व्हीएस न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्याल, रूग्णालयाच्या वतीने महिलांसाठी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 5 ते 10 मार्च या कालावधीत हे शिबीर होणार आहे. यामध्ये महिलांच्या पाळीच्या तक्रारी, वंधत्व चिकित्सा, स्त्रीयांचे इतर आजार, गर्भाशय, स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे, या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.