असतो. दुसरीकडे गॅसची शेगडी सुरु असताना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईलवरील रेसिपी पाहून भाजी करणे सुरु असते. तसेच टीव्हीवरील मालिकेकडेही लक्ष असते. यामुळे दुर्लक्ष होऊन घरात आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वयंपाकघरात मोबाईल व टीव्हीपासून दूर राहावे. किचन कट्ट्यावर मोबाईल, चाकू, आगपेटी, तेलकट कापड ठेवणेही जोखमीचे आहे. मुलांचा हात पोहोचणार नाही, अशा ठिकाणी काडीपेटी आणि लायटर ठेवावा. पाणी तापवायचा रॉड घातलेल्या बादलीपासून लहान मुलांना दूर ठेवावे. जळणार्या मेणबत्त्या, डासांच्या उदबत्त्या, तेलाचे दिवे मुलांचा हात पोहोचणार नाही आणि ज्वलनशील पदार्थापासून दूर ठेवावेत. याबरोबरच घराला आग लागल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबतही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
फटाके उडवतानाही सुती कपडे परिधान करावीत. स्वतःला आग लागल्यास जिथे आहात तिथे थांबा, खाली पडा आणि लोळा. कपड्यांची पेटलेली बाजू भूमीलगत राहील, याची दक्षता घ्यावी. कपड्यांना आग लागल्यास घाबरून पळू नये. पळाल्यामुळे आग भडकू शकते. आपल्या साथीदाराला आग लागल्यास कोणतेही जाड कापड घेऊन जळणार्याभोवती गुंडाळावे. तसेच त्वरित प्रथमोपचार द्यावेत. जखम किरकोळ असेल, तर कोणतीही क्रिम किंवा टुथपेस्ट लावण्याऐवजी भाजलेला भाग 5 ते 10 मिनिटे पाण्याखाली धरावा, म्हणजे जखम चिघळणार नाही. विजेची उपकरणे हाताळतानाही काळजी घेणे गरजेचे आहे. काम झाल्यावर विजेच्या उपकरणांचे बटन बंद करून प्लग काढून ठेवावा. विजेची उपकरणे / बटणे यांच्याजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. कोणत्याही उपकरणावर किंवा विजेच्या बटणावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्युतभार टाकू नये. ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नये, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
एस न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम वीस टक्के पूर्ण झाले आहे. तर वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे आठ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षभरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विविध कामांचा आढावा दीक्षित यांनी घेतला. महामेट्रोकडे जबाबदारी दिली गेल्याने नागपूर मेट्रोसाठी काम करणा-या अनुभवी मनुष्यबळाचा उपयोग करून पुण्यात मेट्रोच्या विविध कामांना गती देण्यात आली. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हॅरिस ब्रिज (दापोडी) ते पिंपरी-चिंचवड महापालिका दरम्यान काम झपाट्याने सुरु आहे. एका वर्षात या भागातील सुमारे वीस टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोचे काम पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत वेगात सुरू आहे. शहरातील 7.20 किलोमीटर अंतराच्या मार्गावर एकूण 104 फाउंडेशन व 55 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोच्या कामाच्या भूमिपूजनास एक वर्षे पूर्ण होत असल्याने शहरासाठी ही कामगिरी नक्कीच डोळ्यात भरणारी आहे.
शिवाजीनगर ते स्वारगेट मार्गावरील काम पावसाळ्यानंतर सुरु होईल. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व वनाज ते सिव्हिल कोर्ट असे दोन ठिकाणी काम सुरु आहे. शिवाजीनगर धान्य गोदाम ते रामवाडी आणि रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मार्च-एप्रिलपर्यंत या दोन्ही मार्गांवरही कामे सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य व केंद्र सरकारकडून मेट्रोच्या कामासाठी 1300 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे, अवघ्या वर्षभरात प्रत्यक्ष दोन मार्गांवर काम सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.
मेट्रो प्रकल्पात येणा-या स्थानकांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या अंतर्गत संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले स्थानक तयार होणार आहे. बाकी स्थानकांचे प्राथमिक स्वरुपात काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असल्याने उद्योनगरीत विनाअडथळा मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलीस व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने काम वेगात सुरू आहे. सर्व काम 2021 पूर्वी पूर्ण केले जाईल. वाहतूक सुरळीत राहावी म्हणून सर्व दक्षता घेण्यात येत आहे, असे पिंपरी-रेंजहिल्स मेट्रो प्रकल्पाचे प्रमुख सुनील म्हस्के यांनी सांगितले. महामेट्रोच्या कामासाठी आतापर्यंत तीनशे कोटी खर्च झाले असून मार्च अखेरपर्यंत चारशे कोटी खर्च होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेल्या पुनर्रोपण पद्धतीनुसार वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार असून या पद्धतीने पुनर्रोपण केल्यास वृक्षांचा तग धरण्याचा दर हा सर्वाधिक असल्याने महामेट्रो ही पद्धत अवलंबित आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. सदर वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून त्या अंतर्गत 86 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 35 कोटी मिळणार आहे. मेट्रोच्या जागेच्या बदल्यात 180 कोटी महापालिकेकडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण दलाची जागा मिळावी यासाठी चर्चा सुरु आहे. मेट्रो स्थानकाबरोबरच वाहनतळाचीही सोय करण्यात येणार आहे.
