व्हीएस न्यूज - येथील ओटा स्किम वसाहतीत रविवारी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी चार मोटारी व तीन रिक्षा अशा 7 वाहनांची तोडफोड केली. सोमवार दुपारपर्यंत एकही वाहन मालकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटा स्कीम येथील गुरुदत्त हौऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये चार मोटारी व तीन रिक्षा पार्क केल्या होत्या. अज्ञात आरोपीने रविवारी मध्यरात्री या सातही वाहनांच्या काचा फोडल्या.
निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.