व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे मंगळवार, दि.०६ मार्च २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत करण्यात आले असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या मेळाव्याचे उद्दघाटन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हा पालक मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती तर शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, आमदार गौतम चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती तसेच उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष अघाडी गटनेते कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम,नगरसदस्य तुषार हिंगे, बाबु नायर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह सर्व सन्माननिय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांचे कंपनीत असलेल्या रिक्त पदाबाबत मुलाखती घेणेसाठी उपस्थित राहणार आहेत. या रोजगार मेळाव्यास मुलाखतीसाठी येणा-या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता व वैयक्तिक माहितीच्या प्रतीसह सकाळी ९ वाजता नोंदणीकामी ऑटो क्लस्टर हॉल – A सायन्स पार्कजवळ, चिंचवड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002