याबरोबरच संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकाजवळ नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) तयार करण्यात येणार आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक हे दुस-या बाजूला वल्लभनगर बस स्थानक व आयटी इंडस्ट्री यांना जोडण्यात येणार आहे. सदर पुलाची लांबी ही 65 मीटर तर रुंदी 6 मीटर इतकी असणार आहे. याचा उपयोग मेट्रो स्थानकावर उतरणा-या प्रवाशांबरोबरच या भागातील पादचा-यांनाही होईल. याशिवाय हा पूल जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येणार असून तो वास्तुस्थापनेचा उत्कृष्ट नमुना असेल, असा विश्वास दाखवत नवीन पूल बांधल्यानंतरच जुना पूल पाडण्यात येणार असल्याचेही डॉ. दीक्षित म्हणाले.
व्हीएस न्यूज - येथील ओटा स्किम वसाहतीत रविवारी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी चार मोटारी व तीन रिक्षा अशा 7 वाहनांची तोडफोड केली. सोमवार दुपारपर्यंत एकही वाहन मालकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटा स्कीम येथील गुरुदत्त हौऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये चार मोटारी व तीन रिक्षा पार्क केल्या होत्या. अज्ञात आरोपीने रविवारी मध्यरात्री या सातही वाहनांच्या काचा फोडल्या. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार, खेळ पैठणीचा, एकांकिका तसेच गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सभापती संध्या भेगडे यांनी दिली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारीका भेगडे या उपस्थित राहणार आहे. शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी महिलासाठी खेळ पैठणीचा तसेच एकांकिकेची आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सभापती संध्या भेगडे आणि उपसभापती प्राची हेंद्रे यांनी केलेले आहे. तसेच शहरातील विविध भागातून महिलांची दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली असून यावर्षी 100 टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ठये असल्याचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले. यावर्षी घरपट्टीची एकूण मागणी 16 कोटी 44 लाख रुपये तर पाणी पट्टीची एकूण मागणी 5 कोटी 10 लाख रुपये आहे. आतापर्यंत 8 कोटी 54 लाख तर पाणीपट्टी पोटी 1 कोटी 55 लाख रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती कर संकलन अधिकारी विजय भालेराव यांनी सांगितले. शहरात एकूण 28 हजार मालमत्ताधारक असून 16 हजार नळ जोड आहेत. कर वसुलीसाठी नगरपरिषदेकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहराचे एकूण आठ विभाग करण्यात आलेले आहे. या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी वर्ग देण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. करनिरीक्षक भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली करवसुली अधिकारी संभाजी भेगडे, सुनील कदम, प्रवीण माने, तुकाराम मोरमारे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, विशाल लोणारी, आदेश गरुड विशेष प्रयत्नशील आहेत. सर्व मालमत्ता धारकांना घरपट्टी आणि पाणी पट्टी बिलांचे वाटप करण्यात आलेले असून मोठ्या थकबाकी दारांची विशेष यादी तयार करण्यात आलेली त्याचे साठीचे जप्ती वॉरट तयार करून संबधिताना बजवण्यात आले असल्याचे भालेराव आणि आवारे यांनी सांगितले. नागरिकांनी आपआपले कर येत्या मार्चअखेर पूर्ण भरून विकासाच्या कामात योगदान द्यावे असे आवाहन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि सर्व नगरसेवकांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - जुनी सांगवी ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान ग्रामदैवत श्री वेताळ महाराजांचा उत्सव विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तने, भजने, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर असे अखंड हरिनाम सप्ताह तसेच पालखी व काटी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. 18 ते 26 मार्च पर्यंत करण्यात आले असल्याचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज ढोरे यांनी कळविले आहे. उत्सव समिती पुढीलप्रमाणे : अध्यक्ष -सचिन ढोरे, उपाध्यक्ष- लालिदास ढोरे, खजिनदार -राजेंद्र ढोरे, किरण पाले, सेक्रेटरी-राजेंद्र शितोळे, सुभाष ढोरे, शिवाजी ढोरे, कार्याध्यक्ष-जनार्धन पवार, प्रकाश ढोरे, चेतन ढोरे, क्रियाशील सदस्य- खंडूजी किसान ढोरे, अतुल ढोरे, गणेश सुभाष ढोरे, सनी पांडुरंग शितोळे, सतपाल ढोरे, गणेश ढोरे, सल्लागार - अशोक ढोरे-पाटील, विजय बाप्पू ढोरे, सिकंदर अण्णा पोंगडे, युवराजसिंह गायकवाड, राजू कड, चंद्रकांत ढोरे, गोटीराम ढमाले, बबन नथु ढोरे, वर्गणी प्रमुख-शाहरुख सय्यद, अजिंक्य सुभाष ढोरे, अभिजित गोवर्धन ढोरे, अमित रमेश ढोरे, प्रशांत ढोरे, अविनाश पोंगडे, राहुल माकर, भूषण हांडे, नितीन गोटे, अक्षय चव्हाण, सुनील बा. कांबळे, गणेश वाळुंज, भावड्या धापटे, मुकुंद शिंदे, ईश्वर पाटील, गणेश वाळुंज यांचा सहभाग आहे.
व्हीएस न्यूज - खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजे राष्ट्रवादीतून जरी निवडून आलेले असले तरी ते म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे, या विद्यापीठाचे नियमही तेच बनवतात आणि नियम मोडणाऱ्यांना शासनही तेच करतात, असे धक्कादायक विधान केले. लोकशाही शासनप्रणालीत राज्याच्या प्रमुखाने अशा प्रकारे कुणाचीही मखलाशी करणे हे धक्कादायक असल्याचे मत काळेवाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केले आहे.
व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्याल, रूग्णालयाच्या वतीने महिलांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 10 मार्च या कालावधीत हे शिबीर होणार आहे. यामध्ये महिलांच्या पाळीच्या तक्रारी, वंधत्व चिकित्सा, स्त्रीयांचे इतर आजार, गर्भाशय, स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे, या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